परभणी चालक पोलीस पेपर टेस्ट 2026 | Free Mock Test | Driver Police Bharti

परभणी जिल्हा चालक पोलीस पेपर टेस्ट २०२६

📝 चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट – परभणी जिल्हा २०२६

चालक पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही विशेष संभाव्य पेपर टेस्ट तयार करण्यात आली आहे. परभणी जिल्हा येथील २०२६ च्या भरती परीक्षेचा विचार करून, नवीन परीक्षापद्धतीनुसार हा सराव पेपर तयार करण्यात आला आहे. चालक चिन्हे (Traffic Signs), वाहन नियम आणि रस्ते सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर आधारित हा पेपर तुम्हाला प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव देईल.

मागील प्रश्नपत्रिका, बदललेला पॅटर्न आणि संभाव्य प्रश्नांचा सखोल अभ्यास करून ही टेस्ट तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे तुमची तयारी अधिक प्रभावी होईल.

✨ या संभाव्य पेपरची वैशिष्ट्ये:

📌 परीक्षेत विचारले जाऊ शकणारे संभाव्य प्रश्न

📌 चालक चिन्हे (Traffic Signs) वर विशेष भर

📌 वाहन नियम व रस्ते सुरक्षा विषयक महत्त्वाचे प्रश्न

📌 नवीन पोलीस भरती पॅटर्ननुसार प्रश्नरचना

📌 वेळेचे योग्य नियोजन करण्यासाठी उपयुक्त सराव

📌 आत्मविश्वास वाढवणारा पूर्ण पेपर अनुभव

🚔 ही संभाव्य टेस्ट का सोडवावी?

चालक पोलीस भरती परीक्षेत यश मिळवण्यासाठी केवळ अभ्यास पुरेसा नसून नियमित सरावही तितकाच गरजेचा आहे. ही संभाव्य पेपर टेस्ट सोडवून तुम्ही तुमची तयारी तपासू शकता, चुका सुधारू शकता आणि अंतिम परीक्षेसाठी स्वतःला अधिक सक्षम बनवू शकता.

💯 दररोज सराव करा, अपडेट राहा आणि परभणी जिल्हा चालक पोलीस भरती २०२६ मध्ये यश मिळवा!

1 / 100

०.५ किलोग्रॅम + ५० डेकाग्रॅम + ५००० सेंटिग्रॅम + ५००००० मिग्रॅ = .... ग्रॅम.

2 / 100

राजाभाऊ रोज ऑफीसला चालत जातात. त्यांनी त्यांचा वेग नेहमीच्या वेगाच्या ३/५ केला तर त्याच्या नेहमीच्या वेळेपेक्षा २० मिनीटे जास्त लागतात, तर त्यांना नेहमी ऑफीसला पोहचण्यास किती वेळ लागतो ?

3 / 100

१५० मीटर लांब आगगाडीला ४५० मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडायला २० सेकंद लागतात. तर गाडीचा वेग किती ?

4 / 100

एक टाकी भरण्यासाठी चार नळ आहेत. प्रत्येक नळ रिकामी टाकी भरायला ६ तास घेतो. टाकी रिकामी असतांना एकच नळ सुरु केला आणि टाकी निम्मी भरल्यावर उरलेली तीन नळ सुरु केले. तर टाकी पूर्ण भरायला एकूण किती वेळ लागेल ?

5 / 100

दोन वेगळ्या बँकेत ठेवलेल्या रु. १५०० वरील ३ वर्षाच्या सरळ व्याजात रु. ९० फरक आहे, तर सरळ व्याजाचे दरात फरक किती आहे ?

6 / 100

सुजीतने त्याची मोटार सायकल विकतांना २०% नफ्याऐवजी २५% नफा घेतला असता, तर त्याला ४,२८० रु. अधिक मिळाले असते, तर सुजीतची त्या मोटार सायकची खरेदीची किंमत रु....... होती ?

7 / 100

एका व्यापाऱ्याकडे ५० किलो डाळी आहेत. त्यातील काही तो ८% नफ्याने विकतो व बाकी सर्व १८% नफ्याने विकतो. सर्व विक्नीवर त्याला १४% नफा मिळतो. तर त्याने किती किलो डाळ १८% नफ्याने विकली ?

