🔥 Latest Updates

SRPF गट क्र. 20 वरणगाव भरती 2026 टेस्ट | Online Mock Test, Gsestudypoint

Table of Contents

SRPF गट क्र. 20 वरणगाव भरती 2026 टेस्ट | SRPF Group 20 Online Test | Gsestudypoint

मित्रांनो, पोलीस भरतीचे स्वप्न डोळ्यांत घेऊन दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी SRPF गट क्र. 20 वरणगाव भरती 2026 ही एक मोठी संधी ठरली आहे. नुकतीच १७ मे २०२६ रोजी SRPF गट क्र. 20 वरणगावची लेखी परीक्षा यशस्वीरित्या पार पडली असून, परीक्षा दिलेल्या अनेक उमेदवारांच्या मनात आता एकच प्रश्न आहे – “पेपर नेमका कसा गेला असेल? कोणते प्रश्न विचारले गेले? कटऑफ किती जाऊ शकतो? आणि आपले किती गुण येतील?”

जर तुम्हीही ही परीक्षा दिली असेल किंवा पुढील पोलीस भरतीसाठी तयारी करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. कारण आम्ही घेऊन आलो आहोत SRPF गट क्र. 20 वरणगाव प्रश्नपत्रिकेचे सविस्तर विश्लेषण, ज्यामध्ये तुम्हाला केवळ प्रश्न आणि उत्तरेच नाहीत, तर प्रत्येक उत्तरामागील सोप्या भाषेतील स्पष्टीकरण, प्रश्नांचा दर्जा, कोणत्या विषयावर जास्त भर होता, आणि परीक्षेचा एकूण स्तर कसा होता याचीही माहिती मिळणार आहे.

यासोबतच, या लेखात तुम्हाला Online Mock Test, Practice Set, प्रश्नपत्रिका PDF, महत्त्वाचे प्रश्न व संभाव्य सराव प्रश्न देखील मिळतील, ज्यामुळे पुढील पोलीस भरतीच्या तयारीला आणखी गती मिळेल. अनेक वेळा परीक्षेनंतर आपल्या चुका समजून घेणे आणि प्रश्नांचा पॅटर्न ओळखणे हेच पुढच्या यशाचे गुपित असते — आणि हाच उद्देश लक्षात घेऊन हा संपूर्ण अभ्यासपूर्ण लेख तयार करण्यात आला आहे.

तर चला, वेळ न दवडता SRPF गट क्र. 20 वरणगाव भरती 2026 मधील महत्त्वाच्या प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण समजून घेऊया आणि आपल्या तयारीला आणखी मजबूत बनवूया! 🚔📚

SRPF गट क्र. २० वरणगाव

📘 SRPF गट क्र. २० वरणगाव भरती 2026  | प्रश्नपत्रिका

• 📝 एकूण प्रश्न – 100
• 📚 प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण
• ✅ टेस्ट पूर्ण होताच तत्काल रिझल्ट
• 🔥 Police Bharti, Talathi व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
• 💡 कमजोर विषय सुधारण्यासाठी प्रभावी सराव टेस्ट
• 📱 मोबाईल फ्रेंडली इंटरॲक्टिव्ह परीक्षा
• 🏆 गणित ,बुद्धिमत्ता ,मराठी व्याकरण ,GK मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण MCQ टेस्ट

1 / 100

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?

२, १६, ५४, १२८, २५०, ?, ६८६

2 / 100

एका सांकेतिक भाषेत, CHILDREN ला EJKNFTGP असे लिहीले जाते, त्या भाषेत EDUCATION ला कसे लिहीले जाईल ?

3 / 100

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा.

4 / 100

खालील पदांच्या त्यांच्यातील सारखेपणामुळे एक गट बनतो, या गटात एक पद बसत नाही ते ओळखा: ADI, RVY, KNR, FIM

5 / 100

एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे १८ संघ आलेले आहेत. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळावयाचा आहे, तर एकूण सामने किती होतील ?

6 / 100

सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी सुटलेली गाडी ताशी ६५ किमी वेगाने ७९३ किमी अंतरावरील शहरात किती वाजता पोहचेल ?

7 / 100

अर्चना पूर्वेच्या दिशेने ६०० मी. अंतर कापते, त्यानंतर डावीकडे वळून ५०० मी. जाते, नंतर ती डावीकडे वळते आणि ६०० मी. चालते. ती पुन्हा डावीकडे वळते आणि ५०० मी. अंतर कापून थांबते सुरुवातीच्या स्थानापासून ती आता किती मीटर अंतरावर आहे ?

