🔥 Latest Updates

पुणे बँड्समन जिल्हा पोलीस टेस्ट 2026 | Free Mock Test

👮 पुणे जिल्हा पोलीस बँड्समन भरती २०२६: यशाचा रणसंग्राम!

नमस्कार महाराष्ट्र पोलीस दलातील भावी शिलेदारांनो! 🫡

पुणे जिल्हा आणि पुणे शहर पोलीस दल म्हणजे मानाची आणि शिस्तीची खाकी! येथील ‘बँड्समन’ पदासाठीची तयारी करणाऱ्या प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं की, आपल्या कर्तृत्वाने या ऐतिहासिक मातीत स्वतःची ओळख निर्माण करावी. पण पुण्याची भरती जितकी मानाची, तितकीच ती आव्हानात्मकही असते. येथील पेपरमध्ये प्रश्नांची गुंफण अशी असते की, जिथे केवळ माहिती असून चालत नाही, तर ‘स्मार्ट वर्क’ आणि ‘टाईम मॅनेजमेंट’ यांचा मेळ घालणे गरजेचे असते.

तुमचा हाच प्रवास सुकर करण्यासाठी आणि तुम्हाला परीक्षेच्या प्रत्यक्ष वातावरणाची प्रचिती देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत— Free Mock Test 2026!

या टेस्टची खास वैशिष्ट्ये आणि तुम्हाला होणारा फायदा:

  • पुणेरी पॅटर्नचा सराव: पुण्याच्या परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या गणिताच्या ‘ट्रिकी’ प्रश्नांवर विशेष लक्ष.
  • विषयांची अचूक मांडणी: मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके या चारही विषयांचा समतोल.
  • नवे बदल, नवा दृष्टिकोन: २०२६ च्या भरती प्रक्रियेतील संभाव्य बदल लक्षात घेऊन प्रश्नांची निवड.
  • स्वतःचे मूल्यमापन: ही टेस्ट सोडवल्यानंतर तुम्हाला समजेल की, गणिताच्या कोणत्या विषयात तुमचा वेळ जास्त जातोय आणि कुठे सुधारणेची गरज आहे.

मित्रांनो, पुण्याच्या मैदानात टिकण्यासाठी शरीरात ताकद आणि डोक्यात चपळाई लागते, तशीच ही चपळाई तुमच्या लेखी परीक्षेतही हवी! चला तर मग, या टेस्टच्या माध्यमातून स्वतःची तयारी तपासून पहा. ✍️

पुणे बँड्समन जिल्हा पोलीस 2026

📝 पुणे बँड्समन जिल्हा पोलीस टेस्ट २०२६

बँड्समन पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही विशेष संभाव्य पेपर टेस्ट तयार करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील २०२६ च्या भरती परीक्षेचा विचार करून, नवीन परीक्षापद्धतीनुसार हा सराव पेपर तयार करण्यात आला आहे. बँड संबंधित ज्ञान (Band Knowledge), वाद्यांची माहिती, ताल-लय, तसेच सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर आधारित हा पेपर तुम्हाला प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव देईल.

मागील प्रश्नपत्रिका, बदललेला पॅटर्न आणि संभाव्य प्रश्नांचा सखोल अभ्यास करून ही टेस्ट तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे तुमची तयारी अधिक प्रभावी होईल.


या संभाव्य पेपरची वैशिष्ट्ये:

📌 परीक्षेत विचारले जाऊ शकणारे संभाव्य प्रश्न
📌 बँड्समन संबंधित वाद्ये, ताल-लय यावर विशेष भर
📌 सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता विषयक महत्त्वाचे प्रश्न
📌 नवीन पोलीस भरती पॅटर्ननुसार प्रश्नरचना
📌 वेळेचे योग्य नियोजन करण्यासाठी उपयुक्त सराव
📌 आत्मविश्वास वाढवणारा पूर्ण पेपर अनुभव


🚔 ही संभाव्य टेस्ट का सोडवावी?

