🔥 Latest Updates

परभणी पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Parbhani Jilha Police Bharti Mock Test 2026

परभणी पोलीस भरती २०२६ प्रश्नपत्रिका टेस्ट | Parbhani Jilha Police Bharti Mock Test 2026

🎯 ध्येय परभणी पोलीस: ‘जिंतूर ते पालम’ आता घुमणार वर्दीचा आवाज!

नमस्कार माझ्या परभणीच्या जिद्दी आणि कष्टाळू भावी पोलीस मित्रांनो,

संत जनाबाईंच्या पावन भूमीत आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या परभणी जिल्ह्यात ‘पोलीस’ म्हणून मिरवण्याचं स्वप्न तुम्ही पाहताय, हीच तुमच्या यशाची पहिली पायरी आहे. परभणीची पोलीस भरती ही नेहमीच तिच्या ‘करंट अफेअर्स’ (चालू घडामोडी) आणि विज्ञानावर आधारित प्रश्नांसाठी ओळखली जाते.

मित्रांनो, मैदानावर तुम्ही घाम गाळून स्वतःला सिद्ध केलंच आहे, पण लक्षात ठेवा—खरा ‘गेम चेंजर’ हा लेखी परीक्षेचा पेपर असतो. आंतरराष्ट्रीय घडामोडींपासून ते विज्ञानातील किचकट संकल्पनांपर्यंत तुमची पकड असणं आता काळाची गरज आहे. तुमची हीच तयारी अधिक भक्कम करण्यासाठी GS eStudy Point ने परभणी जिल्ह्याचा खास पॅटर्न लक्षात घेऊन ही Mock Test तयार केली आहे.

लक्षात ठेवा:

  • स्पर्धा मोठी आहे, पण तुमची जिद्द त्याहून मोठी हवी.
  • केवळ वाचू नका, तर प्रश्नामागील ‘का आणि कसे’ समजून घ्या.
  • तुमचा एक अचूक पर्याय तुम्हाला वर्दीच्या जवळ नेणार आहे!

चला तर मग, पूर्ण एकाग्रतेने ही टेस्ट सोडवा आणि खाकी वर्दीच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाका!

परभणी जिल्हा पोलीस २०२६

📝 परभणी जिल्हा पोलीस भरती २९ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका टेस्ट

परभणी जिल्हा पोलीस भरती २९ मार्च २०२६ रोजी झालेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारित ही टेस्ट खास तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मागील प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास करून त्याच पॅटर्ननुसार प्रश्न दिले आहेत, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेची अचूक तयारी करता येईल.

पोलीस भरती परीक्षेमध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित एकूण 100 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या टेस्टमध्येही त्याच स्वरूपात प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.

🔍 या टेस्टची वैशिष्ट्ये:

✔ परभणी जिल्हा पोलीस भरती २९ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका आधारित प्रश्न
✔ पूर्णपणे MCQ स्वरूपात सराव
✔ परीक्षा पॅटर्ननुसार 100 प्रश्नांचा समावेश
✔ वेळ व्यवस्थापन आणि अचूकता वाढवण्यासाठी उपयुक्त
✔ स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची टेस्ट

ही टेस्ट सोडवल्याने तुम्हाला प्रश्नांची पद्धत, अवघडपणा आणि वेळेचे नियोजन याची चांगली सवय लागेल. नियमित सराव केल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि परीक्षेत यश मिळवणे सोपे होईल.

👉 परभणी जिल्हा पोलीस भरती २०२६ ची तयारी मजबूत करण्यासाठी ही टेस्ट नक्की सोडवा!

1 / 100

२०२५ सालचा 'आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार' कोणी मिळवला ?

2 / 100

श्रीलंकेने 'हंबनटोटा बंदर' कोणत्या देशाला ९९ वर्षाच्या करारावर दिलेले आहे ?

3 / 100

iped Natural Gas (PNG) चे खालीलपैकी कोणती वैशिष्ट आहे / आहेत? (१) हा हवेपेक्षा जड आहे (२) यात मुख्यतः प्रोपेन व ब्यूटेन गॅस असतो (३) हे स्वयंपाकासाठी अधिक सुरक्षित इंधन आहे. (४) हा भूमिगत पाईपलाईनव्दारे पुरवठा केला जातो.

4 / 100

डिमोना हे ठिकाण कोणत्या देशात आहे ?

5 / 100

भारत मंडपम कुठे आहे ?

6 / 100

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकाने कधी दिला.

7 / 100

शुभांशू शुक्ला या अंतराळवीराने कोणत्या अंतराळयानात प्रवास केला होता त्याचे नांव.

