15 मार्च रोजी झालेला अमरावती ग्रामीण पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Amaravati Gramin Police 2026 Question Paper Mock Test | | Free Online Practice Test

15 मार्च रोजी झालेला अमरावती ग्रामीण पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट

📝 अमरावती ग्रामीण पोलीस भरती १५ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका टेस्ट

अमरावती ग्रामीण पोलीस भरती १५ मार्च २०२६ रोजी झालेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारित ही टेस्ट खास तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मागील प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास करून त्याच पॅटर्ननुसार प्रश्न दिले आहेत, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेची अचूक तयारी करता येईल.

पोलीस भरती परीक्षेमध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित एकूण 100 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या टेस्टमध्येही त्याच स्वरूपात प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.

🔍 या टेस्टची वैशिष्ट्ये:

✔ अमरावती ग्रामीण पोलीस भरती १५ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका आधारित प्रश्न
✔ पूर्णपणे MCQ स्वरूपात सराव
✔ परीक्षा पॅटर्ननुसार 100 प्रश्नांचा समावेश
✔ वेळ व्यवस्थापन आणि अचूकता वाढवण्यासाठी उपयुक्त
✔ स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची टेस्ट

ही टेस्ट सोडवल्याने तुम्हाला प्रश्नांची पद्धत, अवघडपणा आणि वेळेचे नियोजन याची चांगली सवय लागेल. नियमित सराव केल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि परीक्षेत यश मिळवणे सोपे होईल.

👉 अमरावती ग्रामीण पोलीस भरती २०२६ ची तयारी मजबूत करण्यासाठी ही टेस्ट नक्की सोडवा!

1 / 100

९०० विद्यार्थ्यांपैकी कला ३९.५%, विज्ञान २९.५% व वाणिज्य ३१% आहेत. कला शाखेत विज्ञान शाखेपेक्षा किती विद्यार्थी अधिक आहेत ?

2 / 100

COMPLETE या शब्दातील अक्षरे अशा प्रकारे किती प्रकारे मांडता येतील की स्वर नेहमी एकत्र येतील ?

3 / 100

जर फुटबॉलला क्रिकेट, क्रिकेटला बास्केटबॉल, बास्केटबॉलला बॅडमिंटन, बॅडमिंटनला व्हॉलीबॉल, व्हॉलीबॉलला हॉकी व हॉकीला गोल्फ म्हटले, तर चेंडू न वापरता खेळला जाणारा खेळ कोणता ?

4 / 100

विधान: सर्व बाजा वाद्य आहेत. सर्व वाद्य बासरी आहेत.
निष्कर्ष: i) सर्व बाजा बासरी आहेत. ii) सर्व बासरी वाद्य आहेत.

5 / 100

३० मुलींच्या रांगेत साक्षी ४ जागा डावीकडे सरकल्यावर डावीकडून १० वी झाली, तर सुरुवातीला ती उजवीकडून कितवी होती ?

6 / 100

योगेश मंगेशपेक्षा मोठा, श्वेता राहुलपेक्षा लहान पण अंकितपेक्षा मोठी आहे. अंकित योगेशपेक्षा मोठा आहे. तर सर्वात लहान कोण ?

7 / 100

राहुल निलेशचा भाऊ, गोपी निलेशची मुलगी, पार्वती राहुलची मुलगी व कुणालची पत्नी आहे. मंगल निलेशची बहीण आहे. तर मंगल पार्वतीची कोण ?

8 / 100

वरील आकृतीमधील प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

9 / 100

QB7, PC6, OD8, NE5, ?

10 / 100

घड्याळात ४:२० वाजले असताना तास व मिनिट काट्यात किती अंशाचा कोण असेल ?

11 / 100

खालील वाक्यातील कर्मणी प्रयोग योग्यरित्या ओळखा:

"शिक्षकांनी विद्यार्थ्यांना धडा समजावून सांगितला."

12 / 100

६, १३, २५, ५१, १०१... या मालिकेतील नवव्या स्थानावर कुठली संख्या येईल ?

13 / 100

मुलाच्या जन्माच्या वेळी आईचे वय ३० वर्ष होते. आता दोघांच्या वयाची बेरीज ४० आहे. तर १० वर्षांनी मुलाचे वय किती असेल ?

14 / 100

जर ०१ जानेवारी २००० रोजी शनिवार होता, तर ०१ जानेवारी २०१० रोजी कोणता वार येईल ?

15 / 100

खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष नाही ?