8 / 100

खालील समीकरण बरोबर करण्यासाठी कोणत्या दोन संख्यांची अदलाबदल करावी लागेल ?

$९ \div ३ + १७ - १८ = १४$

9 / 100

गौरवचा रांगेत सुरुवातीपासून १५ वा क्र. असून त्याअगोदर चौथ्या स्थानी समीर उभा असून तो रांगेत मध्यभागी उभा आहे, तर गौरवचा रांगेत पाठीमागून कितवा क्र. असावा ?

10 / 100

दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत ?

11 / 100

जर '-' म्हणजे भागिले, '+' म्हणजे गुणिले, '$\div$' म्हणजे बेरीज व '$\times$' म्हणजे वजा, तर खालील समीकरण सोडवा:

$७३ \div १५ \times २९ + १८९ - ६३ = ?$

12 / 100

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ?

13 / 100

सुभाषचे घड्याळ प्रत्येक तासाला ४ सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी ११:०० वाजता बरोबर लावलेले ते घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी ११:०० वाजता कोणती वेळ दाखवेल ?

14 / 100

प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब (Water Image) निवडा: 'PEN'

15 / 100

२००४ ला शिक्षक दिन सोमवारी असल्यास त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल ?

16 / 100

पाच मुली रांगेत अशा बसल्या आहेत की रीटा ही उजव्या बाजूस आहे. रीटानंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे. गीता ही लिनाच्या डाव्या बाजूस आहे, मीना लिनाच्या डाव्या बाजूस परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे, तर मध्यभागी कोण बसले आहे ?

17 / 100

दिलेल्या फाशाच्या (Dice) स्थितीवरून १ च्या विरुद्ध अंक कोणता ?

18 / 100

एका सांकेतिक भाषेत २५६ = लाल रंगाचे खडू, ५८९ = हिरव्या रंगाचे फूल व २५४ = पांढऱ्या रंगाचे खडू तर पांढऱ्या शब्दाचा संकेत कोणता ?

19 / 100

प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची आकृती ओळखा.

20 / 100

विधाने: १) सर्व उंदीर मांजर आहेत. २) एकही मांजर कुत्रा नाही. अनुमाने: १) काही उंदीर कुत्रा आहेत. २) एकही उंदीर कुत्रा नाही.

21 / 100

१ ते ४५ या संख्या दरम्यानच्या ३ ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वात कमी किमतीच्या संख्येपासून नवव्या स्थानावरील संख्या कोणती ?

22 / 100

संख्या मालिका पूर्ण करा.

३, १०, २९, ६६, ?

23 / 100

सुनिल केशवचा मुलगा आहे, केशवची बहीण सीमा तीला एक मुलगा मारुती आणि मुलगी सीता आहे, प्रेम मारुतीचा मामा आहे तर सुनिल मारुतीचा नात्याने कोण लागतो ?

24 / 100

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.

१०१, ८०, ६५, ४८, ?

25 / 100

रिकाम्या जागेसाठी योग्य अक्षर शोधा.

 

26 / 100

$(१५)^२ + (१८)^२ - २० = \sqrt{?}$

27 / 100

दोन संख्याचा लसावि व मसावि अनुक्रमे ४३२ व ७२ आहे. जर एक संख्या २१६ असेल तर दुसरी संख्या काढा.

28 / 100

८ ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ?

29 / 100

तांबे व जस्त यांच्या संमिश्राने ५ कि.ग्रॅ. वजनाचा धातूचा एक गोळा तयार केला. जर त्या गोळ्यामध्ये ३५.५% जस्त असेल, तर त्यामध्ये किती ग्रॅम तांबे असेल ?

30 / 100

एका बोटीचा संथ पाण्यातील वेग १५ किमी/तास आहे आणि प्रवाहाचा वेग ५ किमी/तास आहे. तर प्रवाहाच्या दिशेने २४ मिनिटांमध्ये ती बोट किती अंतर प्रवास करेल ?

31 / 100

एक व्यक्ती त्याच्या मासिक पगाराच्या ८०% खर्च करते. जर त्याच्या मासिक पगारात २५% नी वाढ झाली आणि खर्च १५% नी वाढला, तर त्याची मासिक बचत शेकडा कितीने वाढेल ?

32 / 100

$[२+(५\times२१\div३+८)-(२८+१५\div३)]=?$

33 / 100

$\frac{2}{5}$ मध्ये $\frac{2}{5}$ किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज २ येईल ?

