🔥 Latest Updates

गोंदिया पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट |Gondiya Police Bharti 2026 Mock Test

गोंदिया पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट

नमस्कार भावी पोलीस बांधवांनो,

“गोंदिया” जिल्ह्याला आपण तलावांचा जिल्हा म्हणून ओळखतो, पण याच मातीतून दरवर्षी शेकडो तरुण आपल्या कर्तृत्वाने पोलीस दलात मानाचे स्थान मिळवतात. यंदा ही संधी तुमच्या दारात आली आहे! पोलीस भरतीची तयारी करणे म्हणजे केवळ मैदानी चाचणीत घाम गाळणे नव्हे, तर लेखी परीक्षेतही ‘शार्प’ असणे होय.

विद्यार्थी मित्रांनो, गोंदिया पोलीस भरतीचा पेपर हा नेहमीच विचार करायला लावणारा असतो. विशेषतः बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडींचे प्रश्न तुमचे ‘मेरिट’ ठरवतात. म्हणूनच, अभ्यासाच्या ओघात आपली नेमकी तयारी किती झाली आहे, हे तपासण्यासाठी GS eStudy Point ने ही विशेष Mock Test तयार केली आहे.

या टेस्टचे वैशिष्ट्य काय?

  • नकाशा आणि जिल्हा विशेष: गोंदिया जिल्ह्याच्या भौगोलिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित प्रश्नांची झलक.
  • काठिण्य पातळी: अगदी सोप्या प्रश्नांपासून ते तुमचा कस पाहणाऱ्या कठीण प्रश्नांपर्यंत सर्व प्रकारांचा समावेश.
  • स्मार्ट लॉजिक: केवळ सूत्रे न वापरता बुद्धिमत्ता कशी सोडवावी, याचे सविस्तर मार्गदर्शन.

लक्षात ठेवा, एक-एक मार्क तुमची पोस्ट ठरवत असतो. त्यामुळे ही टेस्ट सोडवताना ती प्रत्यक्ष परीक्षेच्या हॉलमध्ये बसलो आहोत याच गांभीर्याने सोडवा. प्रश्नांची उत्तरे चुकली तरी चालेल, पण त्यातून मिळणारे स्पष्टीकरण तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील याची आम्ही खात्री देतो.

चला तर मग, कंबर कसा आणि सुरू करा आपली आजची टेस्ट!

गोंदिया शहर पोलीस २०२६

📝 गोंदिया शहर पोलीस भरती २०२६ प्रश्नपत्रिका टेस्ट

गोंदिया शहर पोलीस भरती २०२६ मध्ये विचारलेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारित ही मुद्देसूद टेस्ट खास तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मागील प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास करून त्याच पॅटर्ननुसार प्रश्न समाविष्ट केले आहेत, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेचा अचूक अंदाज येईल.

✨ या टेस्टमधील वैशिष्ट्ये:

📌 वास्तविक प्रश्नपत्रिकेवर आधारित प्रश्न
📌 पोलीस भरतीच्या नवीन पॅटर्ननुसार तयारी
📌 महत्वाच्या विषयांचा समावेश (गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण)
📌 वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी उपयुक्त
📌 स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वास वाढवणारी

ही टेस्ट सोडवून तुम्ही तुमची तयारी तपासू शकता आणि येणाऱ्या गोंदिया शहर पोलीस भरती परीक्षेसाठी स्वतःला अधिक सक्षम बनवू शकता. 🚔💯

1 / 100

एका सांकेतीक भाषेत गमन ४२६, मरण २३५, गजर ४१३, नरम ६३२ तर नजर हा शब्द कसा लिहावा लागेल ?

2 / 100

एका पुरुषाकडे बोट दाखवुन मनिषा म्हणाली, " तो माझ्या सासऱ्याचा एकुलता एक मुलाचा लहान मुलगा आहे." तर मनिषाचे त्या वडिलांशी नाते काय ?

3 / 100

आशिषचे वजन गोविंद पेक्षा अधिक आहे... तर सर्वात जास्त वजन कोणाचे आहे ?

4 / 100

आकृतीत * च्या ठिकाणी येणारा योग्य अंक शोधा.

5 / 100

भारत, नेपाळ, श्रीलंका यांच्यातील परस्पर संबंध दर्शविणारी आकृती कोणती ?

