🔥 Latest Updates

धुळे जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Dhule District Police Bharti Mock Test 2026

धुळे जिल्हा पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Dhule District Police Bharti Mock Test 2026

या टेस्टमध्ये तुम्हाला धुळे जिल्हा पोलीस भरती 2026 साठी अत्यंत महत्त्वाचे आणि परीक्षाभिमुख गणित (Maths), बुद्धिमत्ता (Reasoning), मराठी व्याकरण (Grammar) आणि सामान्य ज्ञान (GK) या सर्व विषयांवर आधारित MCQ प्रश्न दिले आहेत.

ही प्रश्नसंचना पूर्णपणे पोलीस भरतीच्या प्रत्यक्ष परीक्षा पॅटर्ननुसार तयार केली असून प्रत्येक विषयातील महत्त्वाचे टॉपिक्स कव्हर केले आहेत, ज्यामुळे तुमची सर्वांगीण तयारी होईल.

या टेस्टमध्ये तुम्हाला:

  • गणित: संख्या पद्धती, टक्केवारी, गुणोत्तर, वेळ व काम, वेग-प्रवाह यांसारखे प्रश्न
  • बुद्धिमत्ता (Reasoning): तर्कशक्ती, क्रम, कोडी, मालिका (Series), Analogy
  • मराठी व्याकरण: अव्यय, क्रियापद, शब्दरचना, काळ, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द
  • सामान्य ज्ञान (GK): इतिहास, भूगोल, संविधान, चालू घडामोडी

यांचा समावेश आहे.

हा सराव केल्यामुळे:

  • प्रश्न सोडवण्याचा वेग आणि अचूकता वाढते
  • विविध विषयांतील संकल्पना एकाच ठिकाणी मजबूत होतात
  • परीक्षेतील वेळ व्यवस्थापन सुधारते
  • आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूर्ण पेपर सोडवण्याचा आत्मविश्वास वाढतो

जर तुम्ही नियमितपणे अशा मिश्र (Mixed) टेस्ट सोडवल्या तर पोलीस भरती परीक्षेत यश मिळवण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.

धुळे जिल्हा पोलीस २०२६

📝 धुळे जिल्हा पोलीस भरती २०२६ प्रश्नपत्रिका टेस्ट

धुळे जिल्हा पोलीस भरती २०२६ मध्ये विचारलेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारित ही मुद्देसूद टेस्ट खास तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मागील प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास करून त्याच पॅटर्ननुसार प्रश्न समाविष्ट केले आहेत, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेचा अचूक अंदाज येईल.

या टेस्टमधील वैशिष्ट्ये:

📌 वास्तविक प्रश्नपत्रिकेवर आधारित प्रश्न
📌 पोलीस भरतीच्या नवीन पॅटर्ननुसार तयारी
📌 महत्वाच्या विषयांचा समावेश (गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण)
📌 वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी उपयुक्त
📌 स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वास वाढवणारी

ही टेस्ट सोडवून तुम्ही तुमची तयारी तपासू शकता आणि येणाऱ्या धुळे जिल्हा पोलीस भरती परीक्षेसाठी स्वतःला अधिक सक्षम बनवू शकता. 🚔💯

1 / 100

दोन शब्द वा वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना खलीलपैकी काय म्हणतात ?

2 / 100

शब्दाच्या रूपात बदल कशामुळे होऊ शकतो.

3 / 100

खालील पैकी स्थलवाचक शब्दयोगी अव्यय ओळखा.

4 / 100

काळ ओळखाः मी धुरंधर चित्रपट पाहिलेला आहे.

5 / 100

खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा.

6 / 100

तुम्ही बोलावले तर मी येईन. या वाक्या चा प्रकार कोणता आहे ?

7 / 100

यामिनी, शरवरी, रजनी, विभावरी, अप्सरा यातील विसंगत शब्द ओळखा.

8 / 100

झाडे या शब्दाचे मुळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते ?

9 / 100

पाचशे रूपये ही देखिल मोठी रक्कम आहे. या वाक्याचे नकारार्थी वाक्य करा.

10 / 100

मी शाळेत जाणार नाही, कारण मला ताप आला आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा.

11 / 100

सचिन परत आल्याखेरीज राहिल का? वाक्यप्रकार ओळखा.

12 / 100

चादर, मैदान, पैसा, गुलाल हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत ?

13 / 100

क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नाही व ते नेहमी तृतियपंथी, नपुसकलिंगी रहाते अशा वाक्यरचनेस काय म्हणतात ?

14 / 100

साप माझ्या समोरून गेला. या वाक्यातील समोरून हा शब्द कोणत्या अव्यय प्रकारात मोडेल.

15 / 100

दिनेश निबंध लिहितो. यातील लिहितो हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे.

