SRPF गट नं. 16 कोल्हापूर पेपर टेस्ट 2026 | Free Mock Test | SRPF Bharti Practice Paper

SRPF गट न. 16 कोल्हापूर पेपर टेस्ट 2026

📝 SRPF गट न. 16 कोल्हापूर पेपर टेस्ट 2026

SRPF (State Reserve Police Force) भरती 2026 साठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही विशेष संभाव्य पेपर टेस्ट तयार करण्यात आली आहे. 2026 च्या भरती परीक्षेचा विचार करून, नवीन परीक्षापद्धती आणि बदललेला पॅटर्न लक्षात घेऊन हा सराव पेपर तयार करण्यात आला आहे.

या टेस्टमध्ये सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, चालू घडामोडी आणि SRPF संबंधित मूलभूत माहिती यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष परीक्षेसारखा अनुभव मिळेल आणि तुमची तयारी अधिक प्रभावी होईल.

या संभाव्य पेपरची वैशिष्ट्ये:

📌 परीक्षेत विचारले जाऊ शकणारे संभाव्य प्रश्न
📌 SRPF संबंधित मूलभूत माहितीवर विशेष भर
📌 सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता विषयक महत्त्वाचे प्रश्न
📌 नवीन पोलीस भरती पॅटर्ननुसार प्रश्नरचना
📌 वेळेचे योग्य नियोजन करण्यासाठी उपयुक्त सराव
📌 आत्मविश्वास वाढवणारा पूर्ण पेपर अनुभव

🚔 ही संभाव्य टेस्ट का सोडवावी?

SRPF भरती परीक्षेत यश मिळवण्यासाठी केवळ अभ्यास पुरेसा नसून नियमित सराव अत्यंत आवश्यक आहे.

ही टेस्ट सोडवून तुम्ही:

✔️ तुमची तयारी तपासू शकता
✔️ चुका ओळखून सुधारणा करू शकता
✔️ आत्मविश्वास वाढवू शकता
✔️ अंतिम परीक्षेसाठी स्वतःला अधिक सक्षम बनवू शकता

🎯 निष्कर्ष

💯 दररोज सराव करा, अपडेट राहा आणि SRPF भरती 2026 मध्ये यश मिळवा! 🚀

👉 रोज नवीन टेस्ट साठी जॉईन करा: @gsestudypoint

1 / 100

सलग दोन सवलती नंतर रुपये 150 ची सूचीबध्द किंमत असलेला 1 शर्ट रुपये 105 मध्ये उपलब्ध आहे, दुसरी सवलत 12.5% असल्यास पहिली सवलत शोधा ?

2 / 100

संख्या आणि चिन्हे यांच्या खालील पैकी कोणत्या अदलाबदलीमुळे दिलेले समीकरण संतुलीत होईल:

$75 + 28 - 12 \div 14 \times 6 = 5$

3 / 100

200 मीटरची शर्यत A आणि B अनुक्रमे 22 आणि 25 सेकंदात पूर्ण करतात. जेव्हा A शर्यतीच्या अंतीम रेषेवर पोहचेल तेव्हा B त्याच्या पासून किती मीटर अंतरावर असेल ?

4 / 100

एका सांकेतिक भाषेत 987 म्हणजे KING IS TALL, 965 म्हणजे QUEEN IS CLEVER, 943 म्हणजे ROOK IS FAT आणि 92105 म्हणजे KNIGHT IS SMART AND CLEVER तर QUEEN साठी कोणता संकेतांक वापरला आहे ?

5 / 100

जर सिताफळाला रामफळ म्हटले, रामफळाला हनुमानफळ म्हटले, हनुमानफळाला सफरचंद म्हटले, सफरचंदाला आंबा म्हटले, आंब्याला फणस म्हटले, फणसाला पेरू म्हटले व पेरूला चिकू म्हटले तर फक्त एकाच बी असणारे फळ कोणते ?