6 / 100

एक स्त्री राकेशची ओळख करून देताना म्हणाली... तर त्या स्त्रीचे राकेशशी नाते काय ?

7 / 100

दिलेल्या उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

 

8 / 100

चाबहार बंदर कुठे आहे ?

9 / 100

जानेवारी २०२६ मध्ये खालीलपैकी कोणासोबत भारताने मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली ?

10 / 100

प्रोजेक्ट चित्ता कोणत्या राष्ट्रीय उद्यानाशी संबंधीत आहे ?

11 / 100

इंडिया AI इम्पॅक्ट समीट २०२६ कोणत्या शहरात पार पडली ?

12 / 100

२०२६ सालचा शांतता काळातील सर्वोच्च लष्करी सन्मान अशोक चक्र...... यांना देण्यात आला ?

13 / 100

ICC पुरूष T 20 विश्वचषक २०२६ स्पर्धेमध्ये एकूण किती संघांनी सहभाग नोंदवला ?

14 / 100

पोटॅशियमची रासायनिक संज्ञा कोणती ?

15 / 100

खालीलपैकी कोणता पचनसंस्थेचा भाग नाही ?

16 / 100

एक न्युटन = किती डाइन ?

17 / 100

प्रोपेनचे रासायनिक सुत्र कोणते आहे ?

18 / 100

खालीलपैकी जीवाणूजन्य रोग कोणता आहे ?

19 / 100

पुणे करारावर यापैकी कोणी स्वाक्षरी केली ?

20 / 100

'१८५७ चे स्वातंत्र्यसमर' हे पुस्तक कोणी लिहीले ?

21 / 100

२५ विद्यार्थ्यांच्या वर्गात स्नेहाचा शेवटून १९ वा आणि मीनाचा सुरूवातीपासुन २३ वा क्रमांक आहे. छाया बरोबर मध्ये असेल, तर छायाचा शेवटून क्रमांक किती ?

22 / 100

चौरीचौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले ?

23 / 100

२६ : ५ :: ६५ : ?

24 / 100

कर्झन वायली यास --- यांनी गोळी घालून ठार केले.

25 / 100

भारत सेवक समाज कोणी स्थापन केला ?

26 / 100

AC, EG, IK ..........?

27 / 100

'एक देश, एक निवडणूक' या समितीचे अध्यक्ष कोण होते ?

28 / 100

८७, ६२, ४२, २७, १७ - ?

29 / 100

पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे ?

30 / 100

भारतातील पहिली AI तंत्रज्ञान आधारीत अंगणवाडी कोणत्या जिल्हयात सुरु करण्यात आली ?

31 / 100

११, ५, २०, १२, ३८ ?, ७४, ५४

32 / 100

देशातील वृद्धांसाठीचा अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य कोणते आहे ?

33 / 100

एक व्यक्ती पश्चिमेला तोंड करुन उभी आहे. ती प्रथम घडाळ्याच्या काट्याच्या दिशेने ९०° कोनात वळते. नंतर विरुद्ध दिशेने १३५° कोनात वळते. तर तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल ?

34 / 100

राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी --- या दिवशी साजरा केला जातो.

35 / 100

राज्यसभेच्या उमेदवारांना किमान वयोमर्यादा किती आहे ?

36 / 100

एका मैदानात कुमार अंकुरच्या उजवीकडे ४० मी अंतरावर आहे... (दिलेल्या माहितीनुसार) तो एकूण किती अंतर चालतो?

37 / 100

भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ हा कायदा कोणत्या दिनांकास लागू झाला ?

38 / 100

गटात न बसणारा शब्द कोणता आहे ?

39 / 100

CCTNS म्हणजे काय ?

40 / 100

पुढील अक्षर गटातील चुकीचे पद ओळखा. AZ, BY, CX, DV, EV

41 / 100

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

42 / 100

'विर भोग्या वसुंधरा' हे ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणाचे ?

43 / 100

राष्ट्रीय विज्ञान दिन सोमवारी आहे, तर त्या वर्षाची सुरुवात कोणत्या वाराने झाली होती ?

44 / 100

व्यंजनास --- असेही म्हणतात ?

45 / 100

विधान १) सर्व कागद, झाडे आहेत. २) सर्व झाडे, दगड आहेत.

अनुमान :- १) सर्व झाडे, कागद आहेत. २) सर्व कागद, दगड आहेत.

46 / 100

योग्य जोड्या लावा.

