🔥 Latest Updates

SRPF गट क्र 5 दौंड भरती 2026 टेस्ट | Online Mock Test, Paper PDF & Practice Set

Table of Contents

SRPF गट क्र 5 दौंड भरती 2026 टेस्ट | SRPF Group 5 Daund Bharti 2026 Online Test

नमस्कार भावी पोलीस बांधवांनो,

महाराष्ट्रात पोलीस दलात सामील होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी एक मोठी संधी आली आहे. SRPF (राज्य राखीव पोलीस बल) गट क्र. 5, दौंड ची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे. दौंड गटाचा इतिहास आणि तिथली शिस्त यामुळे या भरतीला महाराष्ट्रात एक वेगळाच मान आहे. त्यामुळेच, दरवर्षी हजारो तरुण या ग्राउंडवर खाकी वर्दी मिळवण्यासाठी दिवस-रात्र घाम गाळतात.

परंतु, केवळ मैदानी चाचणीत (Ground) चांगले गुण मिळवून चालत नाही. जर तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये आपले नाव ‘टॉप’ वर आणायचे असेल, तर लेखी परीक्षा (Written Exam) हाच सर्वात मोठा गेमचेंजर ठरतो. ग्राउंडवरील कष्टाला जेव्हा अचूक अभ्यासाची जोड मिळते, तेव्हाच खाकी अंगावर चढते.

दौंडच्या पेपरचा पॅटर्न पाहिला, तर मराठी व्याकरण, चालू घडामोडी आणि गणिताचे ट्रिकी प्रश्न विद्यार्थ्यांची खरी परीक्षा घेतात. नेमकी हीच अडचण ओळखून, आम्ही तुमच्यासाठी SRPF गट क्र 5 दौंड विशेष Online Mock Test आणि सराव प्रश्नपत्रिका (Practice Set) तयार केली आहे.

या टेस्टची मुख्य वैशिष्ट्ये:

  • दौंड स्पेशल पॅटर्न: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून प्रश्न तयार केले आहेत.
  • सविस्तर स्पष्टीकरण: प्रत्येक प्रश्नाचे उत्तर का बरोबर आहे, याचे सखोल विश्लेषण दिले आहे.
  • Free Paper PDF: तुमच्या सेल्फ-स्टडीसाठी मोफत पीडीएफ डाउनलोडची सुविधा उपलब्ध आहे.

त्यामुळे, वेळ न घालवता खालील प्रश्न काळजीपूर्वक सोडवा आणि तुमची तयारी कितपत झाली आहे ते आत्ताच तपासा. चला, मिशन खाकी २०२६ सुरू करूया!

SRPF गट क्र 5 दौंड भरती 2026

📘 SRPF गट क्र 5 दौंड भरती 2026  | प्रश्नपत्रिका

• 📝 एकूण प्रश्न – 100
• 📚 प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण
• ✅ टेस्ट पूर्ण होताच तत्काल रिझल्ट
• 🔥 Police Bharti, Talathi व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
• 💡 कमजोर विषय सुधारण्यासाठी प्रभावी सराव टेस्ट
• 📱 मोबाईल फ्रेंडली इंटरॲक्टिव्ह परीक्षा
• 🏆 गणित ,बुद्धिमत्ता ,मराठी व्याकरण ,GK मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण MCQ टेस्ट

1 / 100

बोलातना एखादे वाक्य तुटल्यास स्पष्टीकरण द्यावयाचे झालेस कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात ?

2 / 100

एखाद्या डाव त्यावरच उलटविण्याचे कृत्य या अर्थासाठी अचूक म्हण ओळखा ?

3 / 100

एका व्यक्तीच्या पगारामध्ये 50% घट झाली. नंतर त्या घट झालेल्या पगारामध्ये 50% वाढ झाली.

तर त्या व्यक्तीला किती तोटा झाला ?

4 / 100

A चा पगार 18,800/- रुपये आहे तसेच B चा पगार 4,000/- रुपये आहे.

तर A चा पगार B च्या किती % आहे ?

5 / 100

एका संख्येची 40% किंमत जर 120 असेल, तर त्या संख्येची 55% किंमत किती ?

6 / 100

P या नळाने 01 टाकी 12 तासात भरते, आणि Q या नळाने तीच टाकी 15 तासात रिकामी होते.

जर दोन्ही नळ एकत्र सुरु केले, तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल ?

7 / 100

20 स्त्रियांना 150 चादरीवर विणकाम करण्यासाठी 27 दिवस लागतात, तर 300 चादरीवर 24 दिवासात विणकाम करण्यासाठी किती स्त्रिया लागतील ?

8 / 100

माधुरीची आई मिनाची आत्या लागते, तर मिनाची आई ही माधुरीच्या आईची कोण ?

