🔥 Latest Updates

पोलीस शिपाई सराव पेपर टेस्ट 1 | Online Mock Test 2026

पोलीस शिपाई सराव पेपर टेस्ट | Police Shipai Mock Test

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो!

पोलीस दलात भरती होऊन ‘खाकी’ वर्दी परिधान करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तुम्हा सर्व भावी पोलिसांचे मनापासून स्वागत आहे.

२०२६ च्या आगामी पोलीस शिपाई भरतीसाठी तुम्ही सर्वजण जीवतोडून मेहनत घेत आहात, याची मला जाणीव आहे. तुमचा हाच अभ्यास अधिक पक्का करण्यासाठी आणि तुम्हाला परीक्षेच्या पॅटर्नचा अचूक अंदाज येण्यासाठी, आम्ही घेऊन आलो आहोत ‘पोलीस शिपाई सराव पेपर टेस्ट १’.

परीक्षेत यश मिळवण्यासाठी फक्त वाचन पुरेसे नसते, तर योग्य प्रश्नांचा सराव करणे सर्वात महत्त्वाचे असते. या ऑनलाईन मॉक टेस्टमध्ये चालू घडामोडी, सामान्य ज्ञान आणि इतर महत्त्वाच्या विषयांवरील निवडक प्रश्नांचा समावेश केला आहे. हे प्रश्न सोडवल्याने तुम्हाला तुमचा अभ्यास कुठपर्यंत आला आहे, हे स्वतःच तपासता येईल.

चला तर मग, वेळ न दवडता या सराव पेपरला सुरुवात करूया. प्रत्येक प्रश्नाखालील स्पष्टीकरण नक्की वाचा, जेणेकरून तुमच्या चुका सुधारतील आणि ज्ञानात भर पडेल!

पोलिस भरती सराव पेपर टेस्ट 1

📘 पोलीस शिपाई सराव पेपर टेस्ट 1

• 📝 एकूण प्रश्न – 100
• 📚 प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण
• ✅ टेस्ट पूर्ण होताच तत्काल रिझल्ट
• 🔥 Police Bharti, SRPF, Talathi व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
• 💡 कमजोर विषय सुधारण्यासाठी प्रभावी सराव टेस्ट
• 📱 मोबाईल फ्रेंडली इंटरॲक्टिव्ह परीक्षा
• 🏆 गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण व सामान्य ज्ञान (GK) मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण MCQ टेस्ट
• ⏱️ वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी परीक्षा पॅटर्ननुसार सराव
• 🎯 महाराष्ट्र पोलीस भरती 2026 नवीन अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न
• 🚀 पोलीस शिपाई भरतीमध्ये जास्त गुण मिळवण्यासाठी उपयुक्त Mock Test

1 / 100

. भारत सरकारचा सर्वोच्च विधी अधिकारी खालीलपैकी कोण असतो ?

2 / 100

"नखभिन्न" समास ओळखा ?

3 / 100

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मनापासून शिकवावे. वाक्याचा प्रयोग ओळखा ?

4 / 100

"अरेच्छा" केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा ?

5 / 100

लता व मनोज विजूच्या घरी गेले. वाक्याचा प्रकार सांगा ?

6 / 100

यमक, अनुप्रास, उपमा, हे कसले प्रकार आहेत ?

7 / 100

अव्ययालाच ..... शब्द म्हणतात ?

8 / 100

नदीचे पाणी निळेशार आहे. या वाक्यातील विशेषण कोणता ?

9 / 100

रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा पुरामुळे लोकांचे ..... नुकसान झाले

10 / 100

खालिलपैकी कोणते प्रथम पुरूषवाचक सर्वनाम नाही ?

11 / 100

वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा विकारी शब्द म्हणजे .....

12 / 100

तडीस नेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा ?

13 / 100

"कर्कश" या शब्दाचा विरुद्धार्थी ?

14 / 100

खालिलपैकी कोणते अनुनासिक मुर्धन्य आहे ?

15 / 100

पुढिलपैकी वर्णाचा अचूक प्रकार ओळखा - अ, आ

16 / 100

"नृप" शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?

17 / 100

ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ ..... बोध होतो अशा वाक्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात.

18 / 100

"आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो" हे विधान वाक्याच्या कोणत्या प्रकारात येते ?

