SRPF गट नं. 17 चंद्रपूर पेपर टेस्ट 2026 | Free Mock Test | SRPF Bharti Practice Paper

SRPF गट न. 17 चंद्रपूर पेपर टेस्ट 2026

📝 SRPF गट न. 17 चंद्रपूर पेपर टेस्ट 2026

SRPF (State Reserve Police Force) भरती 2026 साठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही विशेष संभाव्य पेपर टेस्ट तयार करण्यात आली आहे. 2026 च्या भरती परीक्षेचा विचार करून, नवीन परीक्षापद्धती आणि बदललेला पॅटर्न लक्षात घेऊन हा सराव पेपर तयार करण्यात आला आहे.

या टेस्टमध्ये सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, चालू घडामोडी आणि SRPF संबंधित मूलभूत माहिती यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष परीक्षेसारखा अनुभव मिळेल आणि तुमची तयारी अधिक प्रभावी होईल.


या संभाव्य पेपरची वैशिष्ट्ये:

📌 परीक्षेत विचारले जाऊ शकणारे संभाव्य प्रश्न
📌 SRPF संबंधित मूलभूत माहितीवर विशेष भर
📌 सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता विषयक महत्त्वाचे प्रश्न
📌 नवीन पोलीस भरती पॅटर्ननुसार प्रश्नरचना
📌 वेळेचे योग्य नियोजन करण्यासाठी उपयुक्त सराव
📌 आत्मविश्वास वाढवणारा पूर्ण पेपर अनुभव


🚔 ही संभाव्य टेस्ट का सोडवावी?

SRPF भरती परीक्षेत यश मिळवण्यासाठी केवळ अभ्यास पुरेसा नसून नियमित सराव अत्यंत आवश्यक आहे.

ही टेस्ट सोडवून तुम्ही:

✔️ तुमची तयारी तपासू शकता
✔️ चुका ओळखून सुधारणा करू शकता
✔️ आत्मविश्वास वाढवू शकता
✔️ अंतिम परीक्षेसाठी स्वतःला अधिक सक्षम बनवू शकता


🎯 निष्कर्ष

💯 दररोज सराव करा, अपडेट राहा आणि SRPF भरती 2026 मध्ये यश मिळवा! 🚀

👉 रोज नवीन टेस्ट साठी जॉईन करा: @gsestudypoint

1 / 100

वर्तुळाच्या मोठ्या जिवेला काय म्हणतात ?

2 / 100

एका संख्येतून ५ वजा करून ७ ने भागल्यास उत्तर २ येते, तर त्याच संख्येतून ४ वजा करून ३ ने भागल्यास किती उत्तर येईल ?

3 / 100

खालीलपैकी इतरांपेक्षा वेगळी संख्या कोणती ?

4 / 100

एकापाठोपाठ एक येणाऱ्या ०४ सम संख्यांची बेरीज १८० आहे, तर एकापाठोपाठ एक येणाऱ्या पुढील ०४ समसंख्यांची बेरीज किती ?

5 / 100

०१ विक्रेता ०१ कपाट २५२० रुपयास विकून २० टक्के नफा मिळवतो, तर त्या कपाटाची खरेदीची किंमत किती ?

6 / 100

पाया ५ सेंटीमीटर व उंची १२ सेंटीमीटर असणाऱ्या काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी किती ?

7 / 100

१ मीटर म्हणजे किती इंच ?

8 / 100

१६ : ६४ :: २४ : ?

9 / 100

०२ माणसे ०१ काम ०६ दिवसात करतात, तर तेच काम ०४ माणसे किती दिवसात पूर्ण करतील ?

10 / 100

४५८७२३ या अंकामधील ५ व २ या संख्यांच्या स्थानिक किंमतीमधील फरक किती ?

11 / 100

उन्हात वाळू घातलेले १० पापड वाळायला २० मिनिटे लागतात, तर त्याच उन्हात ०१ पापड किती वेळात वाळेल ?

12 / 100

२० मीटर कापडाची किंमत ३६०० रुपये आहे, तर १६ मीटर कापडाची किंमत किती ?

13 / 100

एका वर्तुळाचे क्षेत्रफळ १३८६ चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचा परीघ किती ?

14 / 100

खालीलपैकी मूळ संख्यांचा गट कोणता ?

15 / 100

८५ या संख्येचा वर्ग किती ?

16 / 100

७० व १०५ या दोन संख्यांचा लसावी २१० आहे, तर त्यांचा मसावी किती ?

17 / 100

२१०० रुपयाचे मुद्दलाचे द.सा.द.शे. ७ टक्के दराने ३ वर्षाचे सरळव्याज काढा.