9 / 100

 रेख, ?, त्रिकोण, चौकोन,編 पंचकोन

10 / 100

HG : BC :: ML:?

11 / 100

PROTECT, TCETOR, ROTECE, ?, OTE, ET

12 / 100

विधान : पाऊस पडतो तेव्हा, X घराबाहेर पडत नाही. X बाहेर गेला आहे. निष्कर्ष : 1. सध्या पाऊस पडत नाही. 2.

X बाहेर गेला कारण त्याचे काही महत्वाचे काम होते.

13 / 100

महिला क्रिकेट विश्वचषक 2025 स्पर्धेचे विजेते पद कोणी पटकाविले ?

14 / 100

नुकतेच जागतिक मानवतावादी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?

15 / 100

फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणता प्रोजेक्ट सुरु केला आहे ?

16 / 100

विधवा प्रथा बंद करणारे हेरवाड गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?

17 / 100

खालील पैकी कोणाला अशोक चक्र 2026 ने सन्मानित करण्यात आले ?

18 / 100

ऑस्ट्रेलियन Open टेनिस 2026 चे महिला एकेरी विजेत पद कोणी पटविले ?

19 / 100

छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा (स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण) कोठे उभारण्यात आला ?

20 / 100

06 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोणी सादर केला ?

21 / 100

सध्या (2026) महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत ?

22 / 100

भारताच्या गान कोकिळा कोणाला म्हटले जाते ?

23 / 100

01 मे महाराष्ट्र दिन गीताचे लेखक कोण आहेत ?

24 / 100

सध्याचे भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत ?

25 / 100

खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे गृह मंत्री कोण आहेत ?

26 / 100

शाहू महाराज सध्या कोणत्या मतदार संघाचे खासदार आहेत ?

27 / 100

उजनी धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?

28 / 100

गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो ?

29 / 100

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण आहेत ?

30 / 100

महाराष्ट्रामध्ये किती महसुली प्रशासकीय विभाग आहेत ?

31 / 100

भारताच्या राष्ट्रध्वज किती रंग आहेत ?

32 / 100

नुकताच खालीलपैकी कोणावर संसदेत महाभियोग चालविला गेला ?

33 / 100

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या ?

34 / 100

जिल्ह्याचा पोलीस प्रमुख कोण होतो ?

35 / 100

महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत ?

36 / 100

सध्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ?

37 / 100

आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?

38 / 100

संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे ?

39 / 100

भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हणतात ?

40 / 100

भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?

41 / 100

खेडेगावात जन्ममृत्यूची नोंद कोण ठेवतो ? 

42 / 100

महाराष्ट्रातील वर्तमानपत्राची सुरुवात 1789 मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली ?

43 / 100

खालीलपैकी भिल्लांचा उठाव कोठे झाला ?

44 / 100

इ.स.

1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालासा केली ?

45 / 100

खालीलपैकी कोणते मुलद्रव्य किरणोत्सारी मुलद्रव्य म्हणून गणता येणार नाही ?

46 / 100

तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक 02 चे थंड हवेचे ठिकाण असून त्याची समुद्रसपाटी पासून उंची किती मीटर आहे ?

47 / 100

पृथ्वीवर कोणत्या प्रजातीची संख्या सर्वात जास्त आहे ?

48 / 100

खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही ?

49 / 100

2011 च्या जनगणनेचे घोषवाक्य कोणते ?

50 / 100

राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?

51 / 100

पुढीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती ?

63550, 90047, 81344, 72551

52 / 100

$64:10::39:?$

53 / 100

4/5 : 16/15 :: 3 😕

54 / 100

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?

90, 63, 70, 43, 55, 28, ?, ?

55 / 100

विधीमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रीपद मिळाल्यास ते किती दिवसापर्यंत वैद्य राहते ?

56 / 100

कोहीमा शहर हे कोणत्या राज्याची राजधानी आहे ?

57 / 100

तापी नदीची उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे ?

58 / 100

मुंबई हे कोणत्या रेल्वे झोनचे मुख्यालय आहे ?

59 / 100

अझरबैजान या देशाची राजधानी कोणते शहर आहे ?

60 / 100

गुरुजी किंचित हसले, या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा ?

61 / 100

खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा ?

62 / 100

खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा ?

63 / 100

नदी सागराला भेटते, या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा ?

64 / 100

देवघर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे ?

65 / 100

$7/12$ च्या 6% किती ?

66 / 100

पुढील अक्षर क्रमिकेमध्ये प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा ?

FKP, HNT, JQX, LTB, ?

67 / 100

पुढील अक्षर क्रमिकेमध्ये प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा ?

AZ, DW, GT, JQ, ?

68 / 100

0, 4, 18, , 100, 180, 294

69 / 100

53, 58, 75, 94, 115, ?