19 / 100

रिपु या शब्दाचा अर्थ ?

20 / 100

वस्तुच्या अंगाचा गुणधर्म म्हणजे भाव व्यक्त करणाऱ्या नामाला .... म्हणतात ?

21 / 100

जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या काळात झाली ?

22 / 100

दिलेल्या आकृतीत एकूण त्रिकोण किती ?

23 / 100

फास्यांची 2 अवस्था खाली दर्शविली आहे. जेव्हा क्रमांक '1' वर असतो. तळाशी कोणती संख्या असेल ?

24 / 100

अमित म्हणाला - "ही मुलगी माझ्या आईच्या नातवाची बायको आहे". अमितचा मुलीशी संबंध कसा ?

25 / 100

चौरसांची संख्या मोजा.

26 / 100

एका वर्गातील 75 विद्यार्थ्याचे सरासरी वय 7 वर्षे आहे. त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळविल्यास त्यांचे सरासरी वय 7.5 वर्षे होते, तर शिक्षकाचे वय किती ?

27 / 100

16 संख्येची सरासरी 19 आहे तर प्रत्येक संख्येस 2 ने भागल्यास तयार झालेल्या नवीन संख्याची सरासरी काढा ?

28 / 100

एका परिक्षा केंद्रात एका वर्गामध्ये 7 रांगा आहेत असे एकूण 3 वर्ग आहेत. एका रांगेत 25 विद्यार्थी बसतात. एका रांगेसाठी 2 शिक्षक आणि एका वर्गासाठी एक परिवेक्षक आहे. तर एका केंद्रप्रमुखासह परिक्षाकेंद्रात एकूण किती लोक उपस्थित आहेत ?

29 / 100

एका भ्रमण ध्वनीची बॅटरी पुर्ण चार्जिग झाल्यावर 2 तास त्यावर बोलू शकतो, तर शेवटची 3 टक्के बॅटरी शिल्लक असल्यावर किती वेळ बोलू शकेल ?

30 / 100

काही कामगार एक काम पुर्ण करण्यासाठी 30 दिवस लावतात. जर कामगारांची संख्या दुप्पट केल्यास एका तृतीयांश (1/3) काम पुर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील ?

31 / 100

एका वसतीगृहामध्ये 150 विद्यार्थ्याना 45 दिवस पुरेल इतका अन्नसाठा उपलब्ध आहे. 10 दिवसानंतर यातील 25 विद्यार्थी वस्तीगृह सोडून गेले तर पहिल्या दिवसापासून किती दिवस अन्नसाठा पुरेल ?

32 / 100

निलेशने एक घड्याळ विकल्यास 25 टक्के नफा मिळाला. या व्यवहारात खरीदाराने निलेशला 500 रु. ची नोट दिल्यानंतर निलेशने बाकी 125 रु. परत केले तर निलेशने ती घड्याळ किती रुपयाला विकत घेतली ?

33 / 100

एका बॅटस्मनने 110 धावा काढल्या, त्यापैकी 3 चौकार आणि 8 षटकार होते तर धावून काढलेल्या धावांची संख्येची टक्केवारी किती ?

34 / 100

. x या संख्येतून 75 टक्के काढून त्यामध्ये 75 ही संख्या मिळवली असता x हीच संख्या मिळते तर x = ?

35 / 100

एक दुधवाला दुधामध्ये 80 टक्के भेसळ करतो. या दुधवाल्याकडून 80 लिटर दुध विकत घेतले असता त्यात किती लिटर शुद्ध दुध मिळेल ?

36 / 100

एका चौरस परिमिती 24 आहे. तर चौरसाचे क्षेत्रफळ किती ?

37 / 100

विसंगत संख्या कोणती ?

38 / 100

रविच्या घरी कोंबड्या आणि गायी आहेत. त्यांच्या एकूण डोक्यांची संख्या 48 आणि एकूण पायांची संख्या 140 तर यात आणखी 10 कोंबड्या आणल्यास रविच्या घरी एकूण कोंबड्या किती होतील ?

39 / 100

1, 2, 3 हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती तीन अंकी संख्या होतील ?