बँड्समन पोलीस भरती परीक्षेत यश मिळवण्यासाठी केवळ अभ्यास पुरेसा नसून नियमित सरावही तितकाच गरजेचा आहे. ही संभाव्य पेपर टेस्ट सोडवून तुम्ही तुमची तयारी तपासू शकता, चुका सुधारू शकता आणि अंतिम परीक्षेसाठी स्वतःला अधिक सक्षम बनवू शकता.


💯 दररोज सराव करा, अपडेट राहा आणि पुणे बँड्समन पोलीस भरती २०२६ मध्ये यश मिळवा! 🎯

1 / 100

एका आयताकृती भूखंडाची लांबी व रुंदीचे गुणोत्तर ८:३ आहे. त्याच्या सभोवती कुंपण घालण्यास मालकाने २० रूपये प्रति मीटर प्रमाणे ६६०० रूपये खर्च केले, तर त्या भूखंडाच्या लांबी व रुंदीतील फरक किती ?

2 / 100

एका चाकाचा व्यास ५६ सेमी. असल्यास, २०० फेऱ्यांत ते किती अंतर पुढे जाईल ?

3 / 100

आज जर सोमवार असेल तर ८३ दिवसानंतर कोणता वार येईल ?

4 / 100

सरळव्याजाने एका रकमेची दाम दुप्पट होण्यास १२.५ वर्षे लागतात तर त्याच रकमेची त्याच दराने चौपट रक्कम होण्यास किती वर्ष मुदत लागेल ?

5 / 100

२,६०० रूपयांची ८:५ या प्रमाणात, समीर व सुनिता या दोघांमध्ये वाटणी केली तर प्रत्येकाच्या वाट्याला ... . व.... इतके रूपये येतील ?

6 / 100

९ पुरुष एक काम १२ दिवसात पूर्ण करतात. जर ४ पुरुष ६ मुलांएवढे काम करीत असल्यास १८ मुले तेच काम किती दिवसांत पूर्ण करतील ?

7 / 100

(२⁷ x २⁻³)ˣ = ३२ तर x = किती ?

8 / 100

चार अंकी सर्वात मोठी पूर्ण वर्ग संख्या कोणती ?

9 / 100

१८०० या संख्येचे एकूण सम विभाजक किती ?

10 / 100

एका वर्तुळाची त्रिज्या २१ सेमी. असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा ?

11 / 100

१७२८ चे घनमूळ काढा ?

12 / 100

एक खादी कापड विक्रेत्याने ३०% रिबेट जाहीर केले. एका गिऱ्हाईकाला ८१० रुपयांचे रिबेट मिळवायचे असेल तर ४५० रुपये किंमतीचे किती सदरे त्याला खरेदी करावे लागतील ?

13 / 100

खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी कोणते अंदाजित मूल्य येईल ? (√३२५ + १२ ÷ ३ x २ - √१४५) ÷ २ = ?

14 / 100

एका रकमेवर ५ वर्षामध्ये प्रतिवर्ष १२% दराने रू. ७,६२० इतके सरळव्याज मिळाले तर ती रक्कम किती असेल ?

15 / 100

फोनची किंमत प्रथम ३०% वाढली आणि नंतर २५% ने कमी झाली, तर एकूण टक्केवारीत झालेला बदल शोधा.

16 / 100

एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ ३८४ cm² आहे आणि त्याच्या बाजूंचे गुणोत्तर २४:३२:४० आहे. तर त्रिकोणाची परिमिती किती असेल ?

17 / 100

एका संख्येच्या १/४ भागाचा २/३ भाग बरोबर ३०, तर ती संख्या कोणती ?

18 / 100

एका त्रिकोणाच्या दोन बाह्यकोनांची मापे अनुक्रमे १४० अंश व ११० अंश आहेत. तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा ?

19 / 100

द.सा.द.शे. ४ दराने ३१,२५० रू. मुद्दलाचे ३ वर्षात मिळणाऱ्या सरळव्याज व चक्रवाढ व्याज यांतील फरक किती ?

20 / 100

एक वस्तू २,८१६ रूपयांस विकल्यास १२% तोटा होतो. तर १२% नफा मिळविण्यास ती वस्तू किती रूपयांस विकावी ?