16 / 100

मुलगा चांगला खेळतो यातील चांगला हा शब्द काय दर्शवतो ?

17 / 100

ती या सर्वनामाची द्वितीया विभक्तील ओळखा.

18 / 100

भाऊ आणि देश या नामांची सामान्य रूपे ओळखा.

19 / 100

उंट या शब्दाचे स्त्रिलिंगी रूप ओळखा.

20 / 100

निर्मळ या शब्दाची संधी ओळखा.

21 / 100

केळीवर नारळी, घर चंद्रमौळी या म्हणीचा अर्थ ओळखा.

22 / 100

शेतातून जाणारी वाट या शब्दसमुहा बद्दल एकच शब्द लिहा.

23 / 100

अपूर्व या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

24 / 100

अनुकंपा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

25 / 100

अकसारणे या वाक्यप्रकाराच्या योग्य उपयोगासाठी खालील पर्यायातून अचुक निवडा.

26 / 100

एक जवान पोलीस मुख्यालयापासून ४० मीटर उत्तरेकडे गेला व पूर्वेकडे वळुन २० मीटर गेला. नंतर दक्षिणेलावळुन ५ मीटर अंतर पार केले व पुन्हा पुर्वेला वळुन १० मीटर गेला तर तो पोलीस मुख्यालया पासून कोणत्या दिशेला आहे ?

27 / 100

११ २७ ३० १२ X २६, X=?

28 / 100

खालील संख्या मालीकेतील विसंगत घटक ओळखा. १, २, ६, १२, २०, ३०, ४२, ५६

29 / 100

एका संख्येला २८ ने गुणण्याऐवजी जर ३८ ने गुणले असता, गुणाकार मुळ गुणाकारापेक्षा २५० ने जास्त आला. तर ती संख्या कोणती ?

30 / 100

एका सांकेतिक लिपीत अक्षरां ऐवजी चिन्हे वापरली जातात, तर जयहिंद कसे दाखवले जाईल ?

31 / 100

पोलीस परेड मध्ये जवानाचा क्रमांक दोन्ही बाजूने ४५ वा असल्यास रांगेत एकुण किती जवान आहेत ?

32 / 100

X च्या जागी कोणती संख्या येईल

33 / 100

पुढील पैकी कोणती आकृती पुरूष, स्त्री आणि शिक्षक यांचे निदेशन करते.

34 / 100

एका सांकेतीक भाषेत INDIA हे ९१४४९१ असे लिहितात तर २८११८१८२० हे कशासाठी लिहिले जाईल ?

35 / 100

X = ? (वर्तुळ आकृती)

36 / 100

दिपक हा पोलिस स्टेशन ला सकाळी ८.१८ वाजता आला. तो राकेश पेक्षा २१ मिनीटे लवकर आला व राकेश हा किरण पेक्षा २० मिनीटे उशीरा आला. तर किरण पोलीस स्टेशन मध्ये किती वाजता आला ?

37 / 100

खलील वर्णमालेतील रिकाम्या जागी बसणारा योग्य पर्याय ओळखा. ab_cb_a_c_baab

38 / 100

x = ? (आकृती प्रश्न)

39 / 100

निलेश चा जन्म शनिवार दिनांक ४ सप्टेंबर १९९३ ला झाला, तर त्याचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी ला होता.

40 / 100

विसंगत घटक ओळखा.

41 / 100

अजय, अतूल, सुनिल, दिनेश, सचिन, हे पाच मित्र आहेत, सचिन सुनिल पेक्षा वयाने मोठा आहे. अतुल सचिन पेक्षा मोठा आहे. अजय सुनिल पेक्षा लहान आहे पण दिनेश पेक्षा मोठा आहे. तर सर्वात तरूण कोण आहे ?

42 / 100

A ही B च्या बायको आहे व C ही A ची बहिण आहे. C चे वडिल D आहेत व E हा D चा मुलगा आहे. तर E व B चे नाते कोणते ?

43 / 100

३४३: ४९:: x: ६४, x = ?

44 / 100

जर A च्या ऐवजी F, B च्या ऐवजी G, C च्या ऐवजी H या प्रमाणे अक्षरे वापरली तर या संकेतात POLICE हा शब्द कसा लिहला जाईल ?

45 / 100

६ पोलीस रिक्रूटस ड्रिल इन्स्ट्रकटर कडे चेहरा करून वर्तुळाकार बसले आहेत. M च्या डाविकडे N असून त्यांच्या समोर Q आहे. L च्या उजवीकडे Q असून, L च्या समोर O आहे. Q व O च्या मध्ये P आहे. तर P च्या समोर कोण आहे ?

46 / 100

खालील अंक मालीकेतील x च्या जागी कोणता अंक येईल? १८.५०, २२, २५.५, २९, X

47 / 100

EF IJ MN वर्णमाला ओळखा.

