🔥 Latest Updates

SRPF गट क्र 15 गोंदिया पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Online Practice Set + Mock Test

Table of Contents

SRPF गट क्र 15 गोंदिया पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | SRPF Practice Paper 2026 | Gsestudypoint

जय हिंद उमेदवारांनो! 👋

तुम्ही SRPF गट क्र. १५ गोंदिया पोलीस भरती २०२६ ची तयारी करत आहात का? जर तुमचे स्वप्न खाकी वर्दी अंगावर चढवण्याचे असेल, तर केवळ वाचन करून चालणार नाही, तर प्रश्नांचा सराव करणे अत्यंत गरजेचे आहे. स्पर्धा दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे आणि मराठी व्याकरण व सामान्य ज्ञान हे असे विषय आहेत जे तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये वर आणू शकतात.

तुमचा हाच सराव अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही खास गोंदिया SRPF च्या धरतीवर आधारित हा Online Practice Set व Mock Test तयार केला आहे. यात मागील वर्षांचे ट्रेंड्स आणि संभाव्य प्रश्नांचा समावेश केला आहे. खालील प्रश्न सोडवा आणि स्वतःचा स्कोअर तपासा!

SRPF गट क्र १५ गोंदिया पोलीस भरती २०२६

📘 SRPF गट क्र १५ गोंदिया पोलीस भरती 2026  | प्रश्नपत्रिका

• 📝 एकूण प्रश्न – 100
• 📚 प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण
• ✅ टेस्ट पूर्ण होताच तत्काल रिझल्ट
• 🔥 Police Bharti, Talathi व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
• 💡 कमजोर विषय सुधारण्यासाठी प्रभावी सराव टेस्ट
• 📱 मोबाईल फ्रेंडली इंटरॲक्टिव्ह परीक्षा
• 🏆 गणित ,बुद्धिमत्ता ,मराठी व्याकरण ,GK मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण MCQ टेस्ट

1 / 100

$2.6 \times 2.4 \times 1.2 \times 0.56 = ?$

2 / 100

$0.2 \times 0.02 \times m = 4$ तर $m = ?$

3 / 100

लसावि ५१० व मसावि ३४ असल्यास लहान संख्या सांगा ?

4 / 100

३ km + ४ m + ५०० cm = किती मीटर ?

5 / 100

द. सा. द. शे. ८% दराने ९६०० रु. मुद्दलाचे ३ वर्षांचे सरळव्याज काढा.

6 / 100

४ बहिणींच्या आजच्या वयाचे गुणोत्तर ६: ९: ४ : ३ आहे आणि त्यांच्या आजच्या वयांची बेरीज १५४ वर्षे आहे, तर लहान व मोठ्या बहिणींच्या वयातील फरक सांगा ?

7 / 100

५ आंबे १२५ रुपये ला मिळतात तर ९ आंबे किती रुपये ला मिळतील ?

8 / 100

तीन संख्यांचे गुणोत्तर ८:३:४ आहे व त्या सर्व संख्यांची बेरीज १९५ आहे, तर सर्वात लहान संख्येचा वर्ग किती ?

9 / 100

अनिलने ९२०0 ला खरेदी केलेला टी. व्ही. ११५०० ला विकला, तर शेकडा नफा किती ?

10 / 100

अशोकला दहावीच्या परीक्षेत ७०० गुणांपैकी ५७५ गुण मिळाले म्हणजे त्याला किती % गुण मिळाले ?

11 / 100

१२०० चे २५% म्हणजे किती ?

12 / 100

९६० मीटर लांबीची रेल्वे ताशी ६० km/hr वेगाने जाताना एका उभ्या खांबास किती वेळात ओलांडेल ?

13 / 100

३० ते ६० पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी किती ?

14 / 100

९ हरिणांचे सरासरी वजन ४५.३ kgm आहे, तर सर्व हरिणांचे मिळून एकूण वजन किती ?

15 / 100

एका क्रिकेटपटूने ४ डावांत अनुक्रमे ७२, ७connected६, १०६ व ४४ अशा धावा केल्या, तर त्याच्या ४ डावांची सरासरी किती ?