8 / 100

एका कंपनीने त्यांच्या ५० कामगारांसाठी एकूण रु. १०,००,००० चा बोनस जाहीर केला जेणेकरुन प्रत्येक पुरुषास रु. १८,००० व प्रत्येक स्त्रीस रु. २३,००० मिळतील तर कंपनीतील पुरुष व स्त्रियांची संख्या किती ?

9 / 100

तीन मित्र A, B आणि C मिळून रु. ४७,००० गुंतवून दुकान सुरु करतात. A ने B पेक्षा रु. ७००० जास्त गुंतवले, तर B ने C पेक्षा रु. ५००० जास्त गुंतवले. त्यांना रु. ४२३० चा फायदा झाला तर A च्या वाटयाला किती येईल ?

10 / 100

जर ७ सैनिकांच्या तुकडीला ३६ दिवसांसाठी रु. ८४०० मंजूर होतात, तर ९ सैनिकांना किती दिवसांसाठी रु. ८१०० मंजूर व्हावेत ?

11 / 100

आनंदला १८० गुण मिळाल्यामुळे तो अनुत्तीर्ण झाला. त्याला आणखी ६० गुण मिळाले असते, तर तो ४०% गुण मिळवून उत्तीर्ण झाला असता. तर परीक्षा किती गुणांची होती ?

12 / 100

५ वर्षानंतर आई व मुलगी यांचे सरासरी वय २९.५ होणार आहे. आज त्यांच्या वयांचे गुणोत्तर २:५ असल्यास मुलीचे आजचे वय किती ?

13 / 100

७ टेबले व १२ खुर्चा यांची किंमत रु. ४८२५० आहे, तर २१ टेबले आणि ३६ खुर्चा यांची किंमत किती ?

14 / 100

वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा ३ वर्षांनी जास्त आहे. दोघांच्या वयांची बेरीज ६३ असल्यास मुलाचे वय किती ?

15 / 100

जर ८³ = २ˣ तर x = ?

16 / 100

३ मी, ५ मी १० सेमी, १२ मी ९० सेमी अशी लांबी असलेले कापडाचे तीन तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी ?

17 / 100

चार विद्यार्थ्यांची उंची W, X, Y, Z अशी आहे आणि २X = W + Z, २W = X + Y, २Y = W तर त्यांच्या उंचीनुसार क्रम कसा असेल ?

18 / 100

'सेवा तीर्थ' कोणाचे कार्यालय आहे ?

19 / 100

"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी" या काव्यपंक्ती कोणाच्या आहेत ?

20 / 100

२०२५ मध्ये महिला बुध्दीबळ विश्वचषक जिंकुन इतिहास रचणारी बुध्दीबळ पट्ट कोण ?

21 / 100

भारतातील खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात चित्ता हा प्राणी सोडण्यात आला ?

22 / 100

महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत ?

23 / 100

'FIDE' कोणत्या खेळाशी संबंधीत आहे ?

24 / 100

भारताच्या रिझर्व बँकेचे गव्हर्नर कोण आहेत ?

25 / 100

AI इम्पॅक्ट समीट २०२६ कोठे आले आहे ?

26 / 100

पृथ्वीवर सर्वात जास्त असणारा वायू कोणता ?

27 / 100

चंद्राचा अभ्यास करण्यासाठी नासाने नुकतीच कोणती मोहीम सुरु केली ?

28 / 100

भारताचे राष्ट्रगान 'वंदे मातरम्' हे कोणत्या पुस्तकातून घेतले आहे ?

29 / 100

ज्योतीबा फुले यांनी लिहिलेले पुस्तक कोणते ?

30 / 100

"विक्रम ३२" हे काय आहे ?

31 / 100

महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे ?

32 / 100

भारत स्वतंत्र झाल्यानंतर कोणते परकीय सर्वात शेवटी भारतातून कोणत्या ठिकाणाहून परत गेले ?

33 / 100

भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत ?