70 / 100

खालील श्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?

5040, 720, 120, 24, ?, 2, 1

71 / 100

C ही A ची एकुलती एक नणंद आहे, C ही B ची आत्या आहे, D हा C चा एकुलता एक भाऊ आहे, तर A ही D ची कोण ?

72 / 100

जर P हा M चा भाऊ आहे, Q हा M चा मुलगा आहे, P ची मुलगी R हीचे T शी लग्न झालेले आहे.

M आणि S या बहिणी आहेत, तर S चे Q शी नातेसंबंध काय असेल ?

73 / 100

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय ओळखा : 49:7:: 121:?

74 / 100

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय ओळखा.

18:30::27:?

75 / 100

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय ओळखा.

$26:37::65:?$

76 / 100

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय ओळखा.

27:36:49:?

77 / 100

दिलेली अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास NIGHT या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दातील अक्षरांच्या अनुक्रमांकाचा गट दिलेल्या पर्यायापैकी कोणता येईल ?

78 / 100

दिलेल्या अक्षरमालिकेवरुन जर $DO=33$, $COME=68$ तर RUL = किती ?

79 / 100

'मला आता चालवते' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ?

80 / 100

पुढीलपैकी विशेषण असणारा पर्याय निवडा ?

81 / 100

त्यावेळी किरट्या आवाजात तक्रार करणारे ते चाक सहज कुणाचेही लक्ष वेधत होते. (या वाक्यात एकूण नामे किती ?)

82 / 100

पुढीलपैकी पररुपसंधी असलेल्या शब्दाचा पर्याय ओळखा ? 

83 / 100

पुढीलपैकी गुजराती भाषेतील शब्द कोणता ?

84 / 100

आधी शिदोरी मग------?

85 / 100

गंभीर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय ?

86 / 100

मी रोज काम करत जाईन हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

87 / 100

मराठीत किती वचन आहेत ?

88 / 100

74088 घनमूळ किती ?

89 / 100

AABABCABCDABCDEABCDEF?

90 / 100

जर MQ= PU, $SD=VH,$ तर $TI=?$

91 / 100

जर एक क्रमांक 59P8257, 13 ने अगदी विभाज्य आहे, तर $P=$ ?

92 / 100

औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे ?

93 / 100

ययाती या कादंबरीचे लेखक कोण ?

94 / 100

ओझोनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या स्तरावर असतो ?

95 / 100

भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?

96 / 100

म्युकरमायकोसिस हा आजार कोणत्या कारणाने होतो ?

97 / 100

हा, ही, हे, ही सर्व नामे कोणत्या प्रकारची आहेत ?

98 / 100

खालीलपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा ?

99 / 100

चाकूने पेरू कापला या वाक्यातील विभक्ती ओळखा ?

100 / 100

'पक्षी आकाशात उडाला' या वाक्यातील प्रयोग ओळखा ?

Your score is

📝 SRPF दौंड भरती विशेष: महत्वाचे प्रश्न आणि सविस्तर स्पष्टीकरण

खालील प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि योग्य उत्तराचा सराव करा:

प्रश्न 1) ‘पक्षी आकाशात उडाला’ या वाक्यातील प्रयोग ओळखा?

  • A) भावे प्रयोग
  • B) कर्मणी प्रयोग
  • C) अकर्मक कर्तरी प्रयोग
  • D) सकर्मक कर्तरी प्रयोग

💡 योग्य उत्तर: C) अकर्मक कर्तरी प्रयोग

स्पष्टीकरण: या वाक्यात ‘उडणारा’ तो पक्षी (कर्ता) आहे. क्रियापदाचा रोख कर्माकडे नसून वाक्यात कर्म आलेलेच नाही. तसेच कर्त्याच्या लिंग-वचनानुसार क्रियापद बदलते (उदा. चिमणी आकाशात उडाली), म्हणून हा ‘अकर्मक कर्तरी प्रयोग’ आहे.


प्रश्न 2) चाकूने पेरू कापला या वाक्यातील विभक्ती ओळखा?

  • A) तृतीया
  • B) पंचमी
  • C) अपादान
  • D) षष्ठी

💡 योग्य उत्तर: A) तृतीया

स्पष्टीकरण: वाक्यात ‘चाकूने’ या शब्दाला ‘ने’ हा प्रत्यय लागला आहे. ‘ने, ए, शी’ हे प्रत्यय तृतीया विभक्तीचे असून ते वाक्यातील मुख्य कारकार्थ ‘करण’ म्हणजेच ‘साधन’ (कापण्याचे साधन – चाकू) दर्शवतात.


प्रश्न 3) खालीलपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा?