16 / 100

एक हौद एका नळाने १८ तासात पूर्णपणे भरतो. जर हौदाचा नळ फक्त ४ तास चालला, तर किती % टाकी रिकामी राहील ?

17 / 100

$12.36 + 456.96 + P = 893.65$. तर P = ?

18 / 100

दोन रेल्वे गाड्यांचा वेग अनुक्रमे ४२ km/hr व ३४ km/hr आहे त्या गाड्या एकमेकांच्या दिशेने धावत असून त्या परस्परांना ५४ सेकंदात ओलांडतात. जर एका गाडीची लांबी ७२० मीटर असेल, तर दुसऱ्या गाडीची लांबी काढा ?

19 / 100

दोन संख्यांचा गुणाकार २१६० आहे. मसावि १२ असल्यास लसावि किती ?

20 / 100

खालीलपैकी कोणत्या संख्येस ३ ने भाग जाईल ?

21 / 100

४५६२०००१२ यामध्ये ६ ची स्थानिक किंमत सांगा ?

22 / 100

$(-2405 + 1709 + 325 - 1815) = ?$

23 / 100

१५३ ही त्रिकोणी संख्या आहे, तर तिचा पाया किती ?

24 / 100

४० ते ६० पर्यंत अशा एकूण किती मूळ संख्या आहेत ज्यांच्या अंकांची अदलाबदल केली असता पुन्हा एकदा मूळ संख्याच मिळते ?

25 / 100

$1^3 + 2^3 + 3^3 + \dots + 6^3 = ?$

26 / 100

बिटकॉईन या आभासी (डिजिटल) चलनाचा शोध कोणी लावला ? 

27 / 100

पित्त हे ________ अवयवात तयार होते ?

28 / 100

मधुमेह कशाच्या कमतरतेमुळे होतो ?

29 / 100

खालील करांपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर नाही ?

30 / 100

१९९१ ची नरसिंहम समिती कशाशी संबंधित होती ?

31 / 100

प्रसिद्ध शिवचरित्रकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे नुकतेच निधन झाले ते मुळचे कोणत्या जिल्हयाचे होते ?

32 / 100

'ऑपरेशन गजब लिल हक' हे कोणत्या देशाविरुद्ध सुरु आहे ?

33 / 100

'सावलकोट जलविद्युत प्रकल्प' हे कोणत्या नदीवर आहे ?

34 / 100

'बेंजामिन नेतन्याहू' हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत ?

35 / 100

वाळवीच्या नियंत्रणासाठी ________ हे प्रभावी किटकनाशक आहे.

36 / 100

'इराण' या देशाची राजधानी कौनती.

37 / 100

'घुमर' हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्याचे आहे.

38 / 100

नोएडा हे औदयोगीक शहर कोणत्या राज्यात आहे ?

39 / 100

नवेगाव हे राष्ट्रीय उदयान कोणत्या जिल्ह्यात आहे.

40 / 100

मांजरा पठार कुठल्या भागात आहे.

41 / 100

गोंदिया जिल्ह्यातील अभयारण्याचे नाव काय ?

42 / 100

कोकणातील नदया ________ वाहीनी आहेत ?

43 / 100

पेंच हे राष्ट्रीय उदयान कोणत्या जिल्ह्यात आहे ?

44 / 100

उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

45 / 100

'कार्ल मार्क्स' हा मुळ कोणत्या देशातील विचारवंत होता ?

46 / 100

रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातुन शिक्षण प्रसाराचे कार्य ___- यांनी केले.

47 / 100

'कृष्णाकाठ' हा ग्रंथ कोणी लिहीला ?

48 / 100

शांतिनिकेतनची स्थापना कोणी केली ?

49 / 100

विवेकानंद स्मारक शिला कोणत्या ठिकाणी आहे ?

50 / 100

भिल्लांचा उठाव ________ येथे झाला

51 / 100

५ ते १०१ दरम्यान असणाऱ्या समसंख्या किती आहेत ?

52 / 100

पारसी नवीन वर्षे म्हणजे काय ?

53 / 100

'मानस राष्ट्रीय उद्यान' याचा काही भाग भारतातील आसाम राज्यात येतो. त्याचा इतर भाग हा दुसऱ्या कोणत्या देशात येतो ?