34 / 100

सान्वीने तिच्या घरापासून सुरुवात केली आणि उत्तरेकडे ६ किमी अंतर चालत गेली, नंतर पुर्वेकडे ३ किमी, नंतर तिच्या डावीकडे ७ किमी आणि नंतर तिच्या उजवीकडे ४ किमी, नंतर दक्षिणेकडे १० किमी आणि शेवटी तिच्या उजवीकडे ३ किमी चालत गेली, तर ती तिच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे ?

35 / 100

दिलेल्या गटामधील इंग्रजी मुळाक्षरे क्रमातील गट ओळखा? DINSX, BGLQV, CHMRW

36 / 100

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? ५१, ५०, ४८, ४५, ४१, ३६, ?

37 / 100

३४३, ३२४, ३३७५, १०६४८, ६४

38 / 100

जर PARK हा शब्द ५३९४, SHIRT हा शब्द १७६९८ आणि PANDIT हा शब्द ५३२०६८ असा लिहीला जात असेल, तर NISHAR = ?

39 / 100

पुढील संख्यामधुन विसंगत संख्या शोधा. ७२०, १४४, ३६, १२, ६, ?

40 / 100

प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? B: ९ :: H: ?

41 / 100

एका सांकेतिक भाषेत R x N = ८ x ४, U x Y = ११ x १५ तर T x W = ?

42 / 100

सुचना :- जर + म्हणजे वजाबाकी, - म्हणजे गुणाकार, x म्हणजे भागाकार आणि / म्हणजे बेरीज करणे असा संकेत असेल, तर त्यानुसार पुढील पदावलीची किंमत किती येईल. ५ - ५ + ५ / ५ x ५ = ?

43 / 100

योगी शीर्षासन करीत असतांना त्यांचे तोंड पश्चिमेकडे आहे. तर त्यांच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे ?

44 / 100

एका दोऱ्याला अनुक्रमे लाल, निळा, पांढरा, हिरवा, पिवळा व जांभळा रंग असलेल्या २३४ पताका लावल्या आहेत, तर सुरवातीपासून १६६ व्या क्रमांकावर असणाऱ्या पताकाचा रंग कोणता ?

45 / 100

लोकमान्य टिळक पुण्यतिथी सोमवारी आली असेल, तर त्याच वर्षातील बालदिन कोणत्या दिवशी आला असेल ?

46 / 100

५ मीटर खोल विहिरीच्या तळापासून एक गोगलगाय विहिरीची भिंत चढण्यास सुरुवात करते. एका दिवसात ती १० मीटर वर चढते व ५ मीटर खाली घसरते. तर विहिरीच्या बाहेर येण्यास तिला किती दिवस लागतील ?

47 / 100

का परिक्षेत अचुक उत्तराला २ गुण मिळतात, परंतु प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे एक गुण कमी केला जातो. लताने १०० प्रश्नापैकी ८० प्रश्न सोडवले तेंव्हा तिला १४२ गुण मिळाले तर तीने किती प्रश्न बरोबर सोडवले ?

48 / 100

विभक्ती प्रत्यय लागलेल्या नामांच्या आकारान्त विशेषणांचे सामान्यरूप ...... होते.

49 / 100

कर्मणी प्रयोगाची खूण ओळखा. (१) कर्म नेहमीच प्रथमान्त (अप्रत्ययी व्दितीयेत) असते (२) कर्ता नेहमीच प्रथमान्त असतो. (३) या प्रयोगातील क्रियापद सकर्मक किंवा अकर्मक हवे.

50 / 100

ज्या समासात एकत्र येणाऱ्या दोन पदांपैकी पहिले पद प्रधान असते व त्या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो, तेंव्हा ...... समास होतो.

51 / 100

खालील अधोरेखीत वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला.

52 / 100

पुढील कवितेचा अलंकार प्रकार ओळखा. रजतनील, ताम्रनील स्थिर पल जल पल सलील. हिरव्या तटि नावांचा कृष्ण मेळ खेळे

53 / 100

आता विश्वात्मकें देवें। येणें वाग्यज्ञं तोषावें। तोषोनि मज द्यावें। पसायदान हे ।। या वाक्यातील रस ओळखा.