  • A) निरोगी
  • B) शौर्य
  • C) आरोग्य संपन्न
  • D) सुदृढ

💡 योग्य उत्तर: B) शौर्य

स्पष्टीकरण: ‘निरोगी’, ‘आरोग्य संपन्न’ आणि ‘सुदृढ’ हे तिन्ही शब्द एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारे ‘विशेषणे’ आहेत. याउलट, ‘शौर्य’ हे एक भाववाचक नाम आहे.


प्रश्न 4) हा, ही, हे, ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत?

  • A) संबंधी सर्वनामे
  • B) प्रश्नार्थक सर्वनामे
  • C) दर्शक सर्वनामे
  • D) आत्मवाचक सर्वनामे

💡 योग्य उत्तर: C) दर्शक सर्वनामे

स्पष्टीकरण: आपल्या जवळची किंवा दूरची वस्तू, प्राणी अथवा व्यक्ती बोटाने दाखवण्यासाठी जी सर्वनामे वापरली जातात, त्यांना ‘दर्शक सर्वनामे’ म्हणतात.


प्रश्न 5) म्युकरमायकोसिस हा आजार कोणत्या कारणाने होतो?

  • A) जिवाणू
  • B) विषाणू
  • C) बुरशी
  • D) प्रोटोजोआ

💡 योग्य उत्तर: C) बुरशी

स्पष्टीकरण: म्युकरमायकोसिस (ज्याला सामान्य भाषेत ‘ब्लॅक फंगस’ देखील म्हटले जाते) हा एक दुर्मिळ पण अतिशय गंभीर संसर्ग असून तो बुरशीमुळे (Fungus) होतो.


फ्री पोलिस भरती टेस्ट

प्रश्न 6) भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता?

  • A) पद्मश्री
  • B) पद्मविभूषण
  • C) पद्मभूषण
  • D) भारतरत्न

💡 योग्य उत्तर: D) भारतरत्न

स्पष्टीकरण: ‘भारतरत्न’ हा भारतीय प्रजासत्ताकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. या पुरस्काराची सुरुवात 2 जानेवारी 1954 मध्ये झाली होती.


प्रश्न 7) ओझोनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या स्तरावर असतो?

  • A) उष्णकटिबंधीय
  • B) समतापमंडळ
  • C) मेसोस्फिअर
  • D) आयनोस्फियर

💡 योग्य उत्तर: B) समतापमंडळ

स्पष्टीकरण: ओझोन वायूचा (O₃) मुख्य थर वातावरणाच्या ‘समतापमंडळ’ (Stratosphere) या थरामध्ये आढळतो. हा थर सूर्यापासून येणाऱ्या घातक अतिनील (UV) किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करतो.


प्रश्न 8) ‘ययाती’ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत?

  • A) शिवाजी सावंत
  • B) पु. ल. देशपांडे
  • C) साने गुरुजी
  • D) वि. स. खांडेकर

💡 योग्य उत्तर: D) वि. स. खांडेकर

स्पष्टीकरण: प्रसिद्ध मराठी कादंबरी ‘ययाती’ चे लेखक विष्णू सखाराम (वि. स.) खांडेकर हे आहेत. विशेष म्हणजे, या कादंबरीला मराठी साहित्यातील पहिला अत्यंत प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे.


प्रश्न 9) औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे?

  • A) कोल्हापूर
  • B) सोलापूर
  • C) सांगली
  • D) सातारा

💡 योग्य उत्तर: C) सांगली

स्पष्टीकरण: औदुंबर हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रसिद्ध दत्तक्षेत्र आणि पवित्र देवस्थान आहे. हे ठिकाण सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या नयनरम्य काठावर वसलेले आहे.


प्रश्न 10) जर ’59P8257′ ही संख्या 13 ने पूर्णपणे विभाज्य असेल, तर $P =$ किती?

  • A) 1
  • B) 2
  • C) 3
  • D) 4

💡 योग्य उत्तर: C) 3

स्पष्टीकरण: जर आपण $P$ च्या जागी पर्याय क्रमांक ‘C’ म्हणजेच 3 ही संख्या ठेवली, तर ‘5938257’ ही संख्या तयार होते. आता या संख्येला 13 ने भागल्यास:

$$5938257 \div 13 = 456789$$

येथे पूर्ण भाग जातो आणि बाकी शून्य उरते, म्हणून $P$ च्या जागी 3 ही किंमत अगदी योग्य ठरेल.


🎯 तुमच्या यशाची खात्री – आमच्यासोबत जोडा!

अशाच नवनवीन मोफत टेस्ट सिरीज, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Paper PDF) आणि रोजच्या चालू घडामोडींच्या सरावासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा.

📲 Daily MCQ आणि Mock Test साठी आमच्या Telegram channel ला join करा!

👉 Join Now: https://t.me/gsestudypoint


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page

© 2026 Gsestudypoint | Learn Education
Privacy PolicyContact UsAbout UsDMCATerms & ConditionsDisclaimer