8 / 100

पॅरिस अॅग्रीमेंट २०१५ कशासाठी आहे ?

9 / 100

खालीलपैकी कोणत्ती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही ?

10 / 100

होर्मुज सामुद्रधुनी पर्शियन आखाताला कशाशी जोडते ?

11 / 100

'ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया' कोणाला म्हटले जाते ?

12 / 100

असहकार चळवळ चालू करण्याची अधिकृत घोषणा काँग्रेसने कोणत्या अधिवेशनात केली ?

13 / 100

'क्युसेक' हे......... मोजण्याचे साधन आहे.

14 / 100

खालीलपैकी कोणता/ते रोग विषाणूंपासून होत नाही/त? (१) देवी (२) इन्फ्ल्यूएंझा (३) क्षय (४) मलेरिया (५) कावीळ (६) हिमोफिलीया

15 / 100

या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून बीसीजीची लस टोचली जाते.

16 / 100

खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युतवाहक कोणता ?

17 / 100

'लुटीचा सिध्दान्त' दादाभाई नौरोजींनी मांडला (२) त्यामुळे दादाभाई नौरोजींना दीड वर्ष कारावास भोगावा लागला.

18 / 100

पंचमढी' व 'चिखलदरा' ही थंड हवेची ठिकाणे ..या पर्वतावर आहेत ?

19 / 100

या दोन नदयांनी मिळून पश्चिम बंगाल व बांगलादेशात पसरलेल्या 'सुंदरबन' या जगातील सर्वात मोठ्या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती केली आहे

20 / 100

'जोगचा धबधबा' किंवा 'गिरसप्पाचा धबधबा' हा भारतातील सर्वात मोठा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

21 / 100

खालीलपैकी कोणते पत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर चालवित नव्हते ?

22 / 100

'मानवी समता' हे मासिक कोणी चालू केले ?

23 / 100

खालीलपैकी कोणी आझाद हिंद सेनेतील सैनिकांवर भरलेल्या खटल्यात आरोपी सैनिकांचे वकीलपत्र घेतले होते.

24 / 100

टिळक-आगरकर यांनी खालीलपैकी कोणत्या संस्था एकत्रित स्थापन केल्या? (१) न्यू इंग्लिश स्कूल (२) डेक्कन एज्युकेशन सोसायटी (३) फर्ग्युसन कॉलेज

25 / 100

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

26 / 100

०.७a - ०.४२a = ५.६ तर a = किती ? 

27 / 100

रामरावांनी आपली सदनिका (फ्लॅट) आनंदी बाईना रु. ३८,३५,७५० ला दलालामार्फत विकली, दलालीचा दर २% दोघांकडून असेल तर दलालास एकूण किती दलाली मिळाली ? 

28 / 100

५ बाकांची विक्री किंमत ६ बाकांच्या खरेदी किंमती इतकी आहे, तर या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती ?

29 / 100

एका व्यक्तीने चक्रवाढ व्याजाने काही रुपये उधारीने आणले व तीन वर्षात समान हप्त्यावर परत केले. व्याजाचा दर द.सा.द.शे. १५% आहे व वार्षिक हप्ता रु. ४,८६,६८०/- आहे, तर त्याने किती रुपये उधार आणले ?

30 / 100

द.सा.द.शे. १२ दराने रु. ५०० मुद्दलाचे रु. १२० व्याज येण्यासाठी जेवढी मुदत लागते, तेवढ्या मुदत्तीत तेवढेच व्याज येण्यासाठी द.सा.द.शे ८% दराने किती रक्कम व्याजी लावावी.

31 / 100

२४० लीटर दुधाच्या द्रावणात ८% मलईचे प्रमाण आहे. १६० लिटर दुधाच्या द्रावणात १५% मलईचे प्रमाण आहे. जर दोन्ही द्रावणे एकत्र केली, तर त्या मिश्रणात मलईचे शेकडा प्रमाण किती असेल ?

32 / 100

एका सभागृहाची लांबी २८ मीटर व रुंदी १०.५ मीटर आहे. त्या सभागृहात सगळीकडे अर्धा मीटर असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या असतील, तर अशा किती फरशा लागतील ?

33 / 100

एका मिनीबसच्या चाकाचा व्यास ०.७ मी आहे. त्या बसचे चाक ५००० फेऱ्यांत किती अंतर कापेल.

34 / 100

६ तास ९ मिनिटे ३६ सेकंद यांचे तासात रुपांतर करा.