अ) गणनावाचक - ३) दहा मुली ब) क्रमवाचक - ४) पहिला वर्ग क) आवृत्तीवाचक - २) चौपट मुले ड) पृथकत्ववाचक - १) एकेक मुलगा

47 / 100

खालील पैकी नपुसकलिंगी असलेला शब्द कोणता ?

48 / 100

घरातील एका भिंतीवर आरसा व त्याच्या समोरील भिंतीवर घड्याळ बसविले आहे. जर घड्याळात प्रत्यक्ष ३ वाजुन ४० मिनिटे झाली असतील तर घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शवेल ?

49 / 100

'येथे असा काय प्रकार घडला, की तो मला माहीत नाही' हे वाक्य कोणत्या प्रकाराचे आहे ?

50 / 100

सोबतच्या आकृतीत किती आयत आहेत ?

51 / 100

'चक्रपाणि, लक्ष्मीकांत, नीलकंठ' ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत.

52 / 100

खालील शब्दांतील 'घर' या अर्थाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता ?

१) निकेतन २) सदन ३) वदन ४) भवन

53 / 100

पुढील वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. (मोठ्याने) ओरडू नकोस

54 / 100

एका चौरसाकृती मैदानाची प्रत्येक बाजु १२० मीटर आहे. त्या मैदानाभोवती ५ फेरा मारल्यास किती अंतर कापले जाईल ?

55 / 100

खालील विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा.

(१) विद्यमान - (क) माजी (२) कर्णकटू - (ड) कर्णमधुर (३) अनावृष्टी - (ब) अतिवृष्टी (४) आमंत्रित - (अ) आगंतुक

56 / 100

एका कारमधील ६ लोकांचे सरासरी वजन ३५ किलो होते. रमेश कारमध्ये बसल्यानंतर सरासरी १ ने वाढली, तर रमेशचे वजन किती ?

57 / 100

'तत्परता' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

58 / 100

'जीव टांगणीला लागणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ शोधा.

59 / 100

२०० मीटर लांबीच्या ट्रेनला ७२ कि.मी. प्रती तास वेगाने ३६० मीटर लांबीचा बोगदा पुर्णपणे ओलांडण्याकरीता किती वेळ लागेल ?

60 / 100

खाली दिलेल्या शब्दांमधील शुध्द शब्दांचा पर्याय निवडा.

(१) आशीर्वाद, क्षितीज (२) आशिर्वाद, क्षितिज (३) क्षितिज, आशीर्वाद (४) आर्शीवाद, क्षितिज

61 / 100

एका पिशवीमध्ये १३० नाणी (coins) असुन एकुण ४५० रुपये आहेत. त्या पिशवीमध्ये काही १ रुपयाची व काही ५ रुपयाची नाणी आहेत; तर १ रुपयाची एकुण नाणी किती ?

62 / 100

'राईचा पर्वत करणे' खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा.

63 / 100

दिलेल्या म्हणीचा अर्थ निवडा. 'साखरेचे खाणार त्याला देव देणार'

64 / 100

७९२*९ या संख्येस ११ ने निःशेष भाग जातो तर * च्या जागी कोणता अंक असावा ?

65 / 100

शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा.

66 / 100

पुढील उदाहरणात योग्य विरामचिन्ह द्या. मी वाट पाहिली पण तो आला नाही.

67 / 100

५७.३३ / ६३ = ०.९१ तर ५.७३३ / ९.१ = ?

68 / 100

'अडकित्ता' हा शब्द कोणत्या भाषेतुन मराठीत आला.

69 / 100

२८७.८१३ या संख्येस १० च्या घातांक पदावलीत लिहा.

70 / 100

४० x ५ ÷ ८ + १६२ x ७ ÷ १८ - ६५ x ७ ÷ १३ = ?

71 / 100

जर √(x+√(४०+√(६८+√१६९))) = ११ तर X ची किंमत काढा.

72 / 100

रीताने व्याजाच्या दराइतक्या वर्षासाठी सरळ व्याजाने १२००/- रुपयाचे कर्ज घेतले, जर तीने कर्ज फेडतांना ४३२/- रुपये व्याज दिले असेल तर व्याजाचा दर किती होता ?

73 / 100

एका घडाळ्याच्या किंमतीत २०% कपात केली व नंतर काही दिवसांनी किंमतीत १०% वाढ केली, तर मुळच्या किंमतीत किती % फरक पडेल ?