34 / 100

$\frac{1}{a-b}+\frac{1}{b-a} = \text{किती} ?$

35 / 100

दोन संख्यांची बेरीज ५० आहे. त्यांच्यातील फरक २२ आहे, तर त्यातील लहान संख्या कोणती ?

36 / 100

५६९०८१ या संख्येतील ९ या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांच्यातील फरक किती ?

37 / 100

द.सा.द.शे. १० दराने १०,००० रुपयाचे ३ वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा.

38 / 100

आई आणि मुलगा यांच्या ५ वर्षापूर्वीच्या वयांतील फरक २५ वर्षे होता व ५ वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर ९:४ असेल, तर ५ वर्षापुर्वीचे आईचे वय किती ?

39 / 100

Question

40 / 100

२०० मोगऱ्याची व १७५ झेंडूची फुले आहेत. त्यांचे सारखीच फुले असणारे हार तयार करावयाचे आहेत. तर प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले असावीत ?

41 / 100

७८ किमी/तास वेगाने जाणारी ८०० मी. लांब रेल्वे एक बोगदा एक मिनिटात पार करते, तर बोगद्याची लांबी किती मीटर असेल ?

42 / 100

अजय व अमित दोघे मिळून एक काम १० दिवसात, अमित व प्रणय मिळून १२ दिवसात, प्रणय व अजय मिळून १५ दिवसात पूर्ण करतात तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ?

43 / 100

) विजय ने एक जुना टि.व्ही. ४७०० रुपयाला विकत घेतला. त्यावर त्याने ८०० रुपये दुरुस्तीसाठी खर्च केले. त्याने तो टि.व्ही. ५८०० रुपयाला विकला तर त्याचा शेकडा नफा किती ?

44 / 100

एक नळ एक टाकी १५ तासात भरतो व दुसरा नळ २० तासात भरतो. पहिला नळ ३ तास सुरु ठेवला व बंद केला तर उर्वरीत टाकी भरण्यास दुसऱ्या नळास किती वेळ लागेल ?

45 / 100

आदेश आपल्या घराच्या उत्तरेकडे २०० मीटर चालत गेला. नंतर काटकोनात पश्चिमेकडे वळून १५० मीटर अंतर चालत गेला. पुन्हा काटकोनात वळून उत्तरेकडे ३०० मीटर चालत गेला. थोड्या वेळाने पुन्हा काटकोनात वळून पश्चिमेकडे १५० मीटर जाऊन डावीकडे काटकोनात वळला व १०० मीटर दक्षिणेकडे आला. तर तो आता त्याच्या घरापासुन सरळ कमीत कमी किती अंतरावर असेल?

46 / 100

तीन संख्या ३:४:५ च्या गुणोत्तरात आहे. पहिल्या आणि तिसऱ्या संख्यांची बेरीज दुसऱ्या संख्येहून ५२ ने जास्त आहे. तर सर्वात मोठी संख्या कोणती आहे ?

47 / 100

रिया व तिच्या चार मैत्रिणींच्या वयांची सरासरी २४ वर्षे आहे. त्यांची वये अनुक्रमे $(३m-२),$ $(२m+७)$, $(४m-७)$, $(३m)$$(३m+२)$ वर्षे आहेत, तर 'm' ची किंमत काढा.

48 / 100

बाजरीच्या ५० पोत्यांपैकी २० पोत्यांचे सरासरी वजन १०२.५ कि.ग्रॅ. आहे, राहिलेल्या ३० पोत्यांचे सरासरी वजन ९८ कि.ग्रॅ. आहे. तर प्रत्येक पोत्याचे सरासरी वजन किती ?

49 / 100

पहिली संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा ५ ने लहान आहे. पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर ४:५ आहे, तर त्या संख्या कोणत्या ?

50 / 100

खालील पैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती ?

51 / 100

'शुचिर्भूत' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

52 / 100

अनुभूती, प्रत्यय, प्रचिती, प्रत्यंतर या शब्दांस समानार्थी शब्द ओळखा

53 / 100

चूकीची जोडी ओळखा.

54 / 100

'षण्मासिक' म्हणजे क्या ?

55 / 100

खालीलपैकी योग्य शब्द ओळखा

56 / 100

षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते ?

57 / 100

त-त-ज-ग-ग; हे गण कोणत्या वृत्ताचे आहेत ?

58 / 100

वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण ______ चे कार्य करते.