35 / 100

८ मीटर २४ सेमी लांबीच्या एका लोखंडी पाइपचे ८० मिमी लांबीचे समान तुकडे केले, तर त्या पाईपचे एकूण किती तुकडे तयार होतील ?

36 / 100

शीतलकडे जेवढी रु. ५ ची नाणी आहेत तेवढ्याच रु. २० च्या नोटा आहेत. तिच्याकडे एकूण रक्कम रु. ६०० आहे, तर शीतलकडे असलेल्या नोटांची संख्या किती ?

37 / 100

पुढीलपैकी किती विधाने सत्य आहेत? (१) चौरस हा आयत असतो (२) आयत हा समांतरभुज चौकोन असतो (३) समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो (४) चौरस हा समांतरभुज चौकोन असतो (५) समभुज चौकोन हा समलंब चौकोन असतो

38 / 100

पुढीलपैकी कोणता संख्यासमूह पायथागोरसचे त्रिकुट नाही ?

39 / 100

८ १/३, ४/५, ७ १/५ व ९ २/३ या संख्यांची सरासरी काढा.

40 / 100

प्रिया व तिच्या चार मैत्रिणींच्या वयांची सरासरी २४ वर्षे आहे. त्यांचे वय अनुक्रमे (३m-२), (२m+७), (४m-७), (३m) व (३m+२) वर्षे आहेत, तर 'm' ची किंमत काढा.

41 / 100

एक संख्या (x) चे २०% व दुसरी संख्या (y) चे २५% समान आहेत. तर x चे y शी गुणोत्तर काढा.

42 / 100

एका पिशवीत काही गोळया आहेत. त्या गोळया १२ मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास ८ गोळया उरतात, जर त्या गोळया १४ मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास १० गोळया उरतात, तर पिशवीत कमीत कमी किती गोळया असतील?

43 / 100

अशी लहानांत लहान संख्या शोधून काढा, की जिला ८ ने भागल्यास बाकी ४ उरते, १२ ने भागल्यास बाकी ८ उरते व १५ ने भागल्यास बाकी ११ उरते

44 / 100

पुढीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची नाही ?

45 / 100

१०३ च्या पुढील २३ वी विषम संख्या कोणती ?

46 / 100

सुरेशच्या यशाबद्दल सर्वांनी त्याचे अभिनंदन केले. या वाक्यात कोणते अव्यय आले आहे.

47 / 100

ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी (अधोरेखीत शब्दाचा सर्वनाम प्रकार ओळखा) 

48 / 100

पुढील शब्दांतील भाववाचक नाम कोणते ?

49 / 100

संधीप्रकारानुसार विसंगत असणारा पर्याय निवडा.

50 / 100

मराठी भाषेतील 'ळ' या वर्णाचे वैशिष्टय काय ?

51 / 100

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? 

52 / 100

भारतीय राज्य घटना संघराज्यात्मक आहे वा एकात्मक आहे याविषयी घटनातज्ञांमध्ये मतभेद असले तरी प्रत्यक्षात भारतीय राज्यघटनेत भारताचे वर्णन....... या शब्दात केले आहे.

53 / 100

ज्यपाल त्याच्या कृतीबद्दल जबाबदार असतो.

(१) राज्य विधिमंडळास (२) केंद्रीय मंत्रिमंडळास (३) राष्ट्रपतींना (४) पंतप्रधानास

54 / 100

लोकसभेतील शुन्य प्रहर कालावधी संदर्भात कोणते विधान असत्य आहे ?

55 / 100

खालील अक्षर मालिकेत काही अक्षरे गाळली आहेत, गाळलेले अक्षर योग्य क्रमाने असणारा पर्याय निवडा.

ZXP_XZ_XPPXZZX_PX_

56 / 100

एका रिकाम्या पिंपात ३० लिटर पाणी ओतले असता ते ०.६ भाग भरते. अजून किती लीटर पाणी ओतले असता ते पूर्ण भरेल ?

57 / 100

सहा वर्षापूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट होते. चार वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. तर किती वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल.

58 / 100

क घड्याळ तीन मिनीटाला ५ सेकंद पुढे जाते. सकाळी ७ वाजता ते बरोबर लावले. त्या दिवशी दुपारी घड्याळात सव्वाचार ही वेळ दाखवत असेल तर ती खरी वेळ कोणती ?

59 / 100

खालील संख्यामालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? ६५, १२६, २१७, ३४४, ?

60 / 100

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा CEGI : JHFD :: KMOQ:?

61 / 100

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. ८२, ४८, २६, ?, २

62 / 100

पुढील श्रृंखला पूर्ण करा. S, M, T, W, _, F, S

63 / 100

QHB: HCL :: CKA: KDM :: ?