18 / 100

रमेशने प्रत्येक दिवशी १ तास १५ मिनिटे व्यायाम केला, तर रमेशने जून महिन्यात एकूण किती वेळ व्यायाम केला ?

19 / 100

१ ते १०० अंक लिहीतांना ८ हा अंक किती वेळा लिहीला जातो ?

20 / 100

५ अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून ४ अंकी लहानात लहान संख्या वजा केल्यावर येणारी संख्या कोणती ?

21 / 100

१ ते २० यामधील मूळ संख्यांची एकूण बेरीज किती ?

22 / 100

० हा अंक ज्या संख्येत नाही अशा दोन अंकी संख्या किती ?

23 / 100

२० च्या पाढ्यातील पहिल्या ७ संख्यांची बेरीज किती ?

24 / 100

३१७ x ३१७ + २८३ x २८३ = ?

25 / 100

पुढील बेरीज करा. ९९९९९ + ९९९ + ९९ + ९

26 / 100

रक्त गोठण्यासाठी शरिरातील कोणत्या पेशी महत्वाची भुमीका बजावतात ?

27 / 100

देशातील पहिल्या चित्ता सफारीचा शुभारंभ कोणत्या राष्ट्रीय उद्यानात करण्यात आला ?

28 / 100

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ?

29 / 100

१६ वर्षांखालील मुलांवर सोशल मिडीया वापराबाबत बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता ?

30 / 100

नुकतेच पार पडलेले सन २०२६ मधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात पार पडले ?

31 / 100

नुकत्याच पार पडलेल्या टी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमधील मालीका वीराचा सन्मान कोणाला मिळाला ?

32 / 100

ईटीयाडोह हे धरण कोणत्या नदीवर आहे ?

33 / 100

भारतातील सर्वाधिक साक्षरता असणारे राज्य कोणते ?

34 / 100

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

35 / 100

भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखतात ?

36 / 100

वर्धा व वैनगंगा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो ?

37 / 100

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्यावर झाला होता ?

38 / 100

कॉम्पुटर आणि मोबाईल यांच्याशी निगडीत OTP या शब्दाचा लॉगफॉर्म काय आहे ?

39 / 100

विजेचा शोध कोणी लावला ?

40 / 100

सौरमालीकेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?

41 / 100

महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ?

42 / 100

पोलीओ हा आजार शरीराच्या कोणत्या भागावर इजा करतो ?

43 / 100

जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी असतो ?

44 / 100

सुनिल छेत्री हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

45 / 100

गुलाबी क्रांती हा शब्द कशाशी संबधीत आहे ?

46 / 100

भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत ?

47 / 100

कुचीपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे ?

48 / 100

जालीयनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रविंद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला ?

49 / 100

गुजरात राज्याची राजधानी कोणती ?

50 / 100

श्रीमान योगी या प्रसिद्ध मराठी कादंबरीचे लेखक कोण आहे ?

51 / 100

पुढील वाक्याचे चालू वर्तमानकाळामध्ये रूपांतर करा. वाक्य - मी पत्र लिहीन.

52 / 100

अमोलने आंबा खाल्ला. या वाक्यातील अमोलने या शब्दातील विभक्ती ओळखा.

53 / 100

पुढील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा. वाक्य - तो अभ्यास करून पास झाला.

54 / 100

पाऊस या शब्दाचे सामान्य रूप कोणते ?

55 / 100

खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता ?

56 / 100

किडूकमीडूक हा मराठीत आलेला शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतुन आलेला आहे ?

57 / 100

खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा.

58 / 100

दररोज या शब्दाचा समास सांगा.

59 / 100

पायापासून डोक्यापर्यंत या शब्द समूहासाठी योग्य पर्यायाची निवड करा.

60 / 100

खालीलपैकी संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते ?

61 / 100

योग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी निवडा.

62 / 100

कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ?

63 / 100

पुढील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. "लाखोश्री आणि भिकेश्री एकच"

64 / 100

तो जोरात बोलतो. या वाक्यातील जोरात हे कोणते क्रियाविशेषण आहे ?

65 / 100

पुढील वाक्यातील अलंकार ओळखा. वाक्य - देह देवाचे मंदीर। आत आत्मा परमेश्वर ।।

66 / 100

खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.

67 / 100

चौपट हे खालीलपैकी कोणते विशेषण आहे ?

68 / 100

आपद् + काल या शब्दाची संधी करा.

69 / 100

उखळ पांढरे होणे, या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता ?

70 / 100

रामाने रावणाला मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

71 / 100

उंबराचे फुल म्हणजे काय ?

72 / 100

सागवान या शब्दाचे लिंग ओळखा.

73 / 100

शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा.

74 / 100

अमोल सतत मोबाईलवर पाहत असतो. या वाक्यातील सतत या शब्दास काय म्हणतात ?