40 / 100

दिलेले समीकरण बरोबर करण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांना परस्पर बदलण्याची आवश्यकता आहे? 3 - 36 × 9 ÷ 3 + 12 = 3

41 / 100

एक सैनिकी तळावर 100 सैनिकांना 10 दिवस पुरेल इतके रेशन उपलब्ध आहे. 2 दिवसांनंतर आणखी 60 सैनिक तळावर येतात. तर राहीलेले रेशन आणखी किती दिवस पुरेल ?

42 / 100

भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे स्थापन झाले होते ?

43 / 100

गणपतरावाने 2250 रुपयांचे कर्ज 5 हप्त्यात फेडले, प्रत्येक हप्ता मागील हप्तापेक्षा 50 रुपये अधिक होता तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता ?

44 / 100

एका वर्तुळाचा परीघ 44 सेमी आहे. तर त्याची त्रिज्या किती सेमी आहे ?

45 / 100

खाली काही कथन आणि निष्कर्ष दिलेले आहेत. दिलेल्या कथनांना सत्य मानून योग्य निष्कर्षाची निवड करा. कथन :

सर्व पेन्सिल घर आहेत. सर्व घर खोडरबर आहेत. निष्कर्ष : I. सर्व पेन्सिल खोडरबर आहेत. II. काही खोडरबर पेन्सिल आहेत. III. सर्व खोडरबर पेन्सिल आहेत.

46 / 100

जगदीश, राजेश व पंकज यांनी सुरु केलेल्या सॉफ्टवेअर व्यवसायात 84000 रुपयाचा नफा झाला. त्यांनी अनुक्रमे 2 : 3 : 7 या प्रमाणात नफ्याचे वाटप केले. तर राजेशचा वाटा किती रुपये ?

47 / 100

जेव्हा एक धावपटू 12 किमीचा टप्पा पार करत होती, तेव्हा तिला सांगण्यात आले की तिने केवळ 80% शर्यत पूर्ण केली आहे. या स्पर्धेत धावणाऱ्याने किती किलोमीटर धावायचे होते ?

48 / 100

100 ग्रॅम गहू ची किंमत 7.55 रू आहे. तर 2.5 किलो गहू ची किंमत किती ?

49 / 100

जर A च उत्पन्न B च्या उत्पन्नापेक्षा 12 टक्याने जास्त आहे, तर B च उतपन्न A च्या उत्पन्नापेक्षा किती टक्याने कमी आहे ?

50 / 100

200 कोटी म्हणजे 2 वर किती शुन्य असतात ?

51 / 100

मुंबई महानगरपालिकेचे पहिले शरीफ कोण होते ?

52 / 100

एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते, तर दसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही एकाच वेळी चालू केले, तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल ?

53 / 100

ताशी 72 कि. मी. वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 12 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती ?

54 / 100

एका आयताची लांबी रुंदीच्या दुपटीपेक्षा 1 ने कमी आहे त्या आयताची परिमिती 70 सेंमी. असल्यास लांबी किती ?

55 / 100

एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौसेमी असेल तर त्याचा परीघ किती असेल ?

56 / 100

एक पार्टीत 12 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकानेएकेकदा हस्तांदोलन केले, कोणत्याही दोनहस्तांदोलन एकदाच होईल. तर एकूण हस्तादालनाची संख्या किती ?

57 / 100

दिलेल्या पर्यायांतून संबंधित संख्येची निवड करा. 26: 64:: 54: ?

58 / 100

1600 रु. मुद्दलाचे शेकडा 15 रु. दराने तीन वर्षानी व्याज किती ?

59 / 100

आता माया आणि छाया यांच्या वयाचे गुणोत्तर 6 : 5 आहे आणि 15 वर्षांनंतर गुणोत्तर 9 : 8 होते. तर मायाचे वर्तमान वय किती ?

60 / 100

लोथल हे शहर प्राचीन कशासाठी प्रसिद्ध आहे ?

61 / 100

लेखक व त्यांचे पुस्तक यातील चुकीची जोडी ओळखा ?

62 / 100

भारतीय राज्य घटनेनुसार धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास कोणत्या कलमान्वये मनाई करण्यात आली आहे ?

63 / 100

महाराष्ट्रातील मुबलक मँगनीज लोहखनिज दर्शविणारा जिल्ह्यांचा समूह कोणता ?

64 / 100

संयुक्त राष्ट्र संघाची पहिली जागतिक पर्यावरण परिषद 1972 साली कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती ?