स्पष्टीकरण:

प्रत्येक अक्षराला ठराविक अंक दिला आहे. P=७, R=९, I=९, C=३, E=५. यावरून PRICE = ७९९३५.

16 / 100

जर POLICE = ७६३९३५ आणि CRIMINAL = ३९९४९५१३ असेल तर PRICE =?

स्पष्टीकरण:

उघडलेल्या फाशामध्ये एक घर सोडून येणारे अंक एकमेकांच्या विरुद्ध असतात. दिलेल्या आकृतीनुसार २ च्या विरुद्ध ४ हा अंक येतो.

17 / 100

उघडलेला फासा पाहता, २ या चिन्हाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक येईल ?

18 / 100

४०० चे ७५% चे ३०% चे २५% = X, तर X = ?

19 / 100

जर √९६१ = ३१ असेल, तर दिलेल्या समीकरणाचे मूल्य किती ?

20 / 100

जर ४x५=९२०, २x७=११४, ३x८=११२४ तर ०x६=?

21 / 100

९८) (४५)² - (३५)² या संख्येच्या दशक स्थानी कोणता अंक येईल ?

22 / 100

दोन संख्यांचा गुणाकार १२० व त्यांच्या वर्गांची बेरीज २८९ असल्यास त्या दोन अंकांची बेरीज किती ?

23 / 100

आकृती मालिकेतील पुढील योग्य आकृती निवडा.

24 / 100

७५ किमी जाण्यासाठी वेग १० किमी/तास वाढवल्यास १५ मिनिटे वेळ कमी लागतो. तर वाढलेल्या वेगाने ४२० किमी जायला किती वेळ लागेल ?

25 / 100

वर्तुळाची त्रिज्या ६०% ने वाढवल्यास परिघात किती टक्के वाढ होईल ?

यापैकी नाही

26 / 100

दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती आयत आहेत ?

27 / 100

जर A:B = ७:९ आणि B:C = ३:५, तर A:B:C = ?

28 / 100

जर २x+३y=१३ आणि ४x-y=५, तर y = ?

29 / 100

आंब्याची २४, सफरचंदाची ५६ व संत्र्याची ७२ झाडे समान रांगेत लावायची असल्यास किमान किती रांगा लागतील ?

30 / 100

योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा: _acca_ceca_acccc_aaa

31 / 100

२/४, ५/६ आणि १०/८ यांचा लसावि किती ?

32 / 100

वीर, सुजित, अभिजीत, राहुल, प्रमोद, कुणाल हे व्यक्ती एका वर्तुळाकार टेबलाभोवती बसलेले आहेत. वीर व सुजित एकमेकांच्या विरुद्ध बसले आहेत. वीरच्या निकटतम डाव्या बाजूला अभिजीत आहे. राहुल व कुणाल एकमेकांच्या विरुद्ध आहेत. राहुलच्या निकटतम उजव्या बाजूला प्रमोद आहे. कुणाल आणि वीर यांच्यामध्ये कोण बसले आहेत ?

33 / 100

२४ माणसे एक काम १८ दिवसांत करतात. १२ दिवसांनंतर ८ माणसे सोडून गेल्यास काम पूर्ण व्हायला एकूण किती दिवस लागतील ?

34 / 100

यापैकी कोण बेसबॉल आणि फुटबॉल खेळत नाही ?

35 / 100

रवी व कुणाल हे हॉकी व व्हॉलीबॉल खेळतात. सचिन व रवी हॉकी आणि बेसबॉल खेळतात. तर गौरव व कुणाल हे क्रिकेट व व्हॉलीबॉल खेळतात. सचिन, गौरव आणि राजेश हे फुटबॉल आणि बेसबॉल खेळतात. हॉकी, बेसबॉल आणि फुटबॉल हे खेळ कोण खेळतो ?

36 / 100

३० संख्यांची सरासरी ९० आहे. पहिल्या १५ ची ८५ व शेवटच्या १६ ची ९५ असल्यास, १५ वी संख्या वगळून उरलेल्यांची सरासरी किती ?

37 / 100

अमरावती पासून नागपूर जाणारी ३:१२ वा. ची गाडी पकडण्यासाठी श्रृष्टी रेल्वे स्टेशनवर १२ मिनिटे उशिरा पोहोचली. स्टेशनवरून ही गाडी प्रत्येक तासाला १२ मिनिटांनी सुटते. पुढील गाडी येईपर्यंत श्रृष्टीला किती वेळ थांबावे लागेल ?

