15 मार्च रोजी झालेला पुणे ग्रामीण पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Pune Gramin Police 2026 Question Paper Mock Test | Free Online Practice Test

15 मार्च रोजी झालेला पुणे ग्रामीण पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट

📝 पुणे ग्रामीण पोलीस भरती १५ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका टेस्ट

पुणे ग्रामीण पोलीस भरती १५ मार्च २०२६ रोजी झालेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारित ही टेस्ट खास तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मागील प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास करून त्याच पॅटर्ननुसार प्रश्न दिले आहेत, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेची अचूक तयारी करता येईल.

पोलीस भरती परीक्षेमध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित एकूण 100 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या टेस्टमध्येही त्याच स्वरूपात प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.

🔍 या टेस्टची वैशिष्ट्ये:

✔ पुणे ग्रामीण पोलीस भरती १५ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका आधारित प्रश्न

✔ पूर्णपणे MCQ स्वरूपात सराव

✔ परीक्षा पॅटर्ननुसार 100 प्रश्नांचा समावेश

✔ वेळ व्यवस्थापन आणि अचूकता वाढवण्यासाठी उपयुक्त

✔ स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची टेस्ट

ही टेस्ट सोडवल्याने तुम्हाला प्रश्नांची पद्धत, अवघडपणा आणि वेळेचे नियोजन याची चांगली सवय लागेल. नियमित सराव केल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि परीक्षेत यश मिळवणे सोपे होईल.

👉 पुणे ग्रामीण पोलीस भरती २०२६ ची तयारी मजबूत करण्यासाठी ही टेस्ट नक्की सोडवा!

1 / 100

२८८, ३६०, ?, ५२८

2 / 100

लाल रंगास पिवळा म्हटले, पिवळा रंगास निळे म्हटले, निळ्या रंगास हिरवे म्हटले व हिरव्या रंगास काळे म्हटले तर टरबुजाच्या आतील रंग कोणता ?

3 / 100

PUNE चे आरशातील प्रतिबिंब ओळखा.

4 / 100

एका निवडणुकीत ८% मतदारांनी मतदान केले नाही. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मताच्या ४८% मते मिळून त्याने ११०० मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला. तर या निवडणुकीत एकूण मतदार किती?

5 / 100

एक वर्षापूर्वी आईचे वय तिच्या मुलाच्या वयाच्या चौपट होते. ६ वर्षांनंतर तिचे वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा ५ वर्षांनी जास्त होत असेल तर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय?

6 / 100

एका वसतिगृहात १५० विद्यार्थ्यांना ४५ दिवस पुरेल इतका अन्नसाठा आहे. १० दिवसांनी २५ विद्यार्थी सोडून गेले. तर पहिल्या दिवसापासून अन्नसाठा किती दिवस पुरेल?

7 / 100

वेदानने ८०० मीटर पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. त्याचा पोहण्याचा वेग १६ किमी/तास आहे. जर तो प्रवाहाच्या दिशेने पोहला आणि प्रवाहाचा वेग ४ किमी/तास असल्यास तो ८०० मीटर अंतर किती वेळात पूर्ण करेल?

8 / 100

ताशी ६० किमी वेगाने जाणारी २२० मीटर लांबीची आगगाडी १ पूल ३६ सेकंदात पार करते, तर त्या पुलाची लांबी किती?

9 / 100

३, ७, २३, ९५, ?

10 / 100

एका डब्यात २ रू, ५ रू, १० रू ची समान नाणी आहेत. त्यांची एकूण किंमत ४२५ रू आहे. तर त्या डब्यात एकूण नाणी किती असतील?

11 / 100

एकूण राशी किती आहेत ?

12 / 100

एका कोनाचे माप त्याच्या पूरक कोनाच्या मापाच्या १/३ पट आहे. तर त्या कोनाच्या कोटिकोनाचे माप काढा.

13 / 100

कवायतीसाठी मुली रांगेमध्ये उभ्या केल्या. प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या आणि रांगांची संख्या व्यस्त प्रमाणात आहे. प्रत्येक रांगेत १४ मुले उभी केल्यास ६ रांगा तयार होतात, तर प्रत्येक रांगेत १२ मुले उभी केल्यास किती रांगा होतील?