21 / 100

तीन व्यक्तींच्या वयांची सरासरी २८ वर्षे आहे आणि त्यांची वये अनुक्रमे ३:४:७ या प्रमाणात आहेत, तर सर्वात लहान व्यक्तीचे वय किती ?

22 / 100

'अ' आणि 'ब' यांनी एक धंदा सुरू केला. त्यात 'अ' ची गुंतवणूक 'ब' च्या गुंतवणुकीच्या दुप्पट असून 'अ' ने 'ब' च्या मुदतीच्या तिप्पट मुदतीसाठी गुंतवणूक केली. जर त्या धंद्यात 'ब' ला रुपये १२,००० नफा मिळाल्यास, त्या धंद्यात एकूण नफा किती झाला ?

23 / 100

एका पाण्याची रिकामी टाकी 'अ' नळाने १८ मिनिटांत तर 'ब' नळाने ३६ मिनिटांत भरते. भरलेली टाकी 'क' नळाने २४ मिनिटांत रिकामी होते. जर तीनही नळ एकाचवेळी चालू केले, तर ती रिकामी टाकी किती वेळात भरेल ?

24 / 100

दोन आगगाड्या अनुक्रमे ४५ किमी/तास आणि ६३ किमी/तास वेगाने एकमेकींविरूध्द दिशेला धावत आहेत. त्या एकमेकींस २० सेकंदात पार करतात. जर त्यांपैकी एका गाडीची लांबी २६० मी. असल्यास दुसऱ्या गाडीची लांबी किती ?

25 / 100

एक माणूस ३ मिनिटांत ५४० मी. अंतर पार करतो, तर त्याचा ताशी वेग किती किमी. ?

26 / 100

भारतात मौद्रिक धोरण कोणत्या वित्तीय संस्थेमार्फत राबविले जाते ?

27 / 100

भारतातील पहिला ८ पदरी एक्सप्रेसवे ववरील बोगदा खालीलपैकी कोणत्या मार्गावर आहे ?

28 / 100

पित्त हे ........ अवयवात तयार होते ?

29 / 100

आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते ?

30 / 100

........ या किल्याला ब्रिटीश लोक पुर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत ?

31 / 100

भारतातील नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा ? (१) कावेरी (२) गोदावरी (३) कृष्णा (४) महानदी

32 / 100

भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला ?

33 / 100

कोणती अनुसूची (Schedule) केंद्र आणि राज्यांमधील अधिकारांच्या विभाजनाशी संबंधित आहे ?

34 / 100

संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा ........ मध्ये तयार केला ?

35 / 100

रात्री झाडे ........ वायु उत्सर्जीत करतात ?

36 / 100

१९१५ च्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष कोण होते ?

37 / 100

महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोठे आहे ?

38 / 100

पोलीस दलातील या पदाचा अधिकार स्थानानुसार उतरता क्रम लावा (मोठे पद पहिले) ? १) अपर पोलीस महासंचालक २) पोलीस महासंचालक ३) पोलीस उपमहानिरीक्षक ४) विशेष पोलीस महानिरीक्षक

39 / 100

होर्मूझ खाडी (Strait of Hormuz) खालीलपैकी कोणत्या देशाच्या सिमेला लागून नाही ?

40 / 100

वयाचे किती वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते ?

41 / 100

बंदुकीतून गोळी सुटल्यावर बंदूक मागे सरकते हे खालीलपैकी कशामध्ये स्पष्ट केले आहे ?

42 / 100

अजिंठा लेणी ही कोणत्या नदीवर स्थित आहे ?

43 / 100

भारतातील डिजीटल पेमेन्ट चालविणारी खालीलपैकी कोणती महत्वाची संस्था आहे ?

44 / 100

लंडनमध्ये 'इंडिया हाऊस' ची स्थापना ........ यांनी केली ?

45 / 100

'पॉव्हर्टी अँड अन-ब्रिटीश रूल इन इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहीला ?

46 / 100

उल्गुलन नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडवून आणला होता ?