6 / 100

mp_pm_apmp_pm_ap

7 / 100

बंडा उत्तरपूर्व दिशेला तोंड करून उभा आहे. तो $45^{\circ}$ डावीकडे वळतो, नंतर $135^{\circ}$ उजवीकडे वळतो. पुन्हा तो $180^{\circ}$ वळतो, त्यानंतर तो $90^{\circ}$ उजवीकडे वळतो शेवटी तो डावीकडे $45^{\circ}$ वळतो, तर तो आता कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे ?

8 / 100

TABLE: SZAKD :: ?: VZSDQ

9 / 100

P हा A चा भाऊ आहे; पण A हा P चा भाऊ नाही. Q ही A ची आई आहे. P चे वडील R असून S हे A चे काका आहेत. L ही S यांची मुलगी असून T हा तिचा भाऊ आहे. तर P व T नाते सांगा ?

10 / 100

भिंतीवरील एका घड्याळात 6 ठोके पडण्यासाठी 30 सेकंद लागतात तर 12 ठोके पडण्यासाठी किती सेकंद लागतील ? 

11 / 100

आलोक, बंसी व चंदू हे 3 मित्र एका वर्तुळाकार स्टेडियमच्या कडेने एकाच ठिकाणाहून धावायला सुरवात करतात आणि अनुक्रमे 24, 36 आणि 30 सेकंदात 1 फेरी पूर्ण करतात तर ते तिथे किती वेळा नंतर मूळ ठिकाणी येतील ?

12 / 100

एका चौरसाच्या प्रत्येक बाजूच्या लांबीत 20 % वाढ केल्यास त्याच्या क्षेत्रफळात किती टक्के वाढ होईल ?

13 / 100

सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11.00 वाजता बरोबर लावलेले घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11.00 वाजता कोणती वेळ दाखवेल ?

14 / 100

एका सैन्याचे जनरल 36562 सैनिकांमधून एक चौरसाकार व्यूहरचना बनवू इच्छितात, व्यूहाची रचना केल्यावर काही सैनिक उरतात, तर उरलेल्या सैनिकांची संख्या किती ?

15 / 100

एक व्यापारी एका वस्तूवर खरेदी किमती पेक्षा 40% जास्त किमतीचे लेबल चिकटवतो व त्यावर 15 % सूट देतो, तर तो किती टक्के नफा कमावतो ?

16 / 100

इंग्रजी वर्णमालेतील B या अक्षरापासून सुरवात करून जर प्रत्येक एक आड एक वर्ण दुसऱ्या लिपीत लिहिला व उर्वरित सर्व वर्ण पहिल्या लिपीत लिहिले, तर वर्षातील पहिला महिना कसा लिहिला जाईल ?

17 / 100

रामा शिंपी एका व्यक्तीचा नवीन शर्ट शिवणार आहे. त्यासाठी त्याला काही रुंदीचे कापड वापरावे लागणार आहे. परंतु त्या कापडाची योग्य रुंदी 32 इंच आहे की 36 इंच आहे हे तो विसरून गेला आहे. तुम्ही त्याला मदत करू शकता का, की जेणे करून दोन्ही अवस्थेत त्या कापडाचा वापर करता येईल ? त्याने किती कापड विकत घ्यायला हवे ?

18 / 100

6, 8, 7, 3, 5, 4, 2, 1 या संख्या मालिकेतील मूळ संख्यांची एकूण बेरीज संयुक्त संख्यांच्या एकूण बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे.

19 / 100

दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा व त्याखालील विचारलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर द्या. बिंदू A हा बिंदू B च्या पश्चिमेला 8 मीटर वर आहे. बिंदू C हा बिंदू B च्या दक्षिणेला 4 मीटर वर आहे. बिंदू D हा बिंदू C च्या पूर्वेला 4 मीटर वर आहे. बिंदू E हा बिंदू D च्या उत्तरेला 7 मीटर वर आहे. बिंदू F हा बिंदू E च्या पश्चिमेला 8 मीटर वर आहे. बिंदू G हा बिंदू F च्या दक्षिणेला 3 मीटर वर आहे. तर बिंदू F हा A पासून किती अंतरावर आहे ?

