१. नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे, जे अरुणाचल प्रदेशातील पहिले व्यक्ती ठरले आहेत?
उत्तर: जोराम आनिया
२. एशियन डेव्हलपमेंट बँकेने (ADB) आशिया पॅसिफिकमधील ऊर्जा आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीसाठी किती गुंतवणुकीची योजना जाहीर केली आहे?
उत्तर: ७० अब्ज युएसडी (USD) डॉलर
३. ‘पीएम सूर्य घर मोफत वीज’ योजनेअंतर्गत कोणते राज्य देशात अव्वल क्रमांकावर आले आहे?
उत्तर: महाराष्ट्र
४. २०२६ च्या पुलिजर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर: सुवर्णा शर्मा आणि आनंद आर. के.
५. भारताचा पहिला ‘मोती उत्पादन समूह’ (Pearl Farming Cluster) म्हणून कोणत्या ठिकाणाला घोषित करण्यात आले आहे?
उत्तर: हजारीबाग
६. भारताचा पहिला एआय (AI) सक्षम ऑर्बिटल डेटा सेंटर उपग्रह कोणता आहे जो पिक्सल आणि सर्वम एआय यांनी विकसित केला आहे?
उत्तर: पाथ फाइंडर
७. दरवर्षी ‘जागतिक रेड क्रॉस दिवस’ केव्हा साजरा करण्यात येतो?
उत्तर: ८ मे
८. ईपीसी (EPC – European Political Community) शिखर परिषदेमध्ये सहभागी होणारा पहिला गैर-युरोपीय देश कोणता ठरला आहे?
उत्तर: कॅनडा
९. आयसीयू (ICU) रुग्णांसाठी भारतातील पहिली ‘पोर्टेबल बेडसाईड एमआरआय प्रणाली’ कोठे तैनात करण्यात आली आहे?
उत्तर: एम्स (AIIMS), नवी दिल्ली
१०. भारत सध्या कोणत्या देशाला ‘ब्रह्मोस’ सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची विक्री करण्याबाबत चर्चा करत आहे?
उत्तर: व्हिएतनाम
११. कोणत्या देशाने अल्पसंख्याकांना ‘मँडरिन’ भाषा शिकणे बंधनकारक करणारा वांशिक ऐक्य कायदा मंजूर केला आहे?
उत्तर: चीन
१२. अमेरिकेकडून भारताला अधिकृतपणे किती पुरातन वस्तू (Antiquities) परत करण्यात आलेल्या आहेत?
उत्तर: ६५७ पुरातन वस्तू
१३. नीती आयोगाचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर: पंतप्रधान नरेंद्र मोदी
१४. जागतिक रेड क्रॉस दिवस २०२६ ची थीम (विषय) काय आहे?
उत्तर: मानवता जिवंत ठेवणे (Keeping Humanity Alive)
१५. ‘ऑपरेशन सिंदूर’ला एक वर्ष कोणत्या दिवशी पूर्ण झाले आहे?
उत्तर: ७ मे
संपूर्ण चालू घडामोडी एप्रिल 2026
📲 Daily MCQ आणि Mock Test साठी आमच्या Telegram channel ला join करा!
👉 Join Now: https://t.me/gsestudypoint