65 / 100

खालीलपैकी कोणत्या वायुमुळे आम्ल वर्षा होते ?

66 / 100

भारताचा सर्वात मोठा समुद्राखाली तिरंगा कुठे फडकवण्यात आला ?

67 / 100

भारतात पहिली रेल्वे सेवा केव्हा सुरू झाली होती ?

68 / 100

मगरींसाठी खालील कोणते राष्ट्रीय उद्यान प्रसिध्द आहे ?

69 / 100

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली ?

70 / 100

अभिनेता विजय जोसेफ यांच्या पक्षाचे नाव काय आहे ?

71 / 100

सुनेत्रा पवार यांना विधानसभा पोटनिवडणुकीत किती मते मिळाली ?

72 / 100

इ. स. 1917 मध्ये प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणारे महाविद्यालय कोणी सुरु केले ?

73 / 100

केंद्रिय प्रदुषण नियंत्रण बोर्डाची स्थापना केव्हा झाली ?

74 / 100

भारतात सर्वात जास्त मताधिक्यांनी कोण जिंकून आले आहेत ?

75 / 100

. वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अंमलात आला ?

76 / 100

20 फेब्रुवारी 1948 रोजी कोणते संस्थान भारतात विलीन झाले ?

77 / 100

भारत देश खालीलपैकी कोणत्या संघटनेचा सदस्य नाही ?

78 / 100

सर्वप्रथम राष्ट्रीयीकरण झालेली भारतातील पहिली बँक ?

79 / 100

हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो ?

80 / 100

क्षयरोग हा शरीरातील कोणत्या भागात होतो ?

81 / 100

भारतात 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला ?

82 / 100

चुकी जोडी ओळखा ?

83 / 100

नर्मदा नदी ही किती राज्यातुन वाहते ?

84 / 100

पुलित्झर पुरस्कार 2026 कोणत्या दोन भारतीयांना मिळाला आहे ?

85 / 100

. राजकीय चळवळीसाठी चतुसूत्रींचा कार्यक्रम भारतीय जनतेपुढे कोणी मांडला ?

86 / 100

सेवाग्राम आणि पवनार हे दोन्ही आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे ?

87 / 100

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थापना कोणत्या साली झाली ?

88 / 100

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मगाव कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

89 / 100

विदर्भ या प्राकृतिक विभागात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही ?

90 / 100

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे ?

91 / 100

माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हा पासून अमंलात आला ?

92 / 100

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?

93 / 100

भारतीय सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश व सरन्यायाधीश यांची एकूण संख्या किती होणार आहे ?

94 / 100

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?

95 / 100

भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत ?

96 / 100

मूलद्रव्य व संज्ञा यातील चुकीची जोडी ओळखा ?

97 / 100

7 मे 2026 रोजी ऑपरेशन सिंदूरला किती वर्षे पूर्ण झाली ?

98 / 100

भारताचे नौदल प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?

99 / 100

पश्चिम बंगालचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत ?

100 / 100

भारताचे नवीन "चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ" (CDS) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

Your score is

प्रश्नांचे स्पष्टीकरण :

१. भारताचे नवीन “चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ” (CDS) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

A) अनिल चौहान

B) बिपिन रावत

C) एन. एस. राजा सुब्रमणी

D) मनोज पांडे

💡 हे उत्तर का बरोबर आहे ते समजून घ्या: > जनरल अनिल चौहान हे भारताचे विद्यमान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) आहेत. भारताचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांच्या अपघाती निधनानंतर त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली.

२. पश्चिम बंगालचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत?

A) ममता बॅनर्जी

B) दिलीप घोष

C) सुवेंदू अधिकारी

D) अभिषेक बॅनर्जी

💡 हे उत्तर का बरोबर आहे ते समजून घ्या: > पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत. त्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाच्या प्रमुख असून, त्यांनी सलग अनेक वर्षे राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे.

३. भारताचे नौदल प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

A) करमबीर सिंह

B) कृष्णा स्वामीनाथन

C) आर. हरिकुमार

D) दिनेश त्रिपाठी

💡 हे उत्तर का बरोबर आहे ते समजून घ्या: > ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी अलिकडेच भारताचे नवीन नौदल प्रमुख (Chief of Naval Staff) म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी ॲडमिरल आर. हरिकुमार यांची जागा घेतली. (टीप: मूळ उत्तरतालिकेत पर्याय B दिला आहे, परंतु सद्यस्थितीत दिनेश त्रिपाठी हे उत्तर योग्य आहे).