20 / 100

र ग न द म ह ग न द ग ह न ग न नगरगन मह मन द ग न म - या अक्षर समूहात 'ग' नंतर लगेच 'न' येतो परंतु 'ग' पूर्वी लगेच 'र' येत नाही असे किती वेळा आले आहे ?

21 / 100

6, 15, 35, 77, 143, ?

22 / 100

विसंगत शब्द ओळखा

23 / 100

विसंगत शब्द ओळखा

24 / 100

AB, DE, GH, JK, ?

25 / 100

2, 6, 12, 20, 30, ?

26 / 100

प्रति गुंठा 1.5 टन या हिशोबाने एक हेक्टर क्षेत्रात उसाचे किती उत्पादन निघेल ?

27 / 100

26 च्या पुढची 15 वी विषम संख्या कोणती ?

28 / 100

$1947*1950$ या संख्येत * च्या जागी कोणता अंक घेतल्यास त्या संख्येला 11 ने निशेष भाग जाईल ?

29 / 100

4 बूट आणि 6 चपलांची किंमत 51,365 रुपये आहे. तर 12 बूट आणि 18 चपलांची किंमत किती असेल ?

30 / 100

एका व्यक्तीने एका दुकानदाराकडून 200 रुपयांचे सामान खरेदी केले आणि दुकानदाराला 2000 रुपयांची नोट दिली. दुकानदाराने त्याचेजवळ सुटे पैसे नसल्याने शेजारच्या दुकानदाराकडून 2000 रुपये सुट्टे आणले त्यातील 200 रुपये घेऊन उर्वरीत 1800 रुपये त्या व्यक्तीला दिले. थोड्या वेळाने शेजारच्या दुकानदाराने 2000 रुपयांची नोट नकली आहे म्हणून परत आणून दिली व त्याच्या जवळून 2000 रुपये घेऊन गेला तर त्या दुकानदाराला एकूण किती रुपयांचे नुकसान सहन करावे लागले ?

31 / 100

$-84 \times 29 + 365 = ?$

32 / 100

$3889 + 12.952 - ? [cite_start]= 3854.002$

33 / 100

समजा एका प्रतलामध्ये एक रेषा आणि एक वर्तुळ आहे तर ती रेषा त्या वर्तुळास जास्तीत जास्त किती बिंदूंमध्ये छेदू शकते ?

34 / 100

84 आणि 48 यांचा महत्तम साधारण विभाजक हा खालीलपैकी कोणत्या संख्येचे घनमूळ आहे ?

35 / 100

रमेशने 21000 रुपये गुंतवणूक करुन एक व्यवसाय सुरु केला काही कालावधीनंतर सुरेश 36000 रुपये गुंतवून रमेशच्या व्यवसायात भागीदार झाला जर वर्षाअखेरीस त्यांनी नफा समसमान वाटून घेतला असेल तर सुरेश किती महिन्यानी रमेशच्या व्यवसायात भागीदार झाला ?

36 / 100

जेव्हा एका शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना 54 विद्यार्थ्यांच्या ओळीत उभे केले जाते तेंव्हा त्यांच्या 30 ओळी होतात जर त्यांना 45 विद्यार्थ्यांच्या ओळीत उभे केले तर अशा किती ओळी तयार होतील ?

37 / 100

जर दोन नळ अनुक्रमे 20 व 30 मिनिटांत पाण्याची टाकी स्वतंत्रपणे भरतात तर दोन्ही नळ एकत्रितपणे किती वेळात पाण्याची टाकी भरतील ?

38 / 100

200 ते 299 या वर्गाची खरी वरची वर्ग मर्यादा लिहा ?