48 / 100

भिन्न संख्या ओळखा. ८, ९, १६, ३६, १००

49 / 100

पुढील संख्या ओळखा. १२२५, १२९६, १३६९, .....?

50 / 100

खालील तक्त्यामध्ये x ची किंमत काढा:

51 / 100

x ही विषम संख्या आहे तर पुढील पैकी कोणती संख्या सम असेल.

52 / 100

एका संख्येच्या ५/८ मध्ये ५ मिळवले असता ४५ हा अंक येतो तर ती संख्या कोणती ?

53 / 100

पुढील पैकी सर्वात मोठा अपुर्णांक कोणता ?

54 / 100

५७३२ x ६७८ - ५७३२ x ५७८ = x, x = ?

55 / 100

एका चौरसाचे क्षेत्रफळ ४०० चौरस से.मी असल्यास त्या चौरसाची परिमीती किती येईल ?

56 / 100

ABCD हा चक्रिय चौकोन आहे. दिलेल्या माहिती वरून ABCD या क्रमाने कोनांची मापे काढा.

57 / 100

गुणाकार करा $(3x^{2} - 2x) \times 2xy$ 

58 / 100

दिलेल्या आकृतीत a - b = ६०° तर a = ?

59 / 100

२० आणि ५० यांचा लसावी काढा.

60 / 100

दोन संख्यांचे गुणोत्तर ७: ३ आहे. त्यांच्या मधील फरक २८ असल्यास त्या संख्या कोणत्या ?

61 / 100

६४,८०० सेकंद म्हणजे किती तास ?

62 / 100

जर ६ माणसे १५ दिवसात २७०० रूपये कमवतात तर १० माणसे १५ दिवसात किती रूपये कमावतील ?

63 / 100

पोलीस मेस मध्ये ११० किलो तांदूळ एका आठवड्याला लागतात तर ६३ दिवसांकरिता किती तांदूळ लागेल ?

64 / 100

एका आयताची लांबी २१ मीटर आणि रूंदी १३ मीटर आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती ?

65 / 100

११००२ - ८८८२ = x, x = ?

66 / 100

? चे १५% = ७८.

67 / 100

$(0.7 \times 0.07 \times 0.007) \div 0.007 = x, x = ?$

68 / 100

२५ मिलीमीटर + ४५ सेंटीमीटर = किती मीटर

69 / 100

एका त्रिकोणातील कोनांची मापे ६:५:४ या प्रमाणात असतील तर सर्वांत मोठ्या कोनाचे माप किती ?

70 / 100

राम, लक्षमण, भरत ने एक कार भाडयाने घेतली आणि त्यांनी ती अनुक्रमे ४०, ५०, ६० तास वापरली. जर कार चे एकूण भाडे ४५०० रूपये झाले असेल तर भरत ला किती भाडे दयावे लागले ?

71 / 100

$\sqrt{(65^{2} - 16^{2})} = x, x = ?$

72 / 100

$36\frac{4}{5} \div 24\frac{4}{5} = x, x = ?$

73 / 100

एक जलतरण पटू काही अंतर प्रवाहाच्या दिशेने ४ तासात पूर्ण करतो व परत मुळ ठिकाणी प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने तेच अंतर ५ तासात पूर्ण करतो. जर प्रवाहाचा वेग २ कि.मी प्रती तास असेल तर त्या व्यक्तीने एकूण किती कि.मी अंतर प्रवास केला ?

74 / 100

छापील किंमतीवर २०% सुट असेल तर एका वस्तुची किंमत ४४ रूपये आली तर त्या वस्तुची छापील किंमत किती ?

75 / 100

जर २५०० रूपयांची वस्तू ३०% तोटयाने विकली तर वस्तूची विक्री किंमत किती ?

76 / 100

नुकतेच निधन पावलेले महाराष्ट्र भूषण श्री राम सुतार यांनी खालील पैकी कोणत्या क्षेत्रात उत्तुंग काम केले आहे ?

77 / 100

खलील पैकी कोणती आले (ginger) या पीकाची नवीन जात आहे.

78 / 100

कोणत्या घटनादुरूस्ती नुसार महिलांना पंचायतराज मध्ये आरक्षण देणे अनिवार्य आहे.

79 / 100

केंद्र शासनाने मादक पदार्थ नियंत्रण करण्या करीता २०२४ मध्ये कोणते मदत पोर्टल सुरू केले ?

80 / 100

ऑस्कर पुरस्कार (अकॅडमी अवॉर्डस) स्पर्धेत या वर्षी भारता तर्फे हया चित्रपटाने भाग घेतला होता.

81 / 100

ग्रहांच्या गती संबंधीत खालील पैकी कोणता नियम लागु होतो ?

