🔥 Latest Updates

यवतमाळ जिल्हा पोलीस भरती 15 मार्च 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Yavatmal District Police Bharti Mock Test 2026

यवतमाळ जिल्हा पोलीस भरती १५ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका टेस्ट | Yavatmal District Police Bharti Mock Test 2026

🎯 वर्दीचं स्वप्न, पांढऱ्या सोन्याच्या जिल्ह्यातून पूर्ण होणार!

नमस्कार माझ्या यवतमाळच्या भावी पोलीस बांधवांनो,

“पांढऱ्या सोन्याचा जिल्हा” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या यवतमाळच्या मातीत कष्ट करण्याची आणि संकटांशी भिडण्याची जिद्द जन्मजात असते. इथल्या प्रत्येक तरुणाच्या डोळ्यांत एक स्वप्न असतं—अंगावर खाकी वर्दी चढवून समाजाची सेवा करण्याचं! मित्रांनो, १५ मार्चची ही तारीख तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरू शकते.

मैदानावर तुम्ही दिवस-रात्र घाम गाळला आहेच, पण लक्षात ठेवा, भरती प्रक्रियेत ‘लेखी परीक्षा’ हा असा टप्पा आहे जो खऱ्या अर्थाने मेरिट ठरवतो. बुद्धिमत्ता चाचणीतील छोटेसे बदल किंवा गणितातील साधी चूक तुम्हाला वर्दीपासून दूर नेऊ शकते. म्हणूनच, GS eStudy Point ने यवतमाळ पोलीस भरतीचा खास पॅटर्न लक्षात घेऊन हा सराव संच तयार केला आहे.

आजच्या टेस्टचं वैशिष्ट्य:

  • तर्कशक्तीचा कस: विसंगत शब्द आणि संख्या ओळखण्याचे प्रश्न जे परीक्षेला वारंवार विचारले जातात.
  • वेळेचं नियोजन: कमीत कमी वेळेत अचूक उत्तर शोधण्याची सवय.
  • नवा दृष्टिकोन: प्रश्नांचा दर्जा असा की, तुम्ही प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव घ्याल.

स्वतःवर विश्वास ठेवा, एकाग्रतेने टेस्ट सोडवा. यशाच्या दिशेने आजचं हे महत्त्वाचं पाऊल टाका!

यवतमाळ जिल्हा पोलीस २०२६

📝 यवतमाळ जिल्हा पोलीस भरती २९ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका टेस्ट

यवतमाळ जिल्हा पोलीस भरती २९ मार्च २०२६ रोजी झालेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारित ही टेस्ट खास तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मागील प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास करून त्याच पॅटर्ननुसार प्रश्न दिले आहेत, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेची अचूक तयारी करता येईल.

पोलीस भरती परीक्षेमध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित एकूण 100 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या टेस्टमध्येही त्याच स्वरूपात प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.

🔍 या टेस्टची वैशिष्ट्ये:

✔ यवतमाळ जिल्हा पोलीस भरती २९ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका आधारित प्रश्न
✔ पूर्णपणे MCQ स्वरूपात सराव
✔ परीक्षा पॅटर्ननुसार 100 प्रश्नांचा समावेश
✔ वेळ व्यवस्थापन आणि अचूकता वाढवण्यासाठी उपयुक्त
✔ स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची टेस्ट

ही टेस्ट सोडवल्याने तुम्हाला प्रश्नांची पद्धत, अवघडपणा आणि वेळेचे नियोजन याची चांगली सवय लागेल. नियमित सराव केल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि परीक्षेत यश मिळवणे सोपे होईल.

👉 यवतमाळ जिल्हा पोलीस भरती २०२६ ची तयारी मजबूत करण्यासाठी ही टेस्ट नक्की सोडवा!

1 / 100

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते ओळखा. ABC, MNO, DEF, PQR, GHI,

2 / 100

विसंगत संख्या ओळखा. ८, २४, ४९, ८०

3 / 100

विसंगत शब्द ओळखा.

4 / 100

खालील शब्दसमूहातील विसंगत शब्द ओळखा.

