🔥 Latest Updates

पुणे चालक पोलीस पेपर टेस्ट 2026 | Free Mock Test | Driver Police Bharti

🚔 पुणे चालक पोलीस सराव पेपर – २०२६ 🚔

Pune City & District Police Driver | High-Level Mock Test


🏁 विद्येच्या माहेरघरातून खाकी वर्दीच्या प्रवासाकडे: तुमची जिद्द, आमचे मार्गदर्शन!

नमस्कार पुण्याच्या माझ्या अभ्यासू आणि कष्टाळू भावी पोलीस चालक शिलेदारांनो,

पुणे पोलीस दलात ‘सारथी’ म्हणून सामील होणे ही एक मानाची गोष्ट आहे. पुण्याची पोलीस भरती ही नेहमीच तिच्या ‘काठिण्य पातळी’साठी ओळखली जाते. इथे केवळ शारीरिक क्षमता असून चालत नाही, तर गणितातील क्लिष्ट आकडेमोड आणि तार्किक प्रश्नांमध्ये तुमची पकड ‘पुणेरी पाट्यांसारखी’ स्पष्ट आणि अचूक असावी लागते.

या टेस्टचे वैशिष्ट्य:

पुणे चालक भरतीच्या मागील वर्षांच्या कलानुसार, लेखी परीक्षेत सरासरी, लसावि-मसावि आणि कामाच्या गणितावर विशेष भर दिला जातो. म्हणूनच GS eStudy Point ने या विशेष सराव संचात अशा प्रश्नांची निवड केली आहे जे तुमच्या मेंदूला पुरेसा व्यायाम देतील:

  • सरासरी लॉजिक: क्रिकेटमधील धावांच्या सरासरीवर आधारित गुंतागुंतीचे प्रश्न.
  • संख्या शास्त्र: दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज आणि गुणाकाराचे समीकरण.
  • कार्य व वेळ (Work & Time): कबीर, अक्षय आणि सत्यम यांच्या कामाची गुंतागुंत.
  • लोकसंख्या व टक्केवारी: वाढत्या लोकसंख्येनुसार स्त्री-पुरुषांचे अचूक प्रमाण शोधणे.

पुणेरी जिद्दीने ही टेस्ट सोडवा आणि स्वतःचे मेरिट तपासा. चला तर मग, सुरुवात करूया!

पुणे जिल्हा चालक पोलीस पेपर टेस्ट २०२६

📝 चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट – पुणे जिल्हा २०२६

चालक पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही विशेष संभाव्य पेपर टेस्ट तयार करण्यात आली आहे. पुणे जिल्हा येथील २०२६ च्या भरती परीक्षेचा विचार करून, नवीन परीक्षापद्धतीनुसार हा सराव पेपर तयार करण्यात आला आहे. चालक चिन्हे (Traffic Signs), वाहन नियम आणि रस्ते सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर आधारित हा पेपर तुम्हाला प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव देईल.

मागील प्रश्नपत्रिका, बदललेला पॅटर्न आणि संभाव्य प्रश्नांचा सखोल अभ्यास करून ही टेस्ट तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे तुमची तयारी अधिक प्रभावी होईल.

✨ या संभाव्य पेपरची वैशिष्ट्ये:

📌 परीक्षेत विचारले जाऊ शकणारे संभाव्य प्रश्न

📌 चालक चिन्हे (Traffic Signs) वर विशेष भर

📌 वाहन नियम व रस्ते सुरक्षा विषयक महत्त्वाचे प्रश्न

📌 नवीन पोलीस भरती पॅटर्ननुसार प्रश्नरचना

📌 वेळेचे योग्य नियोजन करण्यासाठी उपयुक्त सराव

📌 आत्मविश्वास वाढवणारा पूर्ण पेपर अनुभव

🚔 ही संभाव्य टेस्ट का सोडवावी?

चालक पोलीस भरती परीक्षेत यश मिळवण्यासाठी केवळ अभ्यास पुरेसा नसून नियमित सरावही तितकाच गरजेचा आहे. ही संभाव्य पेपर टेस्ट सोडवून तुम्ही तुमची तयारी तपासू शकता, चुका सुधारू शकता आणि अंतिम परीक्षेसाठी स्वतःला अधिक सक्षम बनवू शकता.

💯 दररोज सराव करा, अपडेट राहा आणि पुणे जिल्हा चालक पोलीस भरती २०२६ मध्ये यश मिळवा!

1 / 100

क दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात राहूल याची 5 डावातील सरासरी धावसंख्या 97 आहे. कोणत्याही डावात त्याची धावसंख्या 82 पेक्षा कमी नाही, तर कुठल्याही एका डावात जास्तीत जास्त धावसंख्या किती असू शकेल ?

