🔥 Latest Updates

शब्दांच्या जाती भाग 2 | मराठी व्याकरण MCQ टेस्ट | Police Bharti 2026

शब्दांच्या जाती भाग 2 | मराठी व्याकरण MCQ टेस्ट | Police Bharti 2026

🚀 यशाची गुरुकिल्ली: सराव आणि संकल्पना!

नमस्कार भावी पोलीस अधिकाऱ्यांनो! 👋

पोलीस भरती २०२६ ची तयारी करत असताना आपण अनेकदा धावपळ आणि शारीरिक कसरतीवर भर देतो, पण लेखी परीक्षेत मिळवलेला ‘एक-एक’ मार्क तुम्हाला इतरांच्या हजारो पावले पुढे नेऊ शकतो. मराठी व्याकरण हा असा विषय आहे जो पाठांतरापेक्षा ‘समजून’ घेण्यावर जास्त अवलंबून आहे.

गेल्या भागात आपण शब्दांच्या जातींची तोंडओळख करून घेतली. आजच्या ‘भाग २’ मध्ये आपण अशा प्रश्नांचा सराव करणार आहोत, जे दिसायला सोपे वाटतात पण परीक्षेच्या दबावाखाली आपली गफलत करतात.

या टेस्टमध्ये तुम्हाला काय मिळेल?

  • स्मार्ट विश्लेषण: प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ‘हेच’ का? याचे सविस्तर स्पष्टीकरण.
  • नवीन पॅटर्न: २०२६ च्या संभाव्य पोलीस भरती प्रश्नपत्रिकेनुसार काठिण्य पातळी.
  • सर्वसमावेशकता: मराठी व्याकरणासोबतच आमचे व्यासपीठ तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेसाठीही सज्ज करते.

चला तर मग, आजच्या या चाचणीद्वारे स्वतःच्या तयारीचा दर्जा तपासा! 👇

शब्दांच्या जाती भाग 2

🚔 शब्दांच्या जाती भाग 2

• 25 मार्क्सची पोलिस भरती पॅटर्न टेस्ट
• 📚 प्रत्येक प्रश्नाचे संदर्भासहित सविस्तर स्पष्टीकरण
• ✅ टेस्ट पूर्ण होताच तत्काल रिझल्ट
• 🔥 मराठी व्याकरण सरावासाठी उपयुक्त इंटरॲक्टिव्ह परीक्षा

1 / 25

शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे ......... होय ?

2 / 25

गाणे सर्वांना आवडते. या वाक्यातील गाणे हा शब्द वाक्यात कोणते कार्य करतो ?

3 / 25

'धोनी क्रिकेट चांगला खेळतो' या वाक्यातील 'चांगला' हा शब्द काय दर्शवितो ?

4 / 25

मी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क मिळाले नाहीत. या विधानातील अव्ययाचा प्रकार ओळखा ?

5 / 25

पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा? ती चुरुचुरु बोलते.

6 / 25

खालील शब्दाचा प्रकार ओळखा. येरवाळी

7 / 25

अविकारी शब्द म्हणजे काय.

8 / 25

'कामासाठी तो दाहीदिशा फिरत होता' या वाक्यातील अव्यय ओळखा ?

9 / 25

वर, खाली, समोर हे कोणत्या जातीचे शब्द आहेत ?

10 / 25

अभ्यास केला म्हणून त्याला हे यश मिळाले ?

11 / 25

जे जे चकाकते ते ते सोने नसते.

12 / 25

वरपिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होता. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

13 / 25

कैकयीला दशरथाने दोन वर दिले. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

14 / 25

अधोरेखित शब्दाची जात ओळखा. 'अबब ! केवढा मोठा साप हा !'

15 / 25

बदल होणे याला व्याकरणात विकार म्हणतात. विकारी यालाच दुसरा शब्द काय आहे ?

16 / 25

आम्ही पोहोचलो आणि दिवे लागणी झाली. या वाक्यात अव्यय ओळखा.