5 / 100

२५ XY: ५ XY :: ३६ MN:

6 / 100

मे : जुलै :: ऑगस्ट :

7 / 100

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? (आकृती आधारित प्रश्न)

8 / 100

खालील प्रश्नात प्रश्न चिन्हाच्या जागी क्रमशः कोणती संख्या येईल ? २, ५, ८, ११,

9 / 100

खालील प्रश्नात प्रश्न चिन्हाच्या जागी क्रमशः कोणती संख्या येईल ? १, ९, २५,

10 / 100

एका सांकेतिक भाषेत GOAT हा शब्द FNZS असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत DOG हा शब्द कसा लिहिला जाईल?

11 / 100

रांगेतील रामूचा नंबर दोन्ही बाजूकडून १७ वा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?

12 / 100

१ वाजून ३० मिनिटांनी तासकाटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन असेल?

13 / 100

१ मार्च २०२५ रोजी शनिवार असेल तर १० एप्रिल २०२५ रोजी कोणता वार असेल?

14 / 100

आरोपी पोलीसांना सांगत होता, मी प्रथम दक्षिणकडे १ कि.मी. जाऊन नंतर चौकातून उजवीकडे वळालो व २ कि.मी. चालल्यानंतर पुन्हा पुढील चौकातून उजवीकडे वळून २ कि.मी. चाललो. तर आरोपी प्रथम निघालेल्या ठिकाणापासून कोणत्या दिशेकडे असेल?

15 / 100

रोहन दिलीपला म्हणाला तुझ्या वडिलांची आई व माझी आजी सख्या बहिणी आहेत. तर दिलीपची आजी रोहनच्या वडिलांची कोण?

16 / 100

तालुका, जिल्हा, राज्य. खालीलपैकी कोणती आकृती तालुका, जिल्हा, राज्याचा संबंध दर्शविते.

17 / 100

वेगळी (विजोड) संख्या ओळखा. ८१, १, ५०, २५, ४९

18 / 100

खालील प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता अंक येईल ते ओळखा. १५:२२५:: २०:

19 / 100

खालील प्रश्न चिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल ते ओळखा. C, E, G, L,

20 / 100

ठीक २ वाजता आरशात किती वाजले असतील?

21 / 100

राजू मंदिराकडे तोंड करून उभा होता. त्याच्या उजव्या बाजूला दक्षिण दिशा होती. तो तीन वेळा काटकोनात डावीकडे वळाला तर त्याच्या पाठीमागील दिशा कोणती?

22 / 100

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? १०, १५, ३०, २०, ४०, २५, ५०, ३०...

23 / 100

बागेतील एका रस्त्याच्या कडेने दुतर्फा १०-१० मीटरच्या अंतराने एकूण १०० झाडे लावली तर रस्त्याची लांबी किती?

24 / 100

एका जनावरांच्या कळपात ३५ सोडून सर्व गायी, ३० सोडून सर्व म्हशी व उर्वरित बक-या आहेत. त्या कळपात एकूण गुरे ४० असतील, तर बक-यांची संख्या किती?

25 / 100

कापूस लोकरपेक्षा महाग आहे. लोकर ज्वारीपेक्षा महाग आहे. ज्वारीपेक्षा तूर महाग आहे. तर सर्वात स्वस्त काय आहे?

26 / 100

पुढे दिलेल्या शब्दांपैकी जोडाक्षरे असलेला पर्याय ओळखा.

27 / 100

महागाईची व्याख्या काय आहे ?

28 / 100

भारतात चित्ता प्राण्याचे कुठे पुनर्वसन केले जात आहे ?

29 / 100

फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ ही पोलीस तपास कार्यपद्धती सांगणारी संहिता रद्द करून खालील पैकी कोणती संहिता लागू करण्यात आली ?

30 / 100

सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात आहे ?

31 / 100

शिवसमुद्रम हा कावेरी नदी वरील जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

32 / 100

खालील पैकी कोणत्या देशाची इराणसोबत स्थलसीमा नाही ?

33 / 100

संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद नुसार भारत देशातून अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे ?

34 / 100

भारुड हा रचना प्रकार कोणी रुढ केला ?

35 / 100

'कृष्णाकाठ' हे खालील पैकी कोणाचे आत्मचरित्र आहे ?

36 / 100

जगातील सर्वात मोठे नदीतील बेट माजुली कोणत्या नदीमध्ये व कोणत्या राज्यात आहे ?

37 / 100

खालीलपैकी कोणते बल भारताचे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल नाही ?