14 / 100

'टू लाईव्हज' (Two Lives) या पुस्तकाचे लेखक कोण ?

15 / 100

८ से मी बाजू असलेला लोखंडी घन ठोकळा वितळवून २ से मी बाजू असलेले किती ठोकळे तयार करता येतात?

16 / 100

शिक्षण' हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे ?

17 / 100

सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

18 / 100

खालीलपैकी पायथागोरसची त्रिकुटे किती आहेत? (३,६,५), (८,१५,१७), (९,४०,४१), (७,२४,२५)

19 / 100

कारगिल शहर कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे ?

स्पष्टीकरण:

  • निव्वळ प्रगती: माकड एका प्रयत्नात प्रत्यक्षात १ मीटर चढते ($2 - 1 = 1$ मी).

  • शेवटची उडी: माकडाची एका उडीची क्षमता २ मीटर आहे. शिखरावर पोहोचल्यावर माकड घसरत नाही.

  • हिशोब: १० मीटरमधून शेवटची २ मीटरची उडी वजा करा ($10 - 2 = 8$ मी).

  • प्रयत्न: पहिल्या ८ मीटरसाठी ८ प्रयत्न लागतील. त्यानंतरच्या ९ व्या प्रयत्नात माकड २ मीटरची उडी मारून थेट १० मीटर (शिखरावर) पोहोचेल.

20 / 100

एक माकड १० मीटर खांबावर एका प्रयत्नात २ मीटर वर चढते व १ मीटर खाली घसरते. तर त्या माकडाला १० मीटर खांबावर सर्वप्रथम पोहोचण्यास किती प्रयत्न करावे लागतील?

21 / 100

माउंट एव्हरेस्टवर चढणारे पहिले व्यक्ती कोण ?

22 / 100

भारतीय प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?

23 / 100

भूमितीचा जनक कोणाला म्हणतात ?

24 / 100

एका सांकेतिक भाषेत BASKET हा शब्द ५$३%#१ असा आणि TRIED हा शब्द १४#२ असा लिहतात तर त्या भाषेत SKIRT हा शब्द कसा लिहता येईल ?

25 / 100

एक घड्याळ दर ५ मिनिटाला ५ सेकंद समोर जाते. जर ते घड्याळ सकाळी १० वाजता बरोबर लावले तर संध्याकाळी ८ वाजता त्यात किती वाजले असतील ?

26 / 100

क्रिकेटच्या एका सामन्यात एका संघाचे सर्व खेळाडू ३६३ धावा काढल्यानंतर बाद झाले. परंतु नंतर असे आढळले की दोन खेळाडूंच्या धावा अनुक्रमे ६८ आणि ५८ असताना ७८ आणि ६८ गणल्या गेल्या आहेत. तर त्या संघातील खेळाडूंच्या धावांची अचूक सरासरी किती?

27 / 100

एका पिशवीमध्ये ५ पांढरे व ८ हिरवे चेंडू आहेत. त्यामधुन २ चेंडू यादृच्छिक पद्धतीने बाहेर काढले तर त्यामधुन एक पांढरा आणि एक हिरवा असण्याची संभाव्यता काय ?

28 / 100

अजमेर हे शहर खालीलपैकी कोणत्या सुफी संताशी संबंधित आहे?

29 / 100

दुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनीट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल?

30 / 100

एका वर्गातील पास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मनिषा गुणानुक्रमे सोळावी आणि खालून एकोणतीसावी आली. पाच विद्यार्थ्यांनी परीक्षेत भाग घेतला नाही, सहा विद्यार्थी नापास झाले तर वर्गात किती विद्यार्थी होते ?

31 / 100

एका वर्षी १ ऑगस्टला गुरूवार होता तर त्याच वर्षातील बालदिन कोणत्या वारी आला असेल?

32 / 100

जर व्याज दर ४% ऐवजी ८% घेतला तर २ वर्षाचे सरळव्याज ३६०० रू. जास्त मिळते तर मूळ रक्कम किती असेल?

33 / 100

एक शिपाई चोराला पकडण्यासाठी त्याच्यामागे धावत आहे. चोर हा शिपायापेक्षा १५० मीटर पुढे धावत आहे. शिपाई व चोर यांचा पळण्याचा वेग अनुक्रमे ३० व २९ किमी प्रति तास आहे, तर चोराला पकडायला शिपायाला किती वेळ लागेल ?