39 / 100

56 डेकामिटर + 7 मीटर + 43 डेकामिटर + 3 मिटर = ?

40 / 100

एक बोट प्रवाहाच्या दिशेने 17 कि.मी./ तास या वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 11 किमी/तास या वेगाने जाते तर तिचा संत पाण्यातील वेग व प्रवाहाचा वेग काढा ?

41 / 100

मुलाच्या वयाची दुप्पट त्याच्या वडीलांच्या वयात मिळवली तर त्यांच्या वयांची बेरीज 70 वर्षे होते आणि वडीलांच्या वयाची दुप्पट त्यांच्या मुलाच्या वयात मिळवली तर त्यांच्या वयाची बेरीज 95 वर्षे होते तर वडीलांचे व मुलाचे आजचे वय काय ?

42 / 100

एका निवडणुकीत दोन उमेदवार आहेत त्यापैकी एका उमेदवाराला एकूण मतांच्या 71% मते मिळाली आणि तो 756 मतांनी जिंकला, तर एकूण मतांची संख्या काय ?

43 / 100

एका चाकाचा व्यास 1.26 मीटर आहे. 500 फेरे पूर्ण होईपर्यंत ते चाक किती अंतर कापेल ?

44 / 100

बरोबर पर्याय ओळखा. एका घनाकृतीला

45 / 100

एका दलालाने 44 लाख रुपये किमतीच्या एका जमिनीचा व्यवहार केला त्यासाठी त्याने 2% कमीशन घेतले तर त्याला या व्यवहारात एकूण किती कमीशन मिळाले ?

46 / 100

5, 25 व x या परंपरित प्रमाणीत संख्या आहेत, तर x = ?

47 / 100

$(98)^{45} \times (98)^{-35} = ?$

48 / 100

मुंबई ते अमरावती हे 750 कि.मी. अंतर आहे. एकाचवेळी सकाळी 6 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 55 कि.मी. व ताशी 70 कि.मी. असल्यास दोन्ही गाड्या एकमेकीस किती वाजता भेटतील ?

49 / 100

खालीलपैकी कोणत्या त्रिकोणाच्या बाजू असू शकत नाहीत ?

50 / 100

पिंकी पूर्वेच्या दिशेने 600 मीटर अंतर कापते. त्यानंतर डावीकडे वळून 500 मीटर जाते. नंतर ती डावीकडे वळते आणि 600 मीटर चालते. ती पुन्हा डावीकडे वळते आणि 500 मीटर अंतर कापून थांबते. सुरवातीच्या स्थानापासून ती आता किती मीटर अंतरावर आहे ?

51 / 100

मराठी भाषेत मुळ सर्वनामे किती आहेत ?

52 / 100

"तो गातो" या वाक्यात --- नाही.

53 / 100

खालीलपैकी निश्चीतपणे पुल्लिंगी असणारा शब्द ओळखा ?

54 / 100

खालीलपैकी घर्षक व्यंजन कोणते ?

55 / 100

"गाय" या शब्दाचे सामान्यरुप खालीलपैकी कोणता प्रत्यय लागून होते ?

56 / 100

"गोडवा" या शब्दाचा प्रकार सांगा ?

57 / 100

"गैरसमज" या शब्दास खालीलपैकी कोणत्या भाषेतील उपसर्ग लावला आहे ?

58 / 100

खालीलपैकी कोणते उदाहरण वैकल्पिक द्वंद्व समासाचे नव्हे ?

59 / 100

विधेयांगाची खालीलपैकी कौनती व्याख्या बरोबर आहे ?

60 / 100

"हाय हाय" हा कोणत्या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार आहे ?

61 / 100

पुढीलपैकी अव्ययसाधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते ?

62 / 100

मूर्धन्य वर्गाचा गट ओळखा ?

63 / 100

'गणेश' योग्य संधी विग्रह ओळखा ?