82 / 100

स्वातंत्र्यवीर सावरकर हे खालील पैकी कोणत्या संस्थेशी संबंधीत नव्हते ?

83 / 100

खालील पैकी कोणाच्या जयंती निमित्त टपाल विभागाने ५ रूपयाचे टपाल तिकीट ९ जुलै २०२५ मध्ये जारी केले ?

84 / 100

भारतीय न्याय संहिता या कायद्या मध्ये खालील पैकी कोणते कलम नव्याने अंतर्भुत केले आहे ?

85 / 100

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना नुकताच द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या देशाने दिला ?

86 / 100

महात्मा फुले यांनी स्थापन केलेली संस्था कोणती ?

87 / 100

स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री कोण होते ?

88 / 100

Operation Muskan हे कश्यासंबंधी राबवण्यात येते ?

89 / 100

पोलिस हा विषय राज्य घटनेच्या कोणत्या सुचित समाविष्ट करण्यात आला आहे ?

90 / 100

इथेन चे रासायनिक सुत्र (Chemical formula) काय आहे ?

91 / 100

जिवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायुचे प्रमाण वाढते ?

92 / 100

छ. शिवाजी महाराज हयांचा मृत्यु कधी व कोठे झाला ?

93 / 100

धुळे जिल्हयातील कारागृहा मध्ये खालील पैकी कोणाचे वास्तव्य होते.

94 / 100

BRICS हया संघटनेत खालील देश सहभागी नाही.

95 / 100

NAFIS कार्यप्रणाली म्हणजे खालील प्रमाणे कोणती ?

96 / 100

हिंद की चादर हा कार्यक्रम कोणाच्या स्मणार्थ नुकताच पार पडला ?

97 / 100

दोषान्वेषनः सत्यगवेषनार्थ. हे ब्रीद वाक्य खालील पैकी कोणाचे आहे ?

98 / 100

न्युयॉर्क शहराचे मेयर पदासाठी नुकतीच कोणाची निवड झाली ?

99 / 100

नुकतेच प्रकाशित झालेले When It All Began हया पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

100 / 100

पदमश्री पुरस्कार प्राप्त सुनिता पुनिया ही कोणत्या खेळाशी संबंधीत आहे ?

Your score is

The average score is 45%

स्पष्टीकरण :

Q1. दोन शब्द वा वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात?

पर्याय:
अ) उभयान्वयी अव्यये
ब) शब्दयोगी अव्यये
क) क्रियाविशेषण अव्यये
ड) केवलप्रयोगी अव्यये

उत्तर: उभयान्वयी अव्यये

स्पष्टीकरण:
उभयान्वयी अव्यय हे दोन शब्द किंवा वाक्यांना जोडण्याचे कार्य करतात (उदा. आणि, पण, किंवा).


Q2. शब्दाच्या रूपात बदल कशामुळे होऊ शकतो?

पर्याय:
अ) लिंग
ब) वचन
क) विभक्ती
ड) यापैकी सर्व

उत्तर: यापैकी सर्व

स्पष्टीकरण:
शब्दाचे रूप लिंग, वचन आणि विभक्ती यांमुळे बदलते, त्यामुळे सर्व पर्याय योग्य आहेत.


Q3. खालीलपैकी स्थलवाचक शब्दयोगी अव्यय ओळखा.

पर्याय:
अ) आधी
ब) परिस
क) समक्ष
ड) जोगा

उत्तर: समक्ष

स्पष्टीकरण:
‘समक्ष’ म्हणजे समोर/पुढे, जे स्थान (स्थळ) दर्शवते, म्हणून ते स्थलवाचक शब्दयोगी अव्यय आहे.


Q4. काळ ओळखा: “मी धुरंधर चित्रपट पाहिलेला आहे.”

पर्याय:
अ) पूर्ण भूतकाळ
ब) रिती वर्तमान काळ
क) भविष्यकाळ

उत्तर: पूर्ण भूतकाळ

स्पष्टीकरण:
‘पाहिलेला आहे’ ही रचना पूर्ण झालेली क्रिया दर्शवते, म्हणून तो पूर्ण भूतकाळ आहे.


Q5. खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा.

पर्याय:
अ) खाटा
ब) चांदण्या
क) लाटा
ड) झरा

उत्तर: झरा

स्पष्टीकरण:
‘झरा’ हा एकवचनी शब्द आहे, तर इतर सर्व बहुवचनी आहेत.


📲 Daily MCQ आणि Mock Test साठी आमच्या Telegram channel ला join करा!

👉 Join Now: https://t.me/gsestudypoint


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page

© 2026 Gsestudypoint | Learn Education
Privacy PolicyContact UsAbout UsDMCATerms & ConditionsDisclaimer