2 / 100

$5^{m}\div5=5^{5}$ या समीकरणामधील m ची किंमत काढा.

3 / 100

$X=(3.42)^{2}-2(3.42)(1.22)+(1.22)^{2}$ तर $X=?$

4 / 100

जर दोन संख्यांची बेरीज 22 असेल व त्यांच्या वर्गाची बेरीज 404 असेल, तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती ?

5 / 100

दोन संख्यांचा म.सा.वी. आणि ल.सा.वी. अनुक्रमे 6 व 72 आहे. जर दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे. तर त्या दोन संख्यातील लहान संख्या कोणती ?

6 / 100

एक काम पूर्ण करायला कबीरला अक्षयपेक्षा 10 दिवस कमी लागतात. तर तेच काम करायला सत्यमला अक्षयपेक्षा 15 दिवस जास्त लागतात. जर कबीर आणि अक्षय दोघे मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करत असतील तर अक्षय आणि सत्यमला हे काम पुर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील ?

7 / 100

एका गावची लोकसंख्या 3000 असून पुरुष 10% वाढले आणि स्त्रिया 20% वाढल्या तेव्हा एकुण लोकसंख्या 3500 झाली. तर गावातील स्त्रियांची संख्या किती ?

8 / 100

मनिष व त्याची 3 मुले व त्यांच्या वयाची सरासरी 13 आहे. सर्वात लहान मुलाचे वय 2 वर्षे आहे. मुलांमध्ये 2-2 वर्षाचे अंतर आहे. तर मनिषचे वय किती आहे ?

9 / 100

एक जहाज ताशी 30 किमी वेगाने समुद्रातून जात आहे. त्या समुद्राच्या खोलीचा अंदाज घेण्यासाठी त्यांनी $200~m/s$ वेगाच्या रेडिओलहरी तळाकडे सोडल्या. ज्यावेळी त्या लहरींचा सिग्नल परत जहाजावर मिळाला तेव्हा जहाज 500 मी अंतर पुढे सरकले होते. तर त्या समुद्राची खोली किती होती ?

10 / 100

एक टाकी A नळाने 8 तासात, तर B नळाने 6 तासात भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले व दोन तासांनी A नळ बंद केला तर B नळाने उरलेली टाकी भरण्यास किती वेळ लागेल ?

11 / 100

दोन रेल्वेच्या लांब्या 400 मीटर व 300 मीटर असून, त्या एकाच दिशेने धावत आहेत. पहिल्या रेल्वेचा वेग 80 कि. मी./ तास व दुस-या रेल्वेचा वेग 116 कि.मी./ तास असल्यास त्या रेल्वे एकमेकींना किती वेळेत ओलांडतील ?

12 / 100

एका वस्तुची विक्री किंमत तोट्याच्या 19 पट आहे तर शेकडा तोटा किती होईल ?

13 / 100

12 लि द्रावणात 5% साखर आहे. त्या द्रावणाला उकळल्यानंतर 2 लि पाणी द्रावणातून कमी झाले. तर उरवरीत द्रावणात साखरेचे प्रमाण किती ?

14 / 100

विजयला दररोज रु. 150 पगार मिळतो. त्यापैकी भोजनावर 2/5 खर्च होतो व राहिलेल्यापैकी 1/3 घर खर्च होतो. तर दररोज किती रक्कम शिल्लक राहते ?

15 / 100

एक व्यक्ती रेल्वे पूलावर उभी असुन त्यापुलाची लांबी 180 मी. आहे. एक आगगाडी त्याव्यक्तीस 8 सेकंदात व पुलास 20 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी व वेग शोधा.

16 / 100

साखरेची किंमत 60% ने वाढली. घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ?

17 / 100

अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा.

18 / 100

$1/(856\times592)+1/(856\times264) - 1/(592\times264)$ ची किंमत आहे ?

19 / 100

$1/5+2/4+3/3+4/2+5/1=?$

20 / 100

$97/?=24.25\times4^{2}$

21 / 100

अपघातप्रसंगी पोलीसांची मुदत मिळविण्यासाठी कोणता दुरध्वनी क्रमांक डायल कराल ?

22 / 100

दिवसाच्यावेळी कोणत्या परिस्थीतीत तुम्ही डीपरचा वापर कराल ?

23 / 100

P.U.C.C. चा अर्थ काय ?

24 / 100

वाहनामध्ये हे ठेवू नये ?

25 / 100

कोणत्या हॉर्नला परवानगी आहे ?

26 / 100

रस्त्यामधील सलग दोन पिवळ्या रेषा काय दर्शवितात ?