54 / 100

उच्चाराच्या दृष्टीने प्, फ् हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात ?

55 / 100

पुढे दिलेल्या किती शब्दांची सुरुवात 'तालव्य' वर्णाने झाली आहे? चक्कर, जाळी, चक्र, चाळीस, चलन, चंद्र, जरायुज, जलमार्ग, झरोका, झालर, चकवा.

56 / 100

पुढीलपैकी सामान्यनाम असणारा पर्याय निवडा.

57 / 100

खाली दिलेल्या कोणत्या आडनावांचे सामान्यरुप होताना बदलत नाहीत ?

58 / 100

'पैसे असो वा नसो तुला धाडस करावंच लागेल.' या वाक्यात आलेल्या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

59 / 100

हल्ली सज्जन मित्र मिळणे कठीण झाले आहे. या वाक्यात आलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

60 / 100

वडिलांनी माझ्यासाठी नवीन वही आणली. (अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा)

61 / 100

आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपणनाव काय ?

62 / 100

फ्रान्सच्या किनाऱ्यावर मार्सेल्स बंदराजवळ सावरकरांनी बोटीतून केलेल्या साहसी पलायनाने सर्वत्र खळबळ माजली. त्या बोटीचे नाव काय होते ?

63 / 100

खालीलपैकी कोण तीनही गोलमेज परिषदांना उपस्थित होते ?

64 / 100

भागलपूर व राजमहल परिसरातील. या नावाने ओळखल्या जाणाऱ्या टापूत 'संथाळांचा उठाव' घडून आला.

65 / 100

अनेक शतके काळाच्या पडद्याआड लपलेल्या फर्दापूर येथील अजिंठ्याच्या लेण्यांचा शोध एप्रिल, १८१९ मध्ये- या इंग्रज अधिकाऱ्याने लावला.

66 / 100

भंडारदरा गांवाजवळ बांधण्यात आलेला 'विल्सन बंधारा' किंवा 'भंडारदरा धरण' या दोन टेकड्यांदरम्यान पसरलेले आहे.

67 / 100


महाराष्ट्रातील .... या जिल्ह्यांना 'तलावांचा प्रदेश' असे म्हणतात.

68 / 100

भारतातून वाहनारी 'ब्रम्हपुत्रा' नदी म्हणजे मूळ या नदीचाच पुढे विस्तार पावलेला प्रवाह होय.

69 / 100

........ अन्वये भारताच्या घटना समितीची रचना केली गेली.

70 / 100

'लेप्रोस्कोपी' ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?

71 / 100

गनमेटल कोणते धातू मिळून बनलेले असते ?

72 / 100

लोखंडी नळ गंजू नये यासाठी त्यावर जस्ताचा (झिंक) थर चढवितात, या प्रक्रियेस - म्हणतात.

73 / 100

गंगाखेड रेल्वे स्टेशन हे रेल्वेच्या कोणत्या विभागाच्या अंतर्गत येते ?

74 / 100

चक्राकार पायऱ्या असलेली विहीर परभणी जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

75 / 100

"जांभुळबेट" हे ठिकाण कोणत्या नदीत आहे ?

76 / 100

शासनाचे VAHAN पोर्टल खालीलपैकी कशा संदर्भात नाही ?

77 / 100

मोटार वाहन अधिनियम, १९८८ कलम २ (८) अन्वये व्यापारी या व्याख्येत खालीलपैकी कोणत्या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तीचा समावेश होत नाही ?

78 / 100

कोणतेही मान्यता असलेले प्राधिकरण, ठेकेदार, सल्लागार इत्यादीवर रस्त्याच्या आराखडा, बांधणी आणि व्यवस्थापनाच्या दर्जाचे पालन करण्याची जवाबदारी पार न पाडल्यास मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कोणत्या कलमान्वये करार केला जातो ?

79 / 100

e-DAR हे शासनाचे पोर्टल कशासाठी विकसीत करण्यात आलेले आहे ?

80 / 100

शासनाचे 'सारथी पोर्टल' कशासाठी आहे ?