64 / 100

चुकीचे पद ओळखा - ६, १५, ३४, ६९, १४१, २८५

65 / 100

३६:१८ :: ३०:?

66 / 100

EF: १५ :: KL: ?

67 / 100

GEF: TVU :: KJL:?

68 / 100

विसंगत अक्षरगट ओळख. 

69 / 100

एका सांकेतिक भाषेत HEN हा शब्द १६१०२८ असा लिहीला जातो, तर १२२२८ हा अंक कोणत्या शब्दासाठी असेल ?

70 / 100

राजू मंदिरापासून उत्तरेकडे २ कि.मी. चालत गेला त्यानंतर ३ कि.मी. डावीकडे चालत गेला. तेथून तो ६ कि.मी. डावीकडे चालत गेला. तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे ?

71 / 100

माला मीराला म्हणाली, "तुझ्या भावाच्या पत्नीची आई माझी आजी लागते." तर मीरा मालाची कोण ?

72 / 100

जर जय हा बीनाचा भाऊ आहे; बीना ही चंदुची बहीण आहे; आणि चंदु हे किरणचे वडील आहेत. तर किरणचा जयशी संबंध काय असेल?

73 / 100

मिलींद, सिध्देश, कार्तिक, सोहम आणि अक्षय एका रांगेत उभे आहेत. सिध्देश मध्यभागी उभा आहे. कार्तिक सोहमच्या पुढे नाही, तर मिलिंद अक्षय च्या मागे नाही. जर मिलिंद कार्तिकच्या मागे असेल तर दोन टोकांना कोण आहेत ?

74 / 100

एका सांकेतिक पध्दतीनुसार २४ म्हणजे ४६, ३५ म्हणजे ६८, तर ४४ म्हणजे किती ?

75 / 100

धावण्याच्या शर्यतीत रवी व राजू यांनी भाग घेतला. रवी म्हणाला, "शेवटच्या मुलाच्या पुढे मी चौथा होतो." राजु म्हणाला, "माझा सातवा क्रमांक आहे आणि रवी माझ्या पुढे दुसरा होता." तर एकुण स्पर्धक किती ?

76 / 100

उलटी अंबारी हाती येणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता ? 

77 / 100

भिकाऱ्याला मी एक सदरा दिला शिवाय त्याला जेवू घातले- या वाक्यातील 'शिवाय' हा शब्द खालीलपैकी काय आहे? 

78 / 100

गटात न बसणारा शब्द ओळखा. मीठभाकरी, पुरणपोळी, देवपूजा, रथचक्र

79 / 100

व्यक्तीबद्दल आदर दाखविण्यासाठी अनेकवचन वापरतात. (२) अधिक सलगी, जवळीक दाखविण्यासाठी एकवचन वापरतात.

80 / 100

स, ला, ना, ते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत ?

81 / 100

खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाहीत ?

82 / 100

काप, आठव, स्मर, लोट हे धातू कोणत्या प्रकारात येतात ?

83 / 100

मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता, ती क्रिया स्वतः करीत नसून, ती क्रिया तो दुसऱ्या कोणाला तरी करावयास लावीत आहे, असा अर्थ व्यक्त होत असेल तेंव्हा त्या क्रियापदाला ..... म्हणतात. 

84 / 100

व्दितीया विभक्तीचे कारकार्थ ओळखा.

85 / 100

'शुल्लक कारणावरुन मोठी आपत्ती येणे' या अर्थाची म्हण निवडा.

86 / 100

'प्रसंग पाहता मधुकररावांनी साप साप म्हणून भुई धोपटली'. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता ?

87 / 100

'आत्मश्लाघा' म्हणजे ?

88 / 100

'अष्टावधानी' म्हणजे ?

89 / 100

खालील अलंकारिक शब्दांचे अनुक्रमे योग्य अर्थ दिलेला पर्याय निवडा. खंक, सडासोट

90 / 100

अलंकारिक शब्द आणि त्यांचे अर्थ यांची अयोग्य जोडी ओळखा.

91 / 100

अलंकारिक शब्द आणि त्यांचे अर्थ यांची अयोग्य जोडी ओळखा.

92 / 100

महान कवयित्री बहिनाबाई चौधरी यांचे जन्मगांव कोणते ?

93 / 100

१९ वर्षाखालील पुरुष विश्वकप क्रिकेट स्पर्धा २०२६ या स्पर्धेचे यजमान देश कोणते ?