27 / 100

वाहनातील ओडोमिटर काय दर्शविते ?

(i) वाहनाचा वेग (ii) वाहनाने कापलेले अंतर 

28 / 100

दुचाकी व चारचाकी खाजगी वाहनांच्या नोंदणीची विधिग्राह्यता किती असते ?

29 / 100

हलके खाजगी वाहन (उदा. कार, जीप) चालविण्यासाठी मोटार वाहन कायद्याने किमान वयोमर्यादा किती आहे ?

30 / 100

वाहन वळविण्याचे संदर्भात पी.एस.एल. तंत्राचा अर्थ काय ?

31 / 100

वाहन वळविण्याचे प्रक्रियेत एम.एस.एम. चा अर्थ काय ?

32 / 100

चालकाने लायसन्स व नोंदणीचे प्रमाणपत्र हजर करणे किंवा दाखविणे यासंबधी काय तरतुद आहे ?

33 / 100

पाय फळीवरुन उतारु वाहून न नेण्यासंबधी ... तरतुद आहे ?

34 / 100

वाहनाची गती कमी करताना ?

35 / 100

तीव्र उताराचा घाट उतरताना तुमचे वाहन ?

36 / 100

पाठीमागील वाहन हेड लाईटचा प्रकाशझोत दाखवित आहे याचा अर्थ काय ?

37 / 100

प्रत्येक मोटार वाहनास कोणता विमा असणे सक्तीचे आहे ?

38 / 100

मद्य प्राशन करुन वाहन चालविताना आढळल्यास होणारी शिक्षा ?

39 / 100

नवीन वाहनांसाठीचा एक रक्कमी कर किती कालावधीसाठी असतो ?

40 / 100

हे चिन्ह काय दर्शविते ?

41 / 100

कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ?

42 / 100

देशातील पहिली मायक्रो क्षेपणास्त्र आधारीत काउंटर ड्रोन प्रणाली खालीलपैकी कोणती आहे ?

43 / 100

शरिरामध्ये युरीयाचे वहन कोण करते ?

44 / 100

मार्गदर्शक तत्वांच्या प्रकरणातील कोणत्या कलमाने दारुबंदी करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत ?

45 / 100

डॉ. बी. आर. आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे ?

46 / 100

भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात सहा ते चौदा वर्षे वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतुद केली आहे ?

47 / 100

बँकेत धनादेशाचे वाचन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो ?

48 / 100

तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते ?

49 / 100

श्रमिकाची शून्य सीमांत उत्पादकता म्हणजे ........

50 / 100

बंधन एक्सप्रेस कोणत्या दोन देशांदरम्यान धावते ?

51 / 100

भारतात चहा उत्पादनात ........ राज्याचा प्रथम क्रमांक आहे.

52 / 100

सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेशातील स्थानिक वेळेत कित्ती तासांचा फरक आहे ?

53 / 100

हाटे 3:00 वा. लंडन येथून प्रसारीत होणारी बातमी अलाहाबाद ($82^{\circ}30^{\prime}$ पूर्व रेखावृत्त) येथे किती वाजता ऐकायला येईल ?

54 / 100

महाराष्ट्र राज्याची निर्मिती ........ रोजी झाली.

55 / 100

१८७५ साली आर्य समाजाची स्थापना ........ यांनी केली.

56 / 100

छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती ?

अ) विजयी मराठा ब) तरुण मराठा क) कैवारी ड) तेज

57 / 100

आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण ?

58 / 100

संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?

59 / 100

कोणत्या महसुल पध्दतीत शेतकरी जमीनमालक बनले ?

60 / 100

ब्रिटीश काळातील भारताचे अनुद्योगीकरण म्हणजे ?

61 / 100

'फिकट पिवळे फूल मला आवडते' या वाक्यातील विशेषण कोणते ?

62 / 100

'माझे पुस्तक' या शब्दातील 'माझे' हा शब्द आहे ?

63 / 100

खालीलपैकी सत्यानाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा ?

64 / 100

'विद्यार्थ्याला बक्षीस दिले' हे कोणते कारक आहे ?

65 / 100

'दिवाळीत पणत्या लावतात' या वाक्यातील अधोरेखित नामाचे वचन ओळखा ?

66 / 100

पुढील सामासिक शब्दांचे लिंग क्रमाने ओळखा ?

साखरभात, देवघर, मीठभाकर

67 / 100

वकिली, सौंदर्य, शांतता, गारवा ही कोणत्या प्रकारची नामे आहे ?

68 / 100

'तपोबल' हि संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे सोडवता येईल ?