38 / 100

महाराष्ट्राचे राज्यफुल जारूलची (मोठा बोंडारा/ताम्हण) फुले कोणत्या रंगाची आहेत ?

39 / 100

क्रिप्टोग्राफी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे ?

40 / 100

भारताचे अंटार्क्टिकावर हे संशोधन केंद्र आहे.

41 / 100

आज (१५ मार्च) खालील पैकी कोणता दिवस आहे ?

42 / 100

UPI चा लाँग फॉर्म काय आहे ?

43 / 100

नुकत्याच पार पडलेल्या टी-२० वर्ल्ड कप टुर्नामेंट मध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूला प्लेयर ऑफ द टूर्नामेंट पुरस्कार देण्यात आला ?

44 / 100

खालीलपैकी कोणत्या शहरात पोलीस शिपायांसाठी प्रशिक्षण विद्यालय आहे ?

45 / 100

खालीलपैकी कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय नाही ?

46 / 100

महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत ?

47 / 100

ऑलिंपिक मध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे ?

48 / 100

खालीलपैकी कोणता टेनिस ग्रँड स्लॅम नाही ?

49 / 100

कोणत्या देशाशी भारत देशाची स्थलसीमा सर्वाधिक लांबीची आहे ?

50 / 100

भारतीय संविधान हे संविधान सभेद्वारे कधी स्वीकारले गेले ?

51 / 100

भारत सरकार द्वारे देण्यात येणारा सर्वोच्च शौर्य पुरस्कार म्हणजे अशोक चक्र या वर्षी कोणाला देण्यात आला ?

52 / 100

६ एकसारखे चॉकलेट्स ३ विद्यार्थ्यांमध्ये किती प्रकारे वाटता येतील की प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एक चॉकलेट मिळेल ?

53 / 100

$\sqrt{0.0361} =$

54 / 100

राम ने ७२०० रुपये ने खरेदी केलेली सायकल ८४९६ रुपये ला विकली तर शेकडा नफा किती ?

55 / 100

$(0.2 \times 0.2 \times 0.2 + 0.03 \times 0.03 \times 0.03) / (0.04 \times 0.04 \times 0.04 + 0.006 \times 0.006 \times 0.006) =$

56 / 100

जर P म्हणजे X, Q म्हणजे $\div$, R म्हणजे +, S म्हणजे -, तर ३२ Q ८ R १५ S ३ P ५ = ?

57 / 100

जर १६ सायकलींची किंमत २९,२०० रू आहे तर अशा ७ सायकलींची किंमत किती ?

58 / 100

तीन पुरुषांच्या वयांचे गुणोत्तर २:३:४ आहे. त्यांची वयांची एकूण बेरीज ६३ वर्ष आहे. सर्वात लहान व्यक्तीचे वय किती ?

59 / 100

A आणि B यांनी अनुक्रमे १२ आणि १५ सेकंदात १०० मीटर अंतर पूर्ण केले, जर दोघांनी एकत्र शर्यत केली तर A ने अंतिम बिंदू गाठल्यावर B, A पेक्षा किती मागे असेल ?

60 / 100

जर x, y च्या ४०% आहे तर y, x च्या किती टक्के होईल ?

61 / 100

$x^2 - 5x + 6 = 0$ तर x चे मूल्य खालील पैकी कोणते ?

62 / 100

रिना, रीमा, मिरा यांनी एक कार भाड्याने घेतली आणि ती त्यांनी अनुक्रमे १४ तास, १६ तास आणि २२ तास वापरली. जर रीमाच्या कारचे भाडे ६४० रु आले असेल, तर एकूण भाडे किती रुपये होईल ?

63 / 100

एका १२ मीटर x ८ मीटर आकारमानाच्या आयताकृती मैदानाच्या एका कोपऱ्याच्या टोकात, एक गाय, ८ मीटर लांब दोरीने बांधलेली आहे. तर या आयताकृती मैदानाच्या किती टक्के क्षेत्रफळात ही गाय चारा खाऊ शकते ?

64 / 100

$\sqrt[4]{256} + \sqrt[3]{64} + \sqrt{16} =$

65 / 100

एका त्रिकोणाची एक बाजू ४ सेंमी, दुसरी बाजू ५ सेंमी असेल आणि सर्वात मोठा कोन ९० अंश असेल. तर तिसरी बाजू किती सेंमी असेल ?