47 / 100

रेडी बंदर हे ........ च्या निर्यातीसाठी प्रसिध्द आहे ?

48 / 100

मुलभूत अधिकारातील 'खाजगीपणाचा अधिकार' (Right to privacy) संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे ?

49 / 100

खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्या होत्या ? (अ) विजया लक्ष्मी पंडीत (ब) सुब्बलक्ष्मी (क) सुचेता कृपलानी (ड) सरोजीनी नायडू

50 / 100

संविधान सभेतील मुलभूत हक्क आणि अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्ष होते ?

51 / 100

'X' व 'Y' हे दोन विद्यार्थी त्यांच्या शाळेपासून घरी जाण्यासाठी चालू लागले. ते एकमेकांच्या विरुद्ध दिशांना १.५ कि.मी. गेले आणि नंतर प्रत्येक जण त्याच्या उजवीकडे वळला व २ कि.मी. चालून घरी पोहोचला. तर त्यांच्या घरातील अंतर किती ?

52 / 100

विधाने : A) सर्व टंकलेखक, लघुलेखक आहेत. B) काही लघुलेखक, मुली आहेत. निष्कर्षः I) काही टंकलेखक, मुली आहेत. II) कोणतीही मुलगी, टंकलेखक नाही.

53 / 100

एका पुरुषाकडे बोट दाखवून मनिषा म्हणाली "तो माझ्या सासऱ्याच्या एकुलत्या एक मुलाचा लहान मुलगा आहे" तर मनिषाचे त्या लहान मुलाच्या वडिलांशी नाते काय ?

54 / 100

जर EXPANSION हा शब्द २४८५३७६९३ असा लिहिला जात असेल, तर PENSION = ?

55 / 100

_c_bd_cbcda_a_db_a

56 / 100

खालील प्रश्नामधून विसंगत घटक ओळखा ?

57 / 100

जर लेखनी > पेन्सिल, पेन्सिल > पुस्तक, पुस्तक > टोपी, तर खालीलपैकी नेहमी सत्य कोणते आहे ?

58 / 100

एक घड्याळ प्रत्येक २४ तासाला १० मिनीटे पुढे जाते. जर ते घड्याळ सोमवारी सकाळी ८ वाजता बरोबर लावले तर त्यानंतर येणाऱ्या बुधवारी सायंकाळी जेव्हा त्या घड्याळात ६ वाजले असतील तेव्हाची योग्य वेळ कोणती असेल ?

59 / 100

न्यूयॉर्कपेक्षा लंडन वेळेमध्ये ५ तास पुढे आहे, लंडनपेक्षा नवी दिल्ली ५ तास ३० मिनीटे पुढे आहे. नवी दिल्लीत दुपारचे १:५४ वाजले असतांना न्युयॉर्कमध्ये किती वाजले असतील ?

60 / 100

एक घड्याळ दर ३ मिनिटांना २० सेकंद पुढे पळते, जर ते घड्याळ सकाळी ८ वाजता बरोबर लावले तर ते खराब घड्याळ सायं ०५:३० ही वेळ दाखवेल तेव्हा नक्की किती वाजलेले असतील ?

61 / 100

एक घड्याळ प्रत्येक तासाला १० सेकंद पुढे जाते. जर सोमवारी सकाळी ९ वाजता बरोबर लावले तर ते घड्याळ त्यानंतर लगेच येणाऱ्या शनिवारी सकाळी ०९:०० वाजता कोणती वेळ दाखवेल ?

62 / 100

२० जानेवारी २०१६ ला मंगळवार होता, तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या वारी येईल ?

63 / 100

एक सकाळी सूर्योदयानंतर एका चौकात नवीन आणि ... एकमेकांसमोर उभे राहून बोलत होते. तर ... सावली नेमकी नवीनच्या उजवीकडे असेल, तर नीचे तोंड ज्या दिशेला आहे त्याची निवड करा ?

64 / 100

एक महिला प्रथम उत्तरेकडे १२ कि.मी. अंतर धावते. नंतर ती दक्षिणेकडे ६ कि.मी. धावते व पुन्हा ती पूर्वेकडे ८ कि.मी. अंतर धावते. तर ती सध्या तीच्या सुरवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे ?