69 / 100

पुढीलपैकी कोणता शब्द वेगळ्या स्वराने सुरु झालेला आहे ?

70 / 100

अयोग्य जोडी ओळखा ?

71 / 100

'यशोधन' या शब्दाचा संधीप्रकार ओळखा ?

72 / 100

'देवालय' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

73 / 100

जोडाक्षर म्हणजे काय ?

74 / 100

'व्यंजनाने शेवट होणे' या अर्थी खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे ?

75 / 100

करण हे भाषा शुध्द करणाऱ्या प्रयोजनाला बांधलेले आदेशात्मक शास्त्र आहे' असे मत कोणत्या व्याकरणकाराने प्रथम मांडले आहे ?

76 / 100

'वाक्य म्हणजे '?

77 / 100

मराठी भाषा गौरव दिन कधी असतो ?

78 / 100

खालीलपैकी द्रविडियन गटातील भाषा कोणत्या ?

79 / 100

खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणत्या ?

80 / 100

"सेतुबंध" हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे ?

81 / 100

पाणी टंचाईमुळे घरी नळाला दर पाच दिवसांनी पाणी येते. तर दोन आठवड्यापूर्वी नळाला पाणी आले होते. तर यापुढे पुन्हा नळाला पाणी केव्हा येईल ?

82 / 100

एका वर्गातील 14 विद्यार्थीनी एकमेकास हस्तांदोलन केले. तेव्हा एकुण किती वेळा हस्तांदोलन झाले ?

83 / 100

अनिल, संजय, सुनिल, दिपक, महेश, प्रशांत, सुरेश ही सात मुले एका रांगेत बसली आहेत. सुनिल, दिपक व अनिलच्या मध्ये महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आणि संजय हा दिपक व प्रशांत यांच्यामध्ये आहे. अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहे, तर दिपक कोणाच्या मध्ये आहे ?

84 / 100

२००१ चा एड्स दिन गुरुवारी होता, तर त्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी होता ?

85 / 100

A या ठिकाणच्या पूर्वेला 5 कि.मी. दूर अंतरावर B हे ठिकाण आहे. B च्या उत्तरलेला 5 कि.मी. अंतरावर C हे ठिकाण आहे व C च्या पूर्वेला 7 कि.मी. अंतरावर D हे ठिकाण आहे, तर A आणि D मधील सरळ अंतर किती ?

86 / 100

शितल दक्षिणेच्या दिशेने 20 कि.मी. चालते, वळते व पूर्वेकडे 10 कि.मी. पळते नंतर वळून दक्षिणेकडे 5 कि.मी. चालते आणि वळून पश्चिमेकडे 10 कि.मी. चालते. ती निघाली तिथपासून आता किती अंतरावर आहे ?

87 / 100

BABA = 2121, KAKA = 111111 तर MAMA = ?

88 / 100

EDCBA, JIHGF, ONMLK, ?

89 / 100

गटात न बसणारा ओळखा ?

90 / 100

एका सांकेतिक भाषेत 573 चा अर्थ BRING COLD WATER असा होतो, 342 चा अर्थ WATER IS GOOD आणि 126 चा अर्थ BRIGHT GOOD BOY असा होतो, तर BOY IS BRIGHT साठी खालीलपैकी काय येणार ?

91 / 100

सूर्यापासून अंतराच्या दृष्टीने (कमी ते जास्त) खालील ग्रहांचा क्रम लावा ?

(१) शुक्र (२) पृथ्वी (३) बुध (४) गुरू (५) मंगळ

92 / 100

ACE: 135:: LOQ: ?

93 / 100

ताजमहाल : आग्रा : चार्मिनार : ?

94 / 100

प्रकाश त्याच्या घरापासून पश्चिमेला सरळ रेषेत चार किलोमीटर चालत गेला, नंतर उत्तरेला सरळ तीन किलोमीटर चालत गेला तर तो त्याच्या मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे ?

95 / 100

डॉक्टरला वकील म्हटले, वकीलास शिक्षक म्हटले, शिक्षकाला अभियंता म्हटले व अभियंत्याला डॉक्टर म्हटले तर रुग्णाला कोण तपासेल ?

96 / 100

सागर तात्यांना म्हणाला, "तुमच्या भावाची मुलगी ही माझ्या मामाची भाची आहे. " तर सागर तात्यांचा कोण ?

97 / 100

शेजारील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत ?

98 / 100

22 36 43 50? या संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?

99 / 100

AZ, DW, GT, ? या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ?