38 / 100

₹२,००,००० च्या वाहनाचा वार्षिक घसारा १२% असल्यास, २ वर्षांनंतर त्याची किंमत किती होईल ?

39 / 100

एक व्यक्ती पूर्व दिशेला १२ मीटर चालतो. त्यानंतर तो मागे वळून पश्चिम दिशेला ३ मीटर चालतो. त्यानंतर तो उत्तर दिशेला १२ मीटर चालतो. तर सुरुवातीच्या ठिकाणापासून त्याच्या अंतिम स्थानापर्यंतचे सर्वात कमी अंतर किती मीटर असेल ?

40 / 100

१५० मीटर लांब रेल्वे ५४ किमी/तास वेगाने एका खांबाला किती वेळात पार करेल ?

41 / 100

खालील पैकी किती जोड्या बरोबर आहेत ते ओळखा.*
१) महिला हेल्प लाईन - १०९१ २) सायबर क्राईम हेल्प लाईन - १९३० ३) चाईल्ड हेल्प लाईन - १०९८ ४) आपत्कालीन हेल्प लाईन - ११२

42 / 100

एक नळ टाकी १० मिनिटांत भरतो व दुसरा १५ मिनिटांत रिकामी करतो. दोन्ही नळ सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल ?

43 / 100

होर्मुझची सामुद्रधुनी ही कोणत्या जलाशयास जोडते ?

44 / 100

४५@७३३६ या संख्येला ९ ने पूर्ण भाग जाण्यासाठी @ च्या जागी काय असावे ?

45 / 100

'AI Impact Summit 2026' भारतात कोठे आयोजित करण्यात आली होती ?

46 / 100

भारतीय रिजर्व बँकेचे राष्ट्रीयीकरण कधी करण्यात आले ?

47 / 100

१, २ आणि ५ रुपयांची ३५ नाणी आहेत (एकूण किंमत ₹७५). जर १ रुपयाची १० नाणी असतील, तर ५ रुपयांची नाणी किती ?

48 / 100

खालील पैकी कोणत्या बाबींना भारतात भौगोलिक मानांकन (GI tag) प्राप्त आहे ?
i) पुणेरी पगडी ii) महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी iii) वारली चित्रकला iv) सांगलीची हळद

49 / 100

एका मशीनने ०.०८५% प्रमाणे १७ बॅट्स नाकारल्या, तर एकूण किती बॅट्स तपासल्या होत्या ?

50 / 100

भारतात पिवळी क्रांती कोणत्या उत्पादनाशी निगडीत आहे ?

51 / 100

जर x + 1/x = ८, तर x³ + 1/x³ = ?

52 / 100

खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची जन्म भूमी अमरावती जिल्ह्यात नाही ?

53 / 100

7⁰(७ - ७x७ + ७÷७) = ?

54 / 100

लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षणाविषयीच्या खलित्याचा उद्देश काय होता ?

55 / 100

यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? २, √१०, ५, ⁶√२५

56 / 100

भारतात संविधान दिन कधी पाळला जातो ?

57 / 100

भारताच्या राष्ट्रपती निवडणुकीत खालीलपैकी कोण भाग घेत नाही ?

58 / 100

३(∛(५५ + √(७८ + ∛२७))) = ?

59 / 100

मूलभूत कर्तव्ये भारताच्या संविधानात कितव्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले आहेत ?

60 / 100

जर 3^(x-1) + 3^(x+1) = 810, तर x = ?

61 / 100

Gemini (जेमीनी) हे कोणत्या कंपनीने विकसित केलेले कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मॉडेल आहे ?

62 / 100

भारतीय राज्यघटनेत पक्षांतर विरोधी कायदा कोणत्या अनुसूची मध्ये नमूद करण्यात आला आहे ?

63 / 100

एका रकमेवर ११ वर्षांत एकूण ९००० रुपये व्याज मिळते. (दर पहिल्या ३ वर्षांत १०%, पुढील ५ वर्षांत ९% व उरलेल्या कालावधीत ५%). तर मुद्दल किती ?

64 / 100

पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते ?

65 / 100

मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची शक्ती कोणता ?

66 / 100

२०२६ साली अमरावती येथून पद्मश्री पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?

67 / 100

सामासिक शब्दाचे लिंग कोणत्या शब्दावरून ठरवतात ?

68 / 100

२०२८ साली उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन कोणते शहर करणार आहे ?

69 / 100

'आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे' अलंकार ओळखा.

70 / 100

भारताचे सध्याचे राज्यपाल (महाराष्ट्र) कोण आहेत ?