54 / 100

पंचायतराज हा विषय ________ मध्ये समाविष्ट आहे.

55 / 100

ग्रामपंचायतीचा कार्यकाल ________ असतो.

56 / 100

घड्याळात १०:१० वाजल्यास आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील ?

57 / 100

राधिकाच्या मामाचा मुलगा आनंद आहे, तर आनंदची आई राधिकाची कोण असेल ?

58 / 100

२ : ३० वा. तास काटा व मिनिट काटा यामधील कोन किती अंशाचा असेल ?

59 / 100

जर इंग्रजी वर्णमाला उलटया क्रमाने लिहिली तर खालीलपैकी कोणते अक्षर डावीकडून १४ वे अक्षर असेल. 

60 / 100

एका रांगेत मोनीका समोरुन १० वी व मागून ८ वी आहे. आरती रांगेच्या मध्यभागी असल्यास, तिचा रांगेतील क्रमांक कितवा ?

61 / 100

रांगेत सीता समोरुन १० वी व मागून ७ वी आहे, तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत

62 / 100

ऑक्टोबर महिन्याच्या ३१ तारखेला रविवार होता, तर त्या महिन्यात एकूण किती रविवार येतील ?

63 / 100

खालील पैकी चुकीची तारीख कोणती ?

64 / 100

१ जानेवारी २०१८ ला सोमवार होता तर ३० जून २०१८ ला कोणता वार असेल ?

65 / 100

राम उत्तरेकडे ४ कि.मी. अंतर चालत गेला व नंतर उजवीकडे वळून पुन्हा ३ कि.मी. चालत गेला, तर मुळच्या ठिकाणापासून तो किती अंतरावर राहील ?

66 / 100

घोड्याला वाघ म्हटले, बैलाला हत्ती म्हटले, हत्तीला बैल म्हटले, वाघाला सिंह म्हटले, तर शिंगे असणारा प्राणी कोणता ?

67 / 100

जर MTEL = ५०, तर YZNP = ?

68 / 100

गटात न बसणारा शब्द ओळखा.

69 / 100

पाणी : लिटर :: कापड : ?

70 / 100

डोळा : चष्मा :: कान : ?

71 / 100

$111 \times 111 : 12321 :: 1111 \times 1111 = ?$

72 / 100

A, D, I, P, ?

73 / 100

ABXY, DEUV, GHRS, _______-

74 / 100

१, ९, २५, ४९, १२१

75 / 100

७, ११, १३, १९, २३

76 / 100

'मुलांनी खरे बोलावे' यात क्रियापदाचे रुप कोणते ?

77 / 100

'राम राजा झाला' या वाक्यातील 'राजा' या शब्दाचे कार्य कोणते ?

78 / 100

गटात न बसणारा पर्याय ओळखा.

79 / 100

'शहाणी मुले' यात 'शहाणी' हे लिंग कोणते ?

80 / 100

'पिकलेला आंबा' ह्यात 'पिकलेला' हे कोणते विशेषण आहे ?

81 / 100

'मी हे कपडे कुणाला देऊ ?' या वाक्यात 'कुणाला' हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे ?

82 / 100

'बाळांनो' या शब्दात असणारी विभक्ती कोणती ?

83 / 100

शब्दाचा रुपात बदल कशामुळे होऊ शकतो ?

84 / 100

'पक्षी झाडावर बसतो' या वाक्यात 'वर' हा शब्द काय आहे ?

85 / 100

'सु + अल्प' या पोटशब्दाचा जोडशब्द काय असेल ?

86 / 100

'सूर्यास्त' या जोडशब्दाचे पोटशब्द काय आहेत ?

87 / 100

'चांडाळ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

88 / 100

'अचल' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

89 / 100

'युयुत्सा' या शब्दाचा समानार्थी शब्द ?

90 / 100

'औदार्य' या शब्दाचा समानार्थी शब्द ?

91 / 100

'नटसम्राट' हे नाटक कोणी लिहिले ?

92 / 100

'जेव्हा माणूस जागा होतो' हे आत्मकथनपर पुस्तक कोणी लिहिले ?