100 / 100

$19.2\div4.8\times4.04+3.84=?$ 

Your score is

📝 सविस्तर विश्लेषण

Q1. [सरासरी] एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात राहुलची ५ डावातील सरासरी धावसंख्या ९७ आहे. कोणत्याही डावात त्याची धावसंख्या ८२ पेक्षा कमी नाही, तर कुठल्याही एका डावात जास्तीत जास्त धावसंख्या किती असू शकेल?

(A) १७२

(B) १५७

(C) ९८

(D) १५१

✅ उत्तर: (B) १५७

Q2. [संख्या शास्त्र] जर दोन संख्यांची बेरीज २२ असेल व त्यांच्या वर्गांची बेरीज ४०४ असेल, तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती?

(A) ३०

(B) ४०

(C) ६६

(D) १२६

✅ उत्तर: (B) ४०

Q3. [लसावि-मसावि] दोन संख्यांचा म.सा.वि. आणि ल.सा.वि. अनुक्रमे ६ व ७२ आहे. जर त्या दोन संख्यांचे गुणोत्तर ३:४ असेल, तर त्या दोन संख्यांतील लहान संख्या कोणती?

(A) ९

(B) १२

(C) १८

(D) ३६

✅ उत्तर: (C) १८

Q4. [काम व वेळ] एक काम पूर्ण करायला कबीरला अक्षयपेक्षा १० दिवस कमी लागतात. तर तेच काम करायला सत्यमला अक्षयपेक्षा १५ दिवस जास्त लागतात. जर कबीर आणि अक्षय दोघे मिळून एक काम १२ दिवसात पूर्ण करत असतील, तर अक्षय आणि सत्यमला हे काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?

(A) १०

(B) २५

(C) २७

(D) १८

✅ उत्तर: (D) १८

Q5. [टक्केवारी] एका गावची लोकसंख्या ३००० असून पुरुष १०% वाढले आणि स्त्रिया २०% वाढल्या तेव्हा एकूण लोकसंख्या ३५०० झाली. तर गावातील स्त्रियांची संख्या किती होती?

(A) ४०००

(B) ३०००

(C) २०००

(D) यापैकी नाही

✅ उत्तर: (C) २०००


🔍 मास्टर क्लास: प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण

📌 १. कमाल धावसंख्या लॉजिक:

  • ५ डावांची एकूण धावसंख्या $= ५ \times ९७ = ४८५$.
  • जास्तीत जास्त धावा एका डावात काढण्यासाठी उरलेल्या ४ डावात किमान (८२) धावा असाव्यात.
  • ४ डावांच्या किमान धावा $= ४ \times ८२ = ३२८$.
  • एका डावातील कमाल धावा $= ४८५ – ३२८ = \mathbf{१५७}$.

📌 २. वर्गांची बेरीज:

  • $(x+y)^2 = x^2 + y^2 + 2xy$
  • $(२२)^२ = ४०४ + २xy \implies ४८४ = ४०४ + २xy$
  • $२xy = ८० \implies xy = \mathbf{४०}$.

📌 ३. लसावि-मसावि ट्रिक:

  • लहान संख्या $= ३ \times ६ = \mathbf{१८}$
  • मोठी संख्या $= ४ \times ६ = २४$
  • ताळा: १८ आणि २४ चा मसावि ६ येतो आणि लसावि ७२ येतो.

📌 ४. अक्षय आणि सत्यमचे काम:

  • समीकरण सोडवल्यास अक्षयला ३० दिवस लागतात, कबीरला २० दिवस.
  • सत्यमला अक्षयपेक्षा १५ दिवस जास्त म्हणजे ३० + १५ = ४५ दिवस लागतात.
  • अक्षय व सत्यम मिळून $= \frac{३० \times ४५}{३० + ४५} = \frac{१३५०}{७५} = \mathbf{१८}$ दिवस.

📌 ५. लोकसंख्या वाढ:

  • समजा पुरुष $x$, स्त्रिया $(३००० – x)$.
  • $०.१x + ०.२(३००० – x) = ५००$ (कारण ५०० लोक वाढले).
  • समीकरण सोडवल्यास स्त्रियांची संख्या २००० येते.

🚀 यशाचा ‘पुणेरी’ मार्ग: आमच्याशी जोडून राहा!

भावी चालक मित्रांनो, तुमची मेहनतच तुम्हाला पुणे पोलीस दलाची वर्दी मिळवून देणार आहे. पुणे चालक भरतीचे सर्व अपडेट्स आणि डेली फ्री मॉक टेस्टसाठी आजच आमच्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा.

📲 Daily MCQ आणि Mock Test साठी:

👉 Join Now: https://t.me/gsestudypoint



इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page

© 2026 Gsestudypoint | Learn Education
Privacy PolicyContact UsAbout UsDMCATerms & ConditionsDisclaimer