75 / 100

हिमालय हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ?

76 / 100

खालील दिलेले शब्द शब्दकोषामध्ये (डीक्शनरी) कोणत्या क्रमाने येतील ?

१) Internet २) India ३) Income ४) Import

77 / 100

शिल्पा मनिषाला म्हणाली की, माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. तर मनिषाचे शिल्पाशी नाते काय ?

78 / 100

कासवाला मांजर म्हटले, मांजराला उंदीर म्हटले, कुत्र्याला कासव म्हटले तर भुंकणारा प्राणी कोणता ?

79 / 100

एका कार्यालयाचा आठवडा गुरुवार पासून सुरु होतो. तर त्याच आठवड्यातील ५ वा दिवस कोणता ?

80 / 100

जर A = -, B = +, C = x, D = ÷ तर 32D4B7C2A6 याची किंमत किती ?

81 / 100

जर पश्चिम दिशेला ईशान्य दिशा म्हटले तर आग्नेय दिशेस काय म्हणावे लागेल ?

82 / 100

रमनला ४ काका आहेत. तर चंद्रपूर ला राहणाऱ्या त्याच्या काकाला किती भाऊ आहेत ?

83 / 100

पुढील दिलेल्या कोणत्या पर्यायातील ३ शब्दांनी प्रश्नातील आकृती दर्शविता येते ?

84 / 100

PEN = ३५, BALLPEN = ६२ तर PAPER = ?

85 / 100

जर सुरत हे अकोल्यापेक्षा मोठे असेल. कानपूर हे पुण्यापेक्षा मोठे असेल. पुणे हे सुरत पेक्षा मोठे असेल तर सर्वात मोठे शहर कोणते ?

86 / 100

एक व्यक्ती त्यांच्या कार्यालयापासून पूर्वेकडे ५ कि.मी चालतो व डावीकडे वळून ३ कि. मी जातो व पुन्हा डावीकडे वळा व ५ कि.मी चालतो. तर त्याने चालण्यास सुरुवात केलेल्या ठिकाणापासून किती कि.मी अंतरावर तो आहे ?

87 / 100

घड्याळात ८ वाजून २० मी. झाले असतांना तास काटा व मिनीट काटा यांच्यात किती अंश मापाचा कोन होतो ?

88 / 100

A, B, C, D, E, F हे मित्र केंद्रा कडे चेहरा करुन वर्तुळाकार बसलेले आहेत. E हा D च्या डावीकडे आहे. C हा A आणि B च्या मध्ये आहे. E व A यांच्या मध्ये F आहे. तर C च्या लगतच्या उजवीकडील कोण ?

89 / 100

३.३० वाजता घड्याळाची आरशातील प्रतीमा कोणती वेळ दर्शविते ?

90 / 100

पुढील दिलेल्या संख्यामालेत ६ या अंकानंतर लगेच १६ हा अंक किती वेळा येतो ?

६१६६११६१६११६१६६६६६११६१६११६१६

91 / 100

एका स्पर्धेमध्ये ८ संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघ दुसऱ्या संघाबरोबर प्रत्येकी एक सामना खेळतो, तर एकूण सामने किती होतील ?

92 / 100

३ फेब्रुवारी २००४ रोजी मंगळवार होता, खालील पैकी कोणता वार त्याच महिन्यात ५ वेळा येईल ?

93 / 100

राजु, सुनिल व अरुन यांच्या वयांची बेरीज ७७ वर्ष आहे. ३ वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष होती ?

94 / 100

मुलींच्या रांगेत संध्या डावीकडुन ८ वी आहे, मीना उजवीकडुन १७ वी आहे. जर त्यांनी आपापसामध्ये जागा बदलल्या तर संध्या डावीकडे १४ वी येईल. तर रांगे मध्ये एकूण मुली किती ?

95 / 100

सकाळी ०६.०० वाजता रुपेश ग्रामपंचायतीमध्ये बसला होता. त्याच्या उजव्याबाजुला खिडकीतुन प्रकाशाची किरणे आत येत होती. तर त्यावेळी रुपेशचे तोंड कोणत्या दिशेस असेल ?

96 / 100

खालील पैकी विसंगत घटक ओळखा.

97 / 100

गाय - गवत या सारखा संबंध दर्शविणारा पर्याय कोणता ?

98 / 100

जर STATION हा शब्द ATSTNOI असा लिहीतात तर CHENNAI हा शब्द कसा लिहाल ?

99 / 100

प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारा अक्षरांचा समुह कोणता ?

AZBY, DWEV, GTHS, ?

100 / 100

प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या कोणती ?

३८, ५१, ६६, ८३, ?

Your score is



इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page