71 / 100

अग्रेसर, दीनानाथ या शब्दांचा समास ओळखा.

72 / 100

भारतातील शेअर बाजाराचे नियमन करणारी संस्था कोणती आहे ?

73 / 100

'आलमारी' हा शब्द कोणत्या भाषेतून घेण्यात आला आहे ?

74 / 100

छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?

75 / 100

गुरुजी म्हणाले की एकी हेच बळ' यातील प्रधान वाक्य कोणते ?

76 / 100

खालीलपैकी कोणती नदी पश्चिमेकडे वाहते ?

77 / 100

'मी हे काम करू?' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.

78 / 100

चंद्रग्रहणात पुढीलपैकी कोणती क्रिया घडते ?

79 / 100

'(आम्हा) मुलांना कोण विचारतो ?' यातील विशेषण प्रकार कोणता ?

80 / 100

१) श्रीमंत माणसांना गर्व असतो. २) श्रीमंतांना गर्व असतो.'

(यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा)

81 / 100

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

82 / 100

खालीलपैकी कोणते मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे भाग आहे ?
i) गुगामल राष्ट्रीय उद्यान ii) वान वन्यजीव अभयारण्य iii) नरनाळा वन्यजीव अभयारण्य iv) अंबा बरवा वन्यजीव अभयारण्य

83 / 100

'मी (आपणहून) सहलीला जाण्याची तयारी दाखविली' यातील आपणहून काय आहे ?

84 / 100

विभक्ती व कारकार्थ चुकीचा पर्याय निवडा.

85 / 100

अमरावती जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्हयांची सिमा लागून आहे ?

86 / 100

खालीलपैकी शुद्ध / अचूक शब्द ओळखा

87 / 100

महाराष्ट्राच्या पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे ?

88 / 100

चुकीची जोडी ओळखा

89 / 100

'माझ्या आईने सोळा (सोमवार) केले' यातील सोमवार हे काय आहे ?

90 / 100

खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.

91 / 100

सूर्यास्त, विद्यार्थी हे शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहेत ?

92 / 100

चुकीची जोडी ओळखा (संधी विग्रह)

93 / 100

खालीलपैकी मूर्धन्य व्यंजन कोणते ?

94 / 100

गटात न बसणारा स्वर ओळखा: अ, ए, ऐ, ओ, औ

95 / 100

'उभा इंद्र करणे' या अर्थाचा वाक्प्रचार कोणता ?

96 / 100

'दुसऱ्याच्या वैभवाचा आपल्याला उपयोग नसतो' या अर्थाची म्हण कोणती ?

97 / 100

म्हण पूर्ण करा: गाढवांचा गोंधळ....

98 / 100

कोणत्या पर्यायातील शब्दांची रूपे अनेकवचनी होताना बदलत नाही ?

99 / 100

लांच्छन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

100 / 100

गटात न बसणारा वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा.

Your score is

The average score is 44%


  • 15 मार्च रोजी झालेला छ. संभाजीनगर लोहमार्ग पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Chatrapati Sambhajinagar Lohmarg Police 2026 Question Paper Mock Test


  • 15 मार्च रोजी झालेला अमरावती ग्रामीण पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Amaravati Gramin Police 2026 Question Paper Mock Test | | Free Online Practice Test


  • 15 मार्च रोजी झालेला नागपूर ग्रामीण पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Nagpur Gramin Police 2026 Question Paper Mock Test


  • 15 मार्च रोजी झालेला छ. सांभाजीनगर ग्रामीण पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट |Chhatrapati Sambhajinagar Gramin Police 2026 Question Paper Mock Test


  • 15 मार्च रोजी झालेला अहिल्यानगर शहर पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Ahilyanagar City Police 2026 Question Paper Mock Test


  • 15 मार्च रोजी झालेला जळगाव पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Jalgaon Police 2026 Question Paper Mock Test


  • अकोला पोलीस भरती २०२६ मध्ये झालेली संपूर्ण प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट| Akola Police bharti 2026 Complete Question Paper Test


  • पुणे शहर पोलीस २०२६ – संपूर्ण प्रश्नपत्रिका | Pune City Police 2026 Complete Question Paper Test


  • 15 मार्च रोजी झालेला रायगड पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Raigad Police 2026 Question Paper Mock Test


  • 15 मार्च रोजी झालेला पिंपरी चिंचवड पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Pimpri Chinchwad Police 2026 Question Paper Mock Test



इतरांना शेयर करा :-

Leave a Comment

You cannot copy content of this page