66 / 100

एक १८० मीटर लांबीचा पूल ७२ किमी प्रतितास वेगाने जाणारी ८० मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदात पार करेल ?

67 / 100

४x - ३y = ३, ३x - ४y = ४ तर x = ?

68 / 100

$\sqrt{2\sqrt{2\sqrt{2\sqrt{2\sqrt{2\sqrt{2\sqrt{2}}}}}}} =$

69 / 100

एक रकमेच्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याज मधील फरक (५% दराने, दोन वर्षासाठी) २५० रुपये आहे. तर ती रक्कम किती ?

70 / 100

P या नळाने १ टाकी १२ तासात भरते आणि Q या नळाने तीच टाकी २० तासात भरते. जर दोन नळ एकत्र सुरु केले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल ?

71 / 100

$0.25 \times 2.5 \times 2.4 =$

72 / 100

३६ आणि ४८ यांचा ल.सा.वि (LCM) व म.सा.वि (HCF) किती ?

73 / 100

पुढीलपैकी लहान मोठा अपूर्णांक कोणता ?

१) २१/२७ २) १२/२५ ३) ३५/३७ ४) २७/३१

74 / 100

$\sqrt{610+\sqrt{222+\sqrt{1+\sqrt{64}}}} =$

75 / 100

१५ मजूर रोज ८ तास काम करून एक काम १२ दिवसात पूर्ण करतात, तेच काम २० मजूर रोज ६ तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील ?

76 / 100

दोन फासे एकत्र फेकले तर त्यांची एकूण बेरीज ७ येण्याची शक्यता काय आहे ?

77 / 100

कापूस लोकरपेक्षा महाग आहे. लोकर ज्वारीपेक्षा महाग आहे. ज्वारीपेक्षा तूर महाग आहे. तर सर्वात स्वस्त काय आहे?

78 / 100

क्षणं चित्तं क्षणं वित्तं याचा अर्थ काय?

79 / 100

र्‍हस्व दीर्घाच्या नियमानुसार पुढीलपैकी योग्य शब्द ओळखा.

१) मी २) तू ३) मि ४) ति

80 / 100

'संबोधन' दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापरतात?

81 / 100

'गण्या म्हणजे शुद्ध नंदीबैल' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

82 / 100

विसंगत जोडी ओळखा.

83 / 100

'रोम एका दिवसात बांधले गेले नाही' या म्हणीचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे?

84 / 100

जसे आंब्यांच्या झाडांची राई, फुलझाडांचा - ताटवा तसे मडक्यांची -

85 / 100

'कर्दनकाळ' अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा.

86 / 100

वाक्प्रचाराचा विसंगत पर्याय निवडा.

87 / 100

समान अर्थाच्या म्हणींचा योग्य पर्याय निवडा.

(अ) वळचणीचे पाणी ओढयाला जात नाही

(ब) तूप खाल्ले की रुप येत नाही

(क) जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही

(ड) एका आधणाने तुरी शिजत नाहीत.

88 / 100

'अभ्युदय' या शब्दाची संधी सोडवा.

89 / 100

'आमचे आरोग्य चांगले राहावे यास्तव आम्ही योग करतो.' हे कोणत्या प्रकारचे मिश्र वाक्य आहे?

90 / 100

'रामाने दशमुखास ठार मारले' यातील अधोरेखित शब्दाचा समास ओळखा.

91 / 100

'पाखरे घरटी बांधतात' या विधानातील क्रियापदावरून प्रयोग ओळखा.

92 / 100

यास्तव, तस्मात, अतएव या अभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

93 / 100

'तुम्ही पुढे व्हा, मी आलोच' या विधानातील काळ ओळखा.

94 / 100

अ) झाडांचा रंग हिरवा आहे, तो मला फार आवडतो.

ब) कोकीळा गोड गाते, ते मला आवडते.

वरील वाक्यांतील अधोरेखित सर्वनामे अनुक्रमे कोणासंबंधी आली आहेत.

95 / 100

'मागुन आला नि तिखट झाला' हे विधान कोणत्या विशेषण प्रकारातील आहे?