59 / 100

'असावा सुंदर स्वप्नातील बंगला.' या वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरुन कोणता अर्थ सूचित होतो ?

60 / 100

शेतात पिक दिसताच शेतकरी आनंदाने नाचू लागला; वाक्याचा प्रकार ओळखा.

61 / 100

मधूनमधून असेच घराकडे येत जा. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.

62 / 100

शैवाले गुंतले तरि पंकज हे शोभते. वरिल काव्यपंक्तीतील अधोरेखित शब्दाचा समास ओळखा.

63 / 100

तू मला कळवायचे होतेस. या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा.

64 / 100

पण मन बेटे स्वस्थ राहीना. या वाक्यातील अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

65 / 100

पुष्कळ मुले उत्तीर्ण झाली; परंतु पहिल्या वर्गात कोणीच आले नाही. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

66 / 100

आज दिवसभर सारखे गडगडले, अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.

67 / 100

गुरुजी रागावलेले दिसतात. या वाक्यातील रागावलेले या शब्दाचे कार्य कोणते ?

68 / 100

दोन्ही भाऊ, पाची पांडव, यातील संख्याविशेषणाचा प्रकार ओळखा

69 / 100

'फुलांनो' या शब्दात असणारी विभक्ती ओळखा.

70 / 100

येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रांमध्ये दिसे । 'डोळ्यांत काय गेले हे?' म्हणुनी नयना पुसे || अलंकार ओळखा.

71 / 100

'विधाता' या शब्दाचे स्त्रीलिंगी रुप खालीलपैकी कोणते ?

72 / 100

खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे दोन्ही वचनातील प्रत्यय सारखेच असतात ?

73 / 100

वाचन हा माणसाचा पहिला मित्र. या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा

74 / 100

वरची खोली लहान आहे. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.

75 / 100

प्, फ्, ब्, भ्, म् वर्णाचा प्रकार ओळखा.

76 / 100

नुकतेच सी.डी. गोपीनाथ यांचे चेन्नई येथे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?

77 / 100

'पंचगंगा तिरी' हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे ?

78 / 100

'खेलो इंडिया ट्रायबल गेम्स २०२६' चे यजमानपद कोणत्या राज्याकडे होते ?

79 / 100

'सराव दस्तलिक' (Exercise DUSTLIK) कोणत्या दोन देशांमधील लष्करी सराव आहे ?

80 / 100

एप्रिल २०२६ मध्ये बिहारच्या मुख्यमंत्रीपदी खालीलपैकी कोणाची निवड झाली ?

81 / 100

खालील पैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद नाही ?

82 / 100

भारतीय राज्यघटनेचा 'भाग VIII' कोणत्या तरतुदींशी संबंधीत आहे ?

83 / 100

महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल खालीलपैकी कोण होते ?

84 / 100

भारतीय राज्यघटनेतील 'राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे' ही तरतुद कोणत्या देशाच्या घटनेतून घेण्यात आली आहे ?

85 / 100

कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये घटनेतील 'भाग VII' वगळण्यात आला.

86 / 100

कोणत्या साली 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया' (RBI) चे राष्ट्रीयकरण झाले ?

87 / 100

'एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम' (IRDP) ______ साली पूर्ण देशभरात लागू करण्यात आला.

88 / 100

राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना १९४९ साली यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.

89 / 100

कात कोणत्या झाडापासून मिळवतात ?

90 / 100

घोडसगाव, चांदोर, हस्ती, शिरसोली या टेकडया कोणत्या जिल्हयात आहेत ?

91 / 100

खालील पैकी कोणत्या किनारपट्टीला 'कोरोमंडल किनारा' म्हणून ओळखले जाते ?

92 / 100

खालील पैकी कोणत्या शिखराला 'The Great Black One' या पर्यायी नावानेसुध्दा ओळखलें जाते ?

93 / 100

______ हा ISRO ने तयार केलेला स्त्रीरुपी रोबोट आहे, जो गगनयान मिशनसाठी बनविण्यात आला आहे ?

94 / 100

कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावला ?

95 / 100

'निकोटीनामाइड' हे रासायनिक नाव कोणत्या जीवनसत्वाचे आहे ?

96 / 100

 कर्बोदके हे कार्बन, ऑक्सिजन आणि ______ च्या अणुपासून बनतात.

97 / 100

लाल रक्तपेशी (RBC) च्या निर्मितीस काय म्हणतात ?

98 / 100

खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये ब्रिटनमध्ये 'हाय कमिशन फॉर इंडिया' या अधिकार पदाची नियुक्ती झाली.