81 / 100

EV (इलेक्ट्रीक व्हेईकल) प्रोत्साहन कोणत्या योजनेत येते ?

82 / 100

मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कोणत्या कलमान्वये पोलीस अधिकाऱ्याने मागणी केली असता मोटार वाहनाच्या चालकाने आपले लायसन सादर केले पाहिजे ?

83 / 100

मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कोणत्या कलमान्वये परिवहन वाहनांमध्ये आढळून आल्या असतील अशा वस्तु निकालात काढण्याची तरतुद आहे ?

84 / 100

मोटार वाहन अधिनियम, १९८८ अन्वये या चिन्हाचा योग्य अर्थ कोणता ?

85 / 100

PM-RAHAT ही शासकीय योजना कशा संदर्भात आहे ?

86 / 100

मोटार वाहन अधिनियम, १९८८ मध्ये तिसऱ्या व्यक्तीच्या धोक्याच्या बाबतीत वाहनाचा विमा हे कोणत्या प्रकरणात समाविष्ट केले आहे ?

87 / 100

मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम १३४ अन्वये कोणते विधान असत्य आहे ?

88 / 100

मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कोणत्या कलमान्वये चांगल्या परोपकारी व्यक्तीला संरक्षण देण्याची तरतुद आहे ?

89 / 100

मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम ७६ कशाशी संबंधीत आहे ?

90 / 100

मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ३१ अन्वये वाहकाचे लायसन्स मिळण्यासाठी किमान किती वयोमर्यादा आवश्यक असल्याचे नमुद केले आहे ?

91 / 100

मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कोणत्या कलमान्वये अपराध सिध्दीनंतर चालकाचे लायसन निलंबीत किंवा रद्द करता येते ?

92 / 100

शिकाऊ व्यक्तीचे लायसन्सच्या परिणामकारिकतेची व्याप्ती मोटार वाहन कायदा, १९८८ कलम १३ अन्वये कुठपर्यंत आहे ?

93 / 100

मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील 'प्रकरण आठ' हे कशाशी संबंधीत आहे ?

94 / 100

तांबडा दिवा टाळून जाणे, चालवितांना संदेशाचे साधन वापरणे, थांबा सिग्नल असतांना त्याचा भंग करणे हा मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कोणत्या कलमान्वये अपराध आहे ?

95 / 100

मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कोणत्या कलमान्वये 'तातडीच्या वाहनांना मार्ग देण्यात कसूर करणे' हा अपराध आहे ?

96 / 100

मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम २०२ अन्वये वर्दी घातलेल्या पोलीस अधिकाऱ्याला कोणता अधिकार देण्यात आला आहे ?

97 / 100

या चिन्हाचा योग्य अर्थ कोणता ?

98 / 100

खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता ?

99 / 100

मोटार वाहन अधिनियम, १९८८ नुसार कोणती व्याख्या बरोबर आहे ?

100 / 100

खालीलपैकी ई-कार्ट आणि ई-रिक्षा बाबत कोणते विधान असत्य आहे.

Your score is

Q1: परभणी चालक पोलीस मॉक टेस्ट कशी उपयोगी आहे?

Ans: ही टेस्ट नवीन परीक्षा पॅटर्ननुसार असून सरावासाठी उपयुक्त आहे.

Q2: ही टेस्ट फ्री आहे का?

Ans: हो, ही पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे.

Q3: कोणासाठी आहे ही टेस्ट?

Ans: चालक पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी.


  • पुणे ग्रामीण चालक पोलीस पेपर टेस्ट २०२६ | Pune Rural Driver Police Paper Test 2026


  • लातूर जिल्हा चालक पोलीस पेपर टेस्ट २०२६ | Latur Jilha Driver Police Paper Test 2026 | Free Mock Test


  • धारशिव जिल्हा चालक पोलीस पेपर टेस्ट २०२६ | Dharashiv Driver Police Mock Test 2026 (Free)


  • सिंधुदुर्ग चालक पोलीस पेपर टेस्ट 2026 | Free Mock Test | Driver Police Bharti


  • परभणी चालक पोलीस पेपर टेस्ट 2026 | Free Mock Test | Driver Police Bharti


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page