96 / 100

दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा 'भोजन शाळेत माणसे जेवू लागली'

97 / 100

'श्रीकृष्णाने सांदिपनींना गुरुदक्षिणा दिली' या वाक्यातील सांदिपनींना हा शब्द व्याकरणीकदृष्ट्या काय सुचवितो?

98 / 100

मराठी भाषेत 'क्ष' व 'ज्ञ' ही ..... आहेत.

99 / 100

खालील पंक्तीतील अलंकार ओळखा. " मऊ मेणाहूनि आम्ही विष्णूदास, कठीण वज्रास भेदू ऐसे "

100 / 100

'नववधू प्रिया मी बावरते.' या उदाहरणाचे वृत्त ओळखा.

Your score is

The average score is 2%

📝 स्पष्टीकरण (Explanations)

Q1. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते ओळखा? ABC, MNO, DEF, PQR, GHI, ______

(A) XYZ

(B) STU

(C) JKL

(D) MNO

✅ उत्तर: (B) STU

Q2. विसंगत संख्या ओळखा: ८, २४, ४९, ८०

(A) ८

(B) २४

(C) ४९

(D) ८०

✅ उत्तर: (C) ४९

Q3. विसंगत शब्द ओळखा:

(A) ऑटोरिक्शा

(B) बस

(C) मोटार सायकल

(D) जहाज

✅ उत्तर: (D) जहाज

Q4. खालील शब्दसमूहातील विसंगत शब्द ओळखा:

(A) CAT

(B) MAT

(C) RAT

(D) BAT

✅ उत्तर: (D) BAT

Q5. २५ XY : ५ XY :: ३६ MN : ?

(A) ४ MN

(B) ६ MN

(C) ८ MN

(D) ९ MN

✅ उत्तर: (B) ६ MN


💡 प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण (Explanations)

  • Q1 स्पष्टीकरण: येथे दोन मालिका एकत्रित केल्या आहेत. पहिली (ABC, DEF, GHI) आणि दुसरी (MNO, PQR, …). दुसऱ्या मालिकेत प्रत्येक गटात दोन अक्षरे सोडून पुढचा गट येत आहे. ‘PQR’ नंतर ‘STU’ हा गट येतो.
  • Q2 स्पष्टीकरण: ८, २४ आणि ८० या संख्यांमध्ये कोणतीही संख्या पूर्ण वर्ग नाही. मात्र, ४९ ही संख्या ७ चा पूर्ण ‘वर्ग’ आहे ($7^2 = 49$), म्हणून ती विसंगत आहे.
  • Q3 स्पष्टीकरण: ऑटोरिक्शा, बस आणि मोटार सायकल ही सर्व रस्त्यावरून (जमिनीवरून) चालणारी वाहने आहेत, तर जहाज हे पाण्यातील वाहन आहे.
  • Q4 स्पष्टीकरण: CAT, MAT आणि RAT हे प्राणी किंवा वस्तू आहेत (सजीव/निर्जीव अर्थाने). मात्र, बुद्धिमत्ता चाचणीच्या लॉजिकनुसार, BAT हा शब्द खेळाशी संबंधित (क्रीडासाहित्य) असल्यामुळे किंवा ‘वटवाघूळ’ (पक्षी/सस्तन प्राणी) या अर्थाने विसंगत ठरतो. (येथे संदर्भाप्रमाणे क्रीडासाहित्य हे मुख्य लॉजिक वापरले आहे).
  • Q5 स्पष्टीकरण: ही वर्गमूळावर आधारित मालिका आहे. २५ चे वर्गमूळ ५ आहे, त्याचप्रमाणे ३६ चे वर्गमूळ येते. अक्षरे (MN) तशीच राहतील.

🚀 यशाच्या शिखराकडे: आमच्याशी जोडून राहा!

Telegram Join करा…

भावी पोलिसांनो, यवतमाळच्या भरतीसाठी तुमची जिद्दच तुम्हाला पोस्ट मिळवून देणार आहे. दररोज अशाच फ्री टेस्ट, ट्रिक्स आणि महत्त्वाच्या नोट्ससाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलवर नक्की या!

📲 Daily MCQ आणि Mock Test साठी जॉईन करा:

👉 Join Now: https://t.me/gsestudypoint



इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page

© 2026 Gsestudypoint | Learn Education
Privacy PolicyContact UsAbout UsDMCATerms & ConditionsDisclaimer