65 / 100

श्याम आपल्या घरापासून दक्षिणेला ५ कि.मी. गेला, त्यानंतर डावीकडे वळून ३ कि.मी. गेला. नंतर उजवीकडे वळून ४ कि.मी. गेल्यानंतर पुन्हा उजवीकडे वळून १५ कि.मी. गेला. तर तो आपल्या घरापासून किती अंतरावर असेल ?

66 / 100

विधान : P > Q > R > S = T | निष्कर्ष i) R = T ii) P < S iii) Q > T

67 / 100

सुरेशचा जन्म मंगळवारी १४ ऑगस्ट २०११ ला झाला, तर त्याचा ५ वा वाढदिवस कोणत्या वारी येईल ?

68 / 100

एक सांकेतिक भाषेत A ला ३ आहे, B ला ५ आहे. C ला ७ आहे, याप्रमाणे त्या साकेतिक भाषेत SPORTSMAN हा शब्द कसा लिहिला जाईल ?

69 / 100

जर TOY = २१२७, SPY = २११८ तर CRY या शब्दाचे सांकेतिक रूप खालीलपैकी कोणते ?

70 / 100

एका सांकेतिक भाषेत GALAXY हा शब्द BCZOZT लिहीला जातो, तर त्या भाषेत PLANET हा शब्द कसा लिहिला जाईल ?

71 / 100

खालील तक्ता पहाः

७, ४९, ५६ ९, ८१, ९० ?, १६९, १८२ 

72 / 100

खालील संख्यामाळेतील चुकीचे पद ओळखा ५, ७, १०, १३, १७, १९

73 / 100

५/९ : १४/४५ :: ७/१३:?

74 / 100

५२८, ४४०, ३६०, , २२४

75 / 100

DVWG: HSTK :: MPQO : ?

76 / 100

त्र्यंबक बापूजी ठोबरे या मराठी साहित्यीकांचे टोपण नाव ओळखा

77 / 100

खालील पैकी तमीळ भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द ओळखा.

78 / 100

शब्दांच्या रूपात बदल कशामुळे होऊ शकतो ?

79 / 100

खालील पैकी योग्य पर्याय ओळखा.

80 / 100

खालील पैकी शुद्ध शब्द ओळखा

81 / 100

'अभिरुची' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालील पैकी कोणता

82 / 100

दोन किंवा अधिक शब्द, अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना........ असे म्हणतात.

83 / 100

खाली दिलेल्या वाक्यतील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. ती किती मोठ्याने गाते.

84 / 100

'राम राजा झाला.' या वाक्यातील 'राजा' या शब्दाचे कार्य कोणते ?

85 / 100

'अनुज' शब्दाचा अर्थ शोधा.

86 / 100

'मल्लिनाथी' म्हणजे ?

87 / 100

'वर्गात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे.' या वाक्यातील कर्ता कोण आहे ?

88 / 100

'नीलम रोज एक निबंध लिहीते' रीती भविष्यकाळात रुपांतर करा.

89 / 100

'फुलराणी' या कवितेचे कवी कोण आहेत ते खालील दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा.

90 / 100

'पोलीसांकडुन दंड आकारण्यात आला.' या वाक्याचा प्रयोग ओळखा.

91 / 100

'निष्कांचन' या शब्दाचा अर्थ सांगा.

92 / 100

प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द शोधा.

93 / 100

खालील वाक्याचा प्रकार ओळखा. गाडी चालवताना 'वाहन चालवण्याचा परवाना' सोबत असणे आवश्यक आहे.

94 / 100

अनेकवचन करा. 'खोपा'

95 / 100

विरुध्दार्थी शब्द सांगा. 'आसक्ती'

96 / 100

लिंग ओळखा. 'शौर्य'

97 / 100

'अर्णवला अनेक कविता तोंडपाठ आहेत.' सामासिक शब्द शोधा ?

98 / 100

बैरी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

99 / 100

"संदेशचा घराला रंग देऊन झाला." या वाक्यातील प्रयोग ओळखा.