99 / 100

______ मध्ये ब्रिटनच्या जोखडाखालून मुक्त होऊन स्वराज्याचे अधिकार प्राप्त करुन घेण्यासाठी 'होमरुल चळवळ' प्रथम सुरु झाली

100 / 100

खालीलपैकी कोठे संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना आहे ?

Your score is

🎯 SRPF वरणगाव लेखी परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण :

प्रश्न १) खालीलपैकी कोठे संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना आहे?

  • अ) फैजपूर
  • ब) फरकांडे
  • क) चाळीसगाव
  • ड) वरणगाव

💡 स्पष्टीकरण: जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे केंद्र सरकारचा युद्धसाहित्य व संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना (Ordnance Factory Varangaon) स्थित आहे. या कारखान्यात प्रामुख्याने भारतीय सैन्यासाठी लागणारी काडतुसे आणि इतर महत्त्वाचा दारूगोळा तयार केला जातो.


प्रश्न २) ______ मध्ये ब्रिटनच्या जोखडाखालून मुक्त होऊन स्वराज्याचे अधिकार प्राप्त करुन घेण्यासाठी ‘होमरुल चळवळ’ प्रथम सुरु झाली.

  • अ) भारत
  • ब) आयर्लंड
  • क) अमेरिका
  • ड) जर्मनी

💡 स्पष्टीकरण: होमरूल (ज्याचा अर्थ ‘स्वशासन’ असा होतो) चळवळीची मूळ सुरुवात आयर्लंडमध्ये ब्रिटिश शासनाविरुद्ध झाली होती. याच आयरीश चळवळीवरून प्रेरणा घेऊन पुढे भारतात डॉ. ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी १९१६ मध्ये ‘भारतीय होमरूल लीग’ची स्थापना केली होती.


प्रश्न ३) खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये ब्रिटनमध्ये ‘हाय कमिशन फॉर इंडिया’ या अधिकार पदाची नियुक्ती झाली.

  • अ) १८९२ चा कायदा
  • ब) १९०९ चा कायदा
  • क) १९१९ चा कायदा (मोंटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा कायदा)
  • ड) १९३५ चा कायदा(टीप: मूळ प्रश्नातील १९११ ऐवजी योग्य वर्ष १९१९ आहे)

💡 स्पष्टीकरण: मॉन्टेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा कायदा म्हणजेच ‘भारत सरकार कायदा १९१९’ अन्वये लंडनमध्ये ‘भारतीय उच्चायुक्त’ (High Commissioner for India) हे नवीन पद निर्माण करण्यात आले. भारताचा व्यापार आणि इतर कार्यालयीन हितसंबंधांची काळजी घेणे हे या पदाचे मुख्य काम होते.


प्रश्न ४) लाल रक्तपेशी (RBC) च्या निर्मितीस काय म्हणतात?

  • अ) ल्युकोपोएसिस
  • ब) इरिथ्रोपोएसिस
  • क) थ्रॉम्बोपोएसिस
  • ड) हिमोग्लोबिन

💡 स्पष्टीकरण: मानवी शरीरात अस्थिमज्जेमध्ये (Bone Marrow) लाल रक्तपेशी तयार होण्याच्या जैविक प्रक्रियेला ‘इरिथ्रोपोएसिस’ (Erythropoiesis) म्हटले जाते. तर पांढऱ्या रक्तपेशींच्या (WBC) निर्मितीला ‘ल्युकोपोएसिस’ म्हणतात.


प्रश्न ५) कर्बोदके हे कार्बन, ऑक्सिजन आणि ______ च्या अणुपासून बनतात.

  • अ) नायट्रोजन
  • ब) हायड्रोजन
  • क) कॅल्शिअम
  • ड) मॅग्नेशिअम

💡 स्पष्टीकरण: कर्बोदके (Carbohydrates) हे प्रामुख्याने कार्बन (C), हायड्रोजन (H) आणि ऑक्सिजन (O) या तीन मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होतात. यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे प्रमाण पाण्याप्रमाणेच २:१ या प्रमाणात असते.

फ्री पोलिस भरती सराव टेस्ट


प्रश्न ६) ‘निकोटीनामाइड’ हे रासायनिक नाव कोणत्या जीवनसत्वाचे आहे?