93 / 100

'कुसुमाग्रज' हे कोणाचे टोपणनाव आहे ?

94 / 100

'प्रल्हाद केशव अत्रे' यांचे टोपणनाव काय ?

95 / 100

'अधिकार ग्रहण' करणे म्हणजे ?

96 / 100

कावळ्याची कावकाव तर कोकीळेचे ________

97 / 100

'नाकाने कांदे सोलणे' या म्हणीचा अर्थ सांगा.

98 / 100

'प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो.' हा अर्थ असणारी म्हण कोणती ?

99 / 100

'अति झाले, आसू आले' या म्हणीचा अर्थ काय ?

100 / 100

सोनलचे पेन काल हरवले. या वाक्याचा प्रयोग ओळखा. 

Your score is

📝 चला तर मग, सराव सुरू करूया! (Questions & Detailed Explanations)

खालील प्रश्न काळजीपूर्वक वाचा, योग्य पर्याय निवडा आणि त्याचे स्पष्टीकरण समजून घ्या जेणेकरून परीक्षेत अशी चूक पुन्हा होणार नाही.

प्रश्न १) सोनलचे पेन काल हरवले. या वाक्याचा प्रयोग ओळखा.

  • A) कर्मणी
  • B) सकर्मक कर्तरी
  • C) अकर्मक कर्तरी
  • D) भावे

💡 योग्य उत्तर: C) अकर्मक कर्तरी

  • स्पष्टीकरण: या वाक्यात ‘हरवणारे’ काय तर ‘पेन’ (हा वाक्याचा कर्ता आहे). वाक्यात कोणतेही कर्म नाही. कर्त्याच्या लिंग-वचनानुसार क्रियापद बदलते आणि वाक्य अकर्मक असल्याने हा ‘अकर्मक कर्तरी प्रयोग’ ठरतो.

प्रश्न २) ‘अति झाले, आसू आले’ या म्हणीचा अर्थ काय?

  • A) एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखादायी ठरते.
  • B) अपमानातून मिळालेल्या लाभाचाही तीव्र त्रास होतो.
  • C) अतिशय गरिबी.
  • D) अडल्या कामासाठी अधिक परिश्रम करणे.

💡 योग्य उत्तर: A) एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखादायी ठरते.

  • स्पष्टीकरण: कोणत्याही गोष्टीचा मर्यादाबाह्य अतिरेक झाल्यास शेवटी त्याचे पर्यवसान दुःखात किंवा त्रासात होते, असा या म्हणीचा योग्य अर्थ होतो.

प्रश्न ३) ‘प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो.’ हा अर्थ असणारी म्हण कोणती?

  • A) उधार तेल खवट
  • B) उंदीर गेला लुटी, आणल्या दोन मुठी.
  • C) आकाशाला झेंडा लावणे
  • D) उभा जोवरी शोभा तोवरी.

💡 योग्य उत्तर: B) उंदीर गेला लुटी, आणल्या दोन मुठी.

  • स्पष्टीकरण: उंदराची क्षमता लहान असते, त्यामुळे तो लुटीला गेला तरी केवळ दोन मुठीच सामान आणू शकतो. म्हणजेच प्रत्येक माणूस आपल्या लायकी व क्षमतेनुसारच कार्य करतो.

प्रश्न ४) ‘नाकाने कांदे सोलणे’ या म्हणीचा अर्थ सांगा.

  • A) फार बढाया मारणे.
  • B) अप्रिय व्यक्तीची गोष्ट पसंत न करणे.
  • C) खूप श्रीमंती असणे.
  • D) पूर्णपणे वाया जाणे.

💡 योग्य उत्तर: A) फार बढाया मारणे.

  • स्पष्टीकरण: स्वतःकडे विशेष कर्तृत्व नसताना देखील केवळ खोट्या गोष्टी सांगून स्वतःचीच प्रंचड स्तुती करणे किंवा बढाया मारणे म्हणजे नाकाने कांदे सोलणे होय.