100 / 100

'फकिरा' हे अण्णाभाऊ साठे यांचे लेखन कोणत्या साहित्यप्रकारातील आहे ?

Your score is

📝 सविस्तर स्पष्टीकरण

प्रश्न १: एका आयताकृती भूखंडाची लांबी व रुंदीचे गुणोत्तर ८:३ आहे. त्याच्या सभोवती कुंपण घालण्यास मालकाने २० रूपये प्रति मीटर प्रमाणे ६६०० रूपये खर्च केले, तर त्या भूखंडाच्या लांबी व रुंदीतील फरक किती?

(A) ६० मी.

(B) ७५ मी.

(C) १५० मी.

(D) ४५ मी.

प्रश्न २: एका चाकाचा व्यास ५६ सेमी. असल्यास, २०० फेऱ्यांत ते किती अंतर पुढे जाईल?

(A) १५४ मी.

(B) ४४० मी.

(C) २६४ मी.

(D) ३५२ मी.

प्रश्न ३: आज जर सोमवार असेल तर ८३ दिवसानंतर कोणता वार येईल?

(A) बुधवार

(B) रविवार

(C) शनिवार

(D) मंगलवार

प्रश्न ४: सरळव्याजाने एका रकमेची दाम दुप्पट होण्यास १२.५ वर्षे लागतात, तर त्याच रकमेची त्याच दराने चौपट रक्कम होण्यास किती वर्षे मुदत लागेल?

(A) २४ वर्षे

(B) ५० वर्षे

(C) ३७.५ वर्षे

(D) ३२ वर्षे


💡 उत्तरांचे सविस्तर स्पष्टीकरण (Check Your Logic)

Q1 स्पष्टीकरण:

  • एकूण खर्च / दर = परिमिती. (६६०० / २० = ३३० मीटर ही परिमिती आली).
  • आयताची परिमिती = २ (लांबी + रुंदी) $\implies ३३० = २ (८x + ३x) \implies ३३० = २२x \implies x = १५$.
  • लांबी व रुंदीतील फरक = ५x (८ – ३ = ५).
  • म्हणून, $५ \times १५ = \mathbf{७५}$ मीटर. (पर्याय B योग्य).

Q2 स्पष्टीकरण:

  • चाकाचा परिघ = $\pi \times$ व्यास $= २२/७ \times ५६ = १७६$ सेमी.
  • एकूण अंतर = परिघ $\times$ फेरे $= १७६ \times २०० = ३५२००$ सेमी.
  • मीटरमध्ये रूपांतर $= ३५२०० / १०० = \mathbf{३५२}$ मीटर. (पर्याय D योग्य).

Q3 स्पष्टीकरण:

  • ८३ दिवसांना ७ ने भागा (आठवड्याचे ७ दिवस असतात).
  • $८३ \div ७ = ११$ आठवडे आणि बाकी ६ उरते.
  • सोमवार + ६ दिवस = रविवार. (पर्याय B योग्य).

Q4 स्पष्टीकरण:

  • दाम दुप्पट म्हणजे व्याजाचा हिस्सा १ पट. १ पट व्याजाला १२.५ वर्षे लागतात.
  • दाम चौपट म्हणजे व्याजाचा हिस्सा ३ पट हवा आहे.
  • म्हणून, $३ \times १२.५ = \mathbf{३७.५}$ वर्षे. (पर्याय C योग्य).

🚀 तुमची तयारी एका क्लिकवर!

पुणे पोलीस भरतीसाठी लागणारे सर्व महत्त्वाचे प्रश्नसंच आणि अपडेट्स मिळवण्यासाठी आजच आमच्या टेलिग्राम चॅनलला भेट द्या.

📲 Daily MCQ आणि Mock Test साठी जॉईन करा:

👉 Join Now: GS E-Study Point


लक्षात ठेवा: यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो, सराव हाच एकमेव मार्ग आहे! 🚩🔥


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page

© 2026 Gsestudypoint | Learn Education
Privacy PolicyContact UsAbout UsDMCATerms & ConditionsDisclaimer