64 / 100

मराठीत एकूण किती अर्धस्वर आहेत ?

65 / 100

सामान्यरुप नसलेला गट ओळखा.

66 / 100

खालीलपैकी उपसर्गघटीत नसलेला शब्द कोणता ?

67 / 100

त्यांनी धान्याची पोती गाडीत चढवली (अधोरेखीत शब्दाचे लिंग ओळखा)

68 / 100

गटात न बसणारा पर्याय ओळखा ?

69 / 100

"गणपत वाणी विडी पिताना, चावायचा नुसतीच काडी, म्हणायचा अन मनाशीच की, हया जागेवर बांधिन माडी" या काव्यरचनेतील अलंकार ओळखा ?

70 / 100

वि.स. खांडेकर यांना कोणत्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ?

71 / 100

ज्या चरणात अक्षरांची संख्या 12 असते, असे वृत्त कोणते ?

72 / 100

संयुक्त क्रियापद म्हणजे ?

73 / 100

"अहमहमिका चालणे" या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा

74 / 100

नामाचे कार्य करणाऱ्या गौण वाक्याला काय म्हणतात ?

75 / 100

'मळ्यात पिके काढणीस आली होती' या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सामान्यरुप ओळखा ?

76 / 100

फिफा वर्ल्ड कप 2026 कोणत्या देशात आयोजित होणार आहे ?

77 / 100

होर्मुझची सामुद्रधुनी संदर्भात कोणते विधान खरे आहे ?

78 / 100

बिहारचे सद्याचे मुख्यमंत्री संदर्भात काय खरे आहे ?

79 / 100

सद्यस्थितीत एप्रिल 2026 मध्ये भारतावर अमेरिकेने किती टक्के टॅरिफ लावलेला आहे ?

80 / 100

भारतीय संसदेत मांडलेले Delimitation Bill 2026 कशासंदर्भात आहे ?

81 / 100

भारताची सद्याची जनगणना पहिला टप्पा कधी पासून सुरु करण्यात आला ?

82 / 100

भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे 53 वे सरन्यायाधीश कोण आहेत ?

83 / 100

भारतीय निवडणूक आयोगाच्या संदर्भाने SIR म्हणजे काय ?

84 / 100

लेबनॉन हा देश कोणत्या खंडात मोडतो ?

85 / 100

"BIG BASH LEAGUE" कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

86 / 100

अमेरिकेने नुकतीच पार पाडलेली चंद्रमोहीम कोणती ?

87 / 100

एलपीजी (LPG) म्हणजे काय ?

88 / 100

भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 साली कोणता कप जिंकला ?

89 / 100

महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गाची लांबी किती आहे ?

90 / 100

क्वॉड संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

91 / 100

महाराष्ट्राचे सद्याचे राज्यपाल कोण आहेत ?

92 / 100

सद्याचे मुंबई महापालिकेचे आयुक्त कोण आहेत ?

93 / 100

"FOUR STARS OF DESTINY" या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत ?

94 / 100

मुख्यमंत्री महिला सन्मान योजना कोणत्या सरकारने सुरू केली आहे ?

95 / 100

पहलगाम आतंकवादी हल्ला कधी झाला ?

96 / 100

भारताचे सध्याचे परराष्ट्र सचिव कोण आहेत ?

97 / 100

G RAM G बद्दल काय खरे आहे ?

98 / 100

14C म्हणजे काय ?

99 / 100

भूमध्य समुद्र किती खंडातील देशांना स्पर्श करतो ?

100 / 100

अयोध्या हे शहर उत्तरप्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?

Your score is


  • SRPF गट नं. 16 कोल्हापूर पेपर टेस्ट 2026 | Free Mock Test | SRPF Bharti Practice Paper


  • SRPF गट नं. 19 कुसळगाव पेपर टेस्ट 2026 | Free Mock Test | SRPF Bharti Practice Paper


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page