प्रश्न ५) कावळ्याची कावकाव तर कोकीळेचे ________

  • A) घुत्कार
  • B) गर्जना
  • C) डरकाळी
  • D) कुहुकुहू

💡 योग्य उत्तर: D) कुहुकुहू

  • स्पष्टीकरण: विविध पक्षी आणि प्राण्यांच्या आवाजाला विशिष्ट शब्द आहेत. कावळ्याच्या ओरडण्याला ‘कावकाव’ म्हणतात, तर कोकिळेच्या सुमधुर आवाजाला ‘कुहुकुहू’ किंवा ‘कूजन’ म्हणतात.

प्रश्न ६) ‘अधिकार ग्रहण’ करणे म्हणजे ?

  • A) अधिकार दाबणे
  • B) पळून जाणे
  • C) घाबरणे
  • D) कार्यभार स्वीकारणे

💡 योग्य उत्तर: D) कार्यभार स्वीकारणे

  • स्पष्टीकरण: ‘ग्रहण करणे’ म्हणजेच स्वीकारणे. त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या पदाची जबाबदारी अधिकृतपणे हाती घेते, तेव्हा त्याला ‘अधिकार ग्रहण करणे’ किंवा ‘कार्यभार स्वीकारणे’ म्हणतात.

प्रश्न ७) ‘प्रल्हाद केशव अत्रे’ यांचे टोपणनाव काय?

  • A) दिवाकर
  • B) बालगंधर्व
  • C) केशवकुमार
  • D) बालकवी

💡 योग्य उत्तर: C) केशवकुमार

  • स्पष्टीकरण: प्रल्हाद केशव अत्रे हे मराठीतील प्रसिद्ध लेखक आणि कवी होते, त्यांनी कविता लिहिताना ‘केशवकुमार’ या टोपणनावाचा वापर केला होता.

प्रश्न ८) ‘कुसुमाग्रज’ हे कोणाचे टोपणनाव आहे?

  • A) दगडू मारुती पवार
  • B) वा. रा. कांत
  • C) विष्णू वामन शिरवाडकर
  • D) जयवंत दळवी

💡 योग्य उत्तर: C) विष्णू वामन शिरवाडकर

  • स्पष्टीकरण: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध मराठी कवी आणि लेखक विष्णू वामन शिरवाडकर (वि. वा. शिरवाडकर) यांचे टोपणनाव ‘कुसुमाग्रज’ असे होते.

प्रश्न ९) ‘जेव्हा माणूस जागा होतो’ हे आत्मकथनपर पुस्तक कोणी लिहिले?

  • A) पु. ल. देशपांडे
  • B) इरावती कर्वे
  • C) गोदावरी परुळेकर
  • D) लक्ष्मण माने

💡 योग्य उत्तर: C) गोदावरी परुळेकर

  • स्पष्टीकरण: ठाणे जिल्ह्यातील वारली आदिवासींच्या जीवनावर आणि त्यांच्या चळवळीवर आधारित ‘जेव्हा माणूस जागा होतो’ हे प्रसिद्ध पुस्तक गोदावरी परुळेकर यांनी लिहिले आहे.

प्रश्न १०) ‘नटसम्राट’ हे नाटक कोणी लिहिले?

  • A) वि. वा. शिरवाडकर
  • B) गो. नी. दांडेकर
  • C) रणजित देसाई
  • D) इंदिरा संत

💡 योग्य उत्तर: A) वि. वा. शिरवाडकर

  • स्पष्टीकरण: मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड ठरलेले ‘नटसम्राट’ हे अजरामर शोकांतिका नाटक कवी व नाटककार वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांनी लिहिले आहे.

📌 महत्त्वाचे आगामी अपडेट्स मिळवा!

मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये यश मिळवायचे असेल तर नियमित सराव हाच एकमेव मार्ग आहे. तुम्हाला रोज असेच नवनवीन प्रश्न, चालू घडामोडी आणि मॉक टेस्ट फ्री मध्ये सोडवायच्या असतील, तर आत्ताच आमच्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा.

📲 Daily MCQ आणि Mock Test साठी आमच्या Telegram channel ला join करा!

👉 Join Now: https://t.me/gsestudypoint



इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page

© 2026 Gsestudypoint | Learn Education
Privacy PolicyContact UsAbout UsDMCATerms & ConditionsDisclaimer