74 / 100

A आणि B यांच्या वयाचे गुणोत्तर २:५ आहे. त्यांच्या वयाची बेरीज ६३ असल्यास A चे वय काय ?

75 / 100

'मेघासम तो श्याम सावळा' या वाक्यातील अलंकार ओळखा.

76 / 100

A हा B च्या दुप्पट वेगाने काम करतो. जर B हा ५० दिवसात काम पुर्ण करतो तर A व B मिळून ते काम किती दिवसात संपवतील ?

77 / 100

दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. 'तिचे गाणे गाऊन झाले'

78 / 100

एका गाडीने ताशी ४० कि.मी. वेगाने पहिला अर्धा प्रवास पुर्ण केला व ताशी ६० कि. मी. वेगाने दुसरा अर्धा प्रवास पुर्ण केला तर त्या गाडीचा सरासरी वेग किती होता ?

79 / 100

'साखळी हिसकावुन पळालेले चोर पोलीसांनी तासाभरात पकडले' या वाक्यातील प्रयोग ओळखा ?

80 / 100

भाववाचक नामांचा शब्दगट ओळखा.

(a) देवपण, प्रामाणिकपणा, मोठेपणा (b) गरिबी, गोडी, लबाडी (c) प्रौढत्व, मित्रत्व, शत्रुत्व (d) गांभीर्य, धैर्य, माधुर्य

81 / 100

७ क्रमवार सम संख्यांची सरासरी १४६ आहे. तर त्यांच्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?

82 / 100

एका क्रिकेट मॅचमध्ये अजयने घेतलेल्या विकेटची संख्या अमरने घेतलेल्या विकेट्सच्या संख्येच्या दुप्पटीपेक्षा ३ ने कमी आहे. त्यांनी घेतलेल्या विकेट्सच्या संख्येचा गुणाकार २० असल्यास प्रत्येकाने घेतलेल्या विकेट्सची संख्या शोधा.

83 / 100

चांगले खेळाडू आजकाल घडत नाहीत, अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा.

84 / 100

जर २ x ८ = २०, ३ x ९ = ३१ आणि ५ x ८ = ४४ तर ३० x ५ = ?

85 / 100

'यशोधन' या शब्दाचा संधी प्रकार ओळखा.

86 / 100

'देवालय' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

87 / 100

तीन पेट्यांमध्ये अनुक्रमे २१६, १२६ व १६२ वह्या आहेत. त्या पेट्यांतील वह्यांचे समान वह्या असलेले गड्ढे करायचे असल्यास प्रत्येक गड्डूयात जास्तीत जास्त किती वह्या द्याव्यात ?

88 / 100

मन्वंतर या जोड शब्दाची संधी सोडवा.

स्पष्टीकरण: X आणि Y चे एका दिवसाचे काम = १/१५, Y चे एका दिवसाचे काम = १/२५. X चे एका दिवसाचे काम काढण्यासाठी (१/१५ - १/२५) करू. लसावि ७५ येतो. (५-३) / ७५ = २ / ७५. जर X ला एका दिवसात २/७५ काम लागते, तर पूर्ण काम करण्यासाठी त्याला ७५/२ दिवस म्हणजेच ३७.५ किंवा ३७ १/२ दिवस लागतील.

89 / 100

X व Y मिळून एक काम १५ दिवसात करतात. एकटा Y ते काम २५ दिवसात करतो तर एकटा X किती दिवसात काम पुर्ण करेल ?

स्पष्टीकरण: सर्व मापे एकाच एककात म्हणजे मीटरमध्ये लिहून घेऊ. ७.२५ मी. = ७.२५ मी., ७ मी. २५ से.मी. = ७.२५ मी., ४ मी. १ से.मी. = ४.०१ मी. आता समीकरण सोडवू: ७.२५ मी. - ७.२५ मी. + ४.०१ मी. = ० + ४.०१ मी. = ४.०१ मी. त्यामुळे अचूक उत्तर ४.०१ मी. हे आहे.

90 / 100

७.२५ मी.- ७ मी. २५ से.मी. + ४ मी. १ से.मी. = ?

91 / 100

खालील करापैकी कोणता कर प्रत्यक्ष कर नाही?

92 / 100

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे मुख्यालय खालील पैकी कोणत्या शहरात आहे?

93 / 100

जानेवारी २०२६ मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची ५६ वी वार्षीक बैठक येथे झाली.