94 / 100

महाराष्ट्र राज्य गीत 'जय जय महाराष्ट्र माझा' याचे कवी कोण ?

95 / 100

खालीलपैकी कोणता कथासंग्रह बी रघुनाथ यांनी लिहिलेला नाही ?

96 / 100

परभणी जिल्हयातील खालीलपैकी कोणत्या तालुक्याची सीमा बीड जिल्हयाला लागून नाही ?

97 / 100

भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर उर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला आहे ?

98 / 100

'गांधीसागर धरण' खालीलपैकी कोणत्या प्रकल्पाचा भाग आहे ?

99 / 100

खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही ?

100 / 100

भारताचा 'शक्ती' हा लष्करी सराव कोणत्या देशासोबत केला जातो ?

Your score is

The average score is 23%

📝 स्पष्टीकरण (Explanations)

Q1. २०२५ सालचा ‘आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार’ (International Booker Prize) कोणी मिळवला?

(A) गीतांजली श्री

(B) बानू मुश्ताक

(C) जेनी इरपेनबॅक

(D) जॉर्जी गॉस्पोडीनोव

✅ उत्तर: (B) बानू मुश्ताक

Q2. श्रीलंकेने ‘हंबनटोटा बंदर’ कोणत्या देशाला ९९ वर्षांच्या करारावर दिलेले आहे?

(A) USA

(B) चीन

(C) पाकिस्तान

(D) भारत

✅ उत्तर: (B) चीन

Q3. Piped Natural Gas (PNG) ची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत?

(१) हा हवेपेक्षा जड आहे (२) यात मुख्यतः प्रोपेन व ब्यूटेन असतो (३) हे स्वयंपाकासाठी सुरक्षित आहे (४) हा पाईपलाईनद्वारे पुरवला जातो.

(A) २, ३, ४ बरोबर

(B) १, ३, ४ बरोबर

(C) ३, ४ बरोबर

(D) १, २, ४ बरोबर

✅ उत्तर: (C) ३, ४ बरोबर

Q4. ‘डिमोना’ हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या देशात आहे?

(A) लेबनॉन

(B) इस्रायल

(C) इराण

(D) इराक

✅ उत्तर: (B) इस्रायल

Q5. ‘भारत मंडपम’ कोठे स्थित आहे?

(A) चेन्नई

(B) कोलकाता

(C) दिल्ली

(D) बंगळुरू

✅ उत्तर: (C) दिल्ली


💡 प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण (Explanations)

  • Q1 स्पष्टीकरण: २०२५ चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार भारतीय लेखिका बानू मुश्ताक यांना त्यांच्या साहित्यासाठी देऊन गौरवण्यात आले आहे. (टीप: गीतांजली श्री यांना २०२२ मध्ये मिळाला होता).
  • Q2 स्पष्टीकरण: कर्जबाजारी झाल्यामुळे श्रीलंकेने आपले धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हंबनटोटा बंदर चीनला ९९ वर्षांच्या लीजवर दिले आहे.
  • Q3 स्पष्टीकरण: PNG (पाईप्ड नॅचरल गॅस) मध्ये मुख्यतः मिथेन असतो (प्रोपेन-ब्यूटेन LPG मध्ये असतात). PNG हा हवेपेक्षा हलका असतो, त्यामुळे गळती झाल्यास तो वर उडून जातो, म्हणून तो स्वयंपाकासाठी सुरक्षित मानला जातो.
  • Q4 स्पष्टीकरण: डिमोना हे इस्रायलमधील शहर असून तिथे त्यांचे महत्त्वाचे अणुकेंद्र (Nuclear Research Center) स्थित आहे.
  • Q5 स्पष्टीकरण: भारत मंडपम हे दिल्लीतील प्रगती मैदान येथे उभारलेले जागतिक दर्जाचे ‘कन्व्हेंशन सेंटर’ आहे, जिथे G20 शिखर परिषद पार पडली होती.

🚀 यशाचा खात्रीशीर मार्ग: आमच्याशी जोडून राहा!

Telegram Join करा…

भावी पोलिसांनो, परभणीच्या भरतीसाठी तुमचं टार्गेट आता ‘फिक्स’ असलं पाहिजे. तुमची तयारी अधिक भक्कम करण्यासाठी आणि दररोज अशाच मोफत टेस्ट सोडवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा.

📲 Daily MCQ आणि Mock Test साठी जॉईन करा:

👉 Join Now: https://t.me/gsestudypoint



इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page

© 2026 Gsestudypoint | Learn Education
Privacy PolicyContact UsAbout UsDMCATerms & ConditionsDisclaimer