  • अ) जीवनसत्व बी-१
  • ब) जीवनसत्व-सी
  • क) जीवनसत्व बी-३
  • ड) जीवनसत्व-ई

💡 स्पष्टीकरण: जीवनसत्व ब-३ (Vitamin B3) ला ‘नायसिन’ (Niacin) किंवा ‘निकोटीनामाइड’ असे शास्त्रीय नाव आहे. शरीरात या जीवनसत्वाची कमतरता निर्माण झाल्यास ‘पेलाग्रा’ (Pellagra) हा त्वचेचा गंभीर आजार होतो.


प्रश्न ७) कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावला?

  • अ) लुई पाश्चर
  • ब) अलेक्झांडर फ्लेमिंग
  • क) एडवर्ड जेन्नर
  • ड) सेल्मन वॉक्समन

💡 स्पष्टीकरण: ब्रिटिश डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांनी इ.स. १७९६ मध्ये जगातील पहिली यशस्वी लस शोधून काढली, जी देवी (Smallpox) या घातक रोगाविरुद्ध प्रभावी ठरली. याच शोधामुळे त्यांना ‘प्रतिकाशक्तीशास्त्राचे जनक’ (Father of Immunology) मानले जाते.


प्रश्न ८) ______ हा ISRO ने तयार केलेला स्त्रीरुपी रोबोट आहे, जो गगनयान मिशनसाठी बनविण्यात आला आहे?

  • अ) व्योममित्रा
  • ब) व्योमिका
  • क) व्योम
  • ड) मित्र

💡 स्पष्टीकरण: इस्रो (ISRO) द्वारे विकसित करण्यात आलेला ‘व्योममित्रा’ (Vyommitra) हा एक अर्ध-मानवी (Half-Humanoid) महिला रोबोट आहे. भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘गगनयान’ या मानवरहित अंतराळ मोहिमेदरम्यान अंतराळातील वातावरणाचा आणि मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी या रोबोटला पाठवले जाणार आहे.


प्रश्न ९) खालील पैकी कोणत्या शिखराला ‘The Great Black One’ या पर्यायी नावानेसुध्दा ओळखलें जाते?

  • अ) माऊंट एव्हरेस्ट
  • ब) के-२
  • क) मंकालू
  • ड) धवलगिरी

💡 स्पष्टीकरण: जगातील पाचवे सर्वोच्च शिखर असलेले ‘मंकालू’ (Makalu) हे नेपाळ-तिबेट सीमेवर स्थित आहे. या शिखराची रचना गडद काळ्या पाषाणाची असून, अत्यंत कठीण चढाईमुळे त्याला तिबेटी संस्कृतीत आणि जागतिक स्तरावर ‘The Great Black One’ म्हणून ओळखले जाते.


प्रश्न १०) खालील पैकी कोणत्या किनारपट्टीला ‘कोरोमंडल किनारा’ म्हणून ओळखले जाते?

  • अ) ओडिशाची किनारपट्टी
  • ब) तामिळनाडूची किनारपट्टी
  • क) महाराष्ट्राची किनारपट्टी
  • ड) केरळची किनारपट्टी

💡 स्पष्टीकरण: भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या दक्षिण भागाला, म्हणजेच प्रामुख्याने तामिळनाडू राज्याच्या किनारपट्टीला ‘कोरोमंडल किनारा’ म्हणतात. याउलट, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील केरळच्या भागाला ‘मलबार किनारा’ म्हटले जाते.


🧐 प्रश्न १ चे उत्तर का बरोबर आहे ते समजून घ्या…

तुम्हाला पडला असेल की वरणगावच का? तर जळगाव जिल्ह्यातून राष्ट्रीय पातळीवर ओळख असणारी महत्त्वाची संस्था म्हणजे वरणगावची ‘ऑर्डनन्स फॅक्टरी’. पोलीस भरतीमध्ये बऱ्याचदा स्थानिक जिल्ह्याचा भूगोल आणि चालू घडामोडींवर असे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे जळगाव जिल्हा विशेष अभ्यास करताना हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरतो.


📲 Daily MCQ आणि Mock Test साठी आमच्या Telegram channel ला join करा!

जर तुम्हाला अशाच प्रकारे रोज होणाऱ्या नवीन परीक्षांचे पेपर्स, चालू घडामोडी आणि फ्री ऑनलाईन मॉक टेस्ट हव्या असतील, तर आजच आमच्या टेलिग्राम चॅनेलला नक्की भेट द्या.

👉 Join Now: https://t.me/gsestudypoint


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page

© 2026 Gsestudypoint | Learn Education
Privacy PolicyContact UsAbout UsDMCATerms & ConditionsDisclaimer