94 / 100

भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?

95 / 100

२०२६ सालचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प यांनी मांडला.

96 / 100

गोंदिया जिल्ह्यास एकूण किती राज्यांच्या सिमा लागून आहेत?

97 / 100

बालाघाट जिल्हा गोंदिया जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस स्थित आहे ?

98 / 100

खालील पैकी कोणत्या गटात दिलेली सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रातील आहेत ?

99 / 100

वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या संगमातून तयार होणारी नदी कोणती ?

100 / 100

यापैकी सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे ?

Your score is

The average score is 63%

स्पष्टीकरण :

Q1. एका सांकेतिक भाषेत ‘गमन’ ४२६, ‘मरण’ २३५, ‘गजर’ ४१३, ‘नरम’ ६३२ तर ‘नजर’ हा शब्द कसा लिहावा लागेल?

(A) ६१३

(B) ६३१

(C) ६५३

(D) ६१५

उत्तर: (B) ६३१

Q2. एका पुरुषाकडे बोट दाखवून मनीषा म्हणाली, “तो माझ्या सासऱ्याच्या एकुलत्या एक मुलाचा लहान मुलगा आहे.” तर मनीषाचे त्या मुलाच्या वडिलांशी नाते काय?

(A) आई

(B) बहीण

(C) पत्नी

(D) यापैकी नाही

उत्तर: (C) पत्नी

Q3. आशिषचे वजन गोविंदपेक्षा अधिक आहे, जॅकचे वजन पवनपेक्षा कमी आहे. गोविंदचे वजन जॅकपेक्षा अधिक आहे, तर सर्वात जास्त वजन कोणाचे आहे?

(A) गोविंद

(B) जॅक

(C) पवन

(D) आशिष

उत्तर: (D) आशिष

Q4. एक स्त्री राकेशची ओळख करून देताना म्हणाली, “त्याची पत्नी ही माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे.” तर त्या स्त्रीचे राकेशशी नाते काय?

(A) आत्या

(B) आई

(C) बहीण

(D) पत्नी

उत्तर: (D) पत्नी

Q5. ‘चाबहार बंदर’ कोणत्या देशात आहे?

(A) इजिप्त

(B) इराण

(C) पाकिस्तान

(D) मलेशिया

उत्तर: (B) इराण


प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण (Explanations)

  • Q1 स्पष्टीकरण (सांकेतिक भाषा): शब्दांमधील सामायिक अक्षरे आणि त्यांचे अंक शोधून ‘न’ = ६, ‘ज’ = १ आणि ‘र’ = ३ हे अंक मिळतात. त्यावरून ‘नजर’ या शब्दासाठी ६३१ हा पर्याय योग्य ठरतो.
  • Q2 स्पष्टीकरण (नातेसंबंध): मनीषाच्या सासऱ्याचा ‘एकुलता एक मुलगा’ म्हणजे तिचा पती. पतीचा मुलगा म्हणजे मनीषाचा स्वतःचा मुलगा. विचारलेला प्रश्न ‘मुलाच्या वडिलांशी’ आहे, म्हणजेच मनीषा ही त्यांची पत्नी असेल.
  • Q3 स्पष्टीकरण (तुलना): वजनाचा क्रम असा लागेल: आशिष > गोविंद > जॅक > पवन. त्यामुळे सर्वात जास्त वजन आशिषचे आहे.
  • Q4 स्पष्टीकरण: “माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी” म्हणजे ती स्त्री स्वतः. ती राकेशची पत्नी आहे, म्हणून नाते पत्नी असे येईल.
  • Q5 स्पष्टीकरण (GK): ‘चाबहार बंदर’ हे इराण देशात असून भारतासाठी व्यापाराच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचे आहे.

तुमच्या तयारीसाठी आमचा हातभार!

Telegram Join करा…

मित्रांनो, स्पर्धा मोठी आहे पण तुमची मेहनत त्याहून मोठी असावी! दररोज अशाच नवनवीन टेस्ट आणि चालू घडामोडींच्या मोफत नोट्स मिळवण्यासाठी आजच आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा.

📲 Daily MCQ आणि Mock Test साठी जॉईन करा:

👉 Join Now: https://t.me/gsestudypoint



इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page

© 2026 Gsestudypoint | Learn Education
Privacy PolicyContact UsAbout UsDMCATerms & ConditionsDisclaimer