४. 7 मे 2026 रोजी ऑपरेशन सिंदूरला किती वर्षे पूर्ण झाली?

A) 2 वर्षे

B) 3 वर्षे

C) 1 वर्ष

D) 5 वर्षे

💡 हे उत्तर का बरोबर आहे ते समजून घ्या: > ऑपरेशन सिंदूर हे मे २०२५ मध्ये राबवण्यात आले होते. त्यामुळे ७ मे २०२६ रोजी या मोहिमेला बरोबर १ वर्ष पूर्ण झाले आहे.

५. मूलद्रव्य व संज्ञा यातील चुकीची जोडी ओळखा ?

A) कॅल्शियम – Ca

B) लोह – Fe

C) पोटॅशियम – Po

D) अरगॉन – Ar

💡 हे उत्तर का बरोबर आहे ते समजून घ्या: > ही जोडी चुकीची आहे कारण पोटॅशियमची शास्त्रीय संज्ञा ‘K’ (कॅलियम) अशी आहे. ‘Po’ ही पोलोनियम (Polonium) या मूलद्रव्याची संज्ञा आहे.

६. भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत ?

A) अमित शहा

B) राजनाथ सिंग

C) निर्मला सीतारामन

D) नरेंद्र मोदी

💡 हे उत्तर का बरोबर आहे ते समजून घ्या: > राजनाथ सिंग हे भारताचे विद्यमान संरक्षण मंत्री (Defence Minister) आहेत. अमित शहा हे गृहमंत्री तर निर्मला सीतारामन या अर्थमंत्री आहेत.

७. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?

A) सिंधू – मानसरोवर

B) गंगा – गंगोत्री

C) साबरमती – हिमालय पर्वत

D) नर्मदा – अमरकंटक

💡 हे उत्तर का बरोबर आहे ते समजून घ्या: > साबरमती नदीचा उगम हिमालय पर्वतातून होत नाही, तर तिचा उगम राजस्थानमधील अरवली पर्वतरांगांमध्ये होतो. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे.

८. भारतीय सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश व सरन्यायाधीश यांची एकूण संख्या किती होणार आहे?

A) 36

B) 37

C) 38

D) 39

💡 हे उत्तर का बरोबर आहे ते समजून घ्या: > संसदेच्या नवीन तरतुदींनुसार किंवा प्रस्तावित वाढीनुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या (सरन्यायाधीशांसह) ३८ पर्यंत वाढवण्याचा विचार आहे.

९. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?

A) पर्यावरण दिन – 5 जून

B) वसुंधरा दिन – 22 एप्रिल

C) ओझोन दिन – 16 सप्टेंबर

D) जैवविविधता दिन – 22 जून

💡 हे उत्तर का बरोबर आहे ते समजून घ्या: > आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन (International Day for Biological Diversity) हा दरवर्षी ‘२२ मे’ रोजी साजरा केला जातो, ‘२२ जून’ रोजी नाही.

१०. माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हा पासून अमंलात आला ?

A) 17 ऑक्टोंबर 2000

B) 10 ऑक्टोंबर 2000

C) 2 जानेवारी 2000

D) यापैकी एकही नाही

💡 हे उत्तर का बरोबर आहे ते समजून घ्या: > भारताचा माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act, 2000) हा १७ ऑक्टोबर २००० रोजी संपूर्ण देशात अधिकृतपणे लागू करण्यात आला. सायबर गुन्हे रोखण्यासाठी हा कायदा महत्त्वाचा आहे.

📲 Daily MCQ आणि Mock Test साठी आमच्या Telegram channel ला join करा!

विद्यार्थी मित्रांनो, अशाच दर्जेदार प्रश्नांचा रोज सराव करण्यासाठी आणि पोलीस भरतीच्या नवनवीन अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनेलशी नक्की जोडून राहा. आपला अभ्यास असाच अविरत सुरू ठेवा, यश नक्कीच तुमचे आहे!

👉 Join Now: https://t.me/gsestudypoint


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page

© 2026 Gsestudypoint | Learn Education
Privacy PolicyContact UsAbout UsDMCATerms & ConditionsDisclaimer