17 / 25

दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारा अविकारी शब्द म्हणजे ?

18 / 25

खालीलपैकी शब्दांची अविकारी जात ओळखा.

19 / 25

'झोपला' या शब्दाची जात ओळखा.

20 / 25

'डोंगर' या शब्दाची जात ओळखा.

21 / 25

'कोण' या शब्दाची जात ओळखा.

22 / 25

अधोरेखित शब्दाची जात ओळखा. गुरुजी मुलांना गणित शिकवितात.

23 / 25

'आज' हा शब्द ......... आहे.

24 / 25

सामान्यतः स्त्रियांना दागिन्यांची व भारी कपड्यांची भारीच आवड असते. यातील 'भारी' हा शब्द शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये येतो ?

25 / 25

शब्दांच्या एकूण किती जाती आहेत ?

Your score is

📝 स्पष्टीकरण :

७) ‘झोपला’ या शब्दाची जात ओळखा. (अ) सर्वनाम (ब) क्रियापद ✅ (क) विशेषण (ड) क्रियाविशेषण

💡 स्पष्टीकरण: ‘झोपला’ या शब्दातून झोपण्याची ‘क्रिया’ व्यक्त होते आणि तो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, म्हणून ते क्रियापद आहे.

८) खालीलपैकी शब्दांची ‘अविकारी’ जात ओळखा. (अ) नाम (ब) विशेषण (क) सर्वनाम (ड) उभयान्वयी अव्यय

💡 स्पष्टीकरण: अव्ययांच्या (उदा. उभयान्वयी, शब्दयोगी) रूपात लिंग, वचन किंवा विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही, म्हणून त्यांना ‘अविकारी’ म्हणतात.

९) दोन शब्द किंवा दोन वाक्ये जोडणारा अविकारी शब्द म्हणजे? (अ) शब्दयोगी अव्यय (ब) उभयान्वयी अव्यय ✅ (क) केवलप्रयोगी अव्यय (ड) क्रियाविशेषण अव्यय

💡 स्पष्टीकरण: ‘उभय’ म्हणजे दोन आणि ‘अन्वय’ म्हणजे संबंध. दोन शब्दांचा किंवा वाक्यांचा संबंध जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय म्हणतात.

१०) ‘आम्ही पोहोचलो आणि दिवे लागणी झाली.’ या वाक्यातील अव्यय ओळखा. (अ) उभयान्वयी अव्यय ✅ (ब) शब्दयोगी अव्यय (क) क्रियाविशेषण अव्यय (ड) केवलप्रयोगी अव्यय

💡 स्पष्टीकरण: या वाक्यात ‘आणि’ हा शब्द दोन स्वतंत्र वाक्यांना जोडण्याचे काम करत आहे, म्हणून हे उभयान्वयी अव्यय आहे.

११) बदल होणे याला व्याकरणात ‘विकार’ म्हणतात. ‘विकारी’ शब्दाला दुसरा शब्द कोणता? (अ) नाम (ब) विशेषण (क) सव्यय ✅ (ड) अव्यय

💡 स्पष्टीकरण: ‘सव्यय’ (स + व्यय) म्हणजे ज्यांच्यात बदल/व्यय होतो असे शब्द. विकारी शब्दांनाच सव्यय म्हटले जाते.


🚀 तयारी आता यशाची!

केवळ मराठी व्याकरणच नाही, तर गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान (GK) या विषयांच्या नवीन परीक्षा पॅटर्ननुसार डेली सराव करण्यासाठी आजच आमच्यासोबत जोडून रहा.

📲 Daily MCQ आणि Mock Test साठी आमच्या Telegram channel ला नक्की Join करा!

🔗 Join Now: https://t.me/gsestudypoint


तुमची जिद्द आणि आमची साथ… मिळवून देऊ तुम्हाला खाकी वर्दीची शान! 👮✨


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page

© 2026 Gsestudypoint | Learn Education
Privacy PolicyContact UsAbout UsDMCATerms & ConditionsDisclaimer