34 / 100

एक वस्तू ४२५ रूपयाला विकल्यावर जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू ६५० रूपयाला विकल्यास होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढा?

35 / 100

जर P हा M चा भाऊ आहे. Q हा M चा मुलगा आहे. Q ची मुलगी R हिचे T शी लग्न झाले आहे. M आणि S या बहिणी आहेत, तर S चे Q शी नाते काय ?

36 / 100

दोन विषयाच्या परीक्षेत ७०% विद्यार्थी इंग्रजीत व ६५% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. २५% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. जर ३००० विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर एकूण किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते?

37 / 100

_cd_bcda_cdab_da

38 / 100

४, १०, १६, २२, २८ या संख्या मालेतील २५ व ४५ व्या स्थानावर असणाऱ्या संख्यांची बेरीज किती?

39 / 100

२३ ते ५८ या दरम्यान असणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?

40 / 100

जर NET = 39, WORK = 67 तर COMPULSORY = ?

41 / 100

एका हौदाला दोन तोट्या आहेत. या तोट्यांनी हा हौद अनुक्रमे १० व १२ तासात पूर्ण भरू शकतो. तिसऱ्या एका तोटीमुळे हा हौद २० तासात पूर्ण रिकामा होऊ शकतो. या तीनही तोट्या एकाच वेळी चालू ठेवल्या, तर हा हौद किती वेळात पूर्ण भरू शकतो?

42 / 100

ANSWER हा शब्द 10TX५$ असा लिहिला, तर GODOWN हा शब्द कसा लिहता येईल ?

43 / 100

4^(n+1) × 4^(n+2) = ?

44 / 100

0, 1, 5, 5, 10, 9, 15, ?, ?

45 / 100

८, १२, १५ या संख्यांनी निःशेष भाग जाणारी खालील लहानात लहान वर्ग संख्या कोणती?

46 / 100

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?

47 / 100

एका संख्येतून ८ वजा करून येणाऱ्या वजाबाकीला ८ ने भागल्यास भागाकार २ येतो, तर मूळ संख्येतून ४ वजा करून येणाऱ्या संख्येस ४ ने भागल्यास किती उत्तर येईल?

48 / 100

एका छपाई कर्त्याने एका अंकासाठी १ खिळा वापरला, तर १५० पानांचे पुस्तक असेल तर त्याला एकूण १५० पानावरील नंबरांकरिता किती खिळे लागतील?

49 / 100

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?

50 / 100

ऐशीं तेथे पंचेशी या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे?

51 / 100

खालील पैकी एकाच अर्थाच्या शब्दाची जोडी ओळखा:

52 / 100

दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना 'मराठी भाषेचे पाणिनी' असे कोण म्हणाले होते?

53 / 100

'इत्यादी' हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

54 / 100

'बोधपर वचन' या शब्दसमुहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.

55 / 100


'पुष्कळ द्रव्य मिळणे' या अर्थाचा वाक्प्रचार खालीलपैकी कोणता?

56 / 100

मानव, सजीव, पुरुष हे खालीलपैकी कोणत्या वेन आकृतीमध्ये दाखविले आहे ?

57 / 100

'प्रखर' या शब्दाचा विरुद्धार्थी असणारा शब्द?

58 / 100

'तुम्ही व्यर्थ भांडू नका' यातील व्यर्थ हा शब्द कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे?

59 / 100

खालील पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा शब्द असलेले पर्यायी उत्तर कोणते?

60 / 100

'पोलीसांनी चोराला पकडले' या वाक्यातील काळ ओळखा.

61 / 100

'मंडईत आज खुप आंबा आला' या वाक्यातील 'आंबा' या शब्दाचे वचन ओळखा.

62 / 100

भारताच्या गगनयान मोहिमेचे उद्दिष्ट काय ?

63 / 100

'त्याला कधी मारले जाईल, याचा नेम नाही' हा कोणता प्रयोग आहे?

64 / 100

२०२५ मध्ये कोणत्या देशाने Ai Safety Summit चे आयोजन केले ?

65 / 100

'अष्टभुजा' हा शब्द खालीलपैकी कोणती 'विभक्ती' आहे?

66 / 100

खालील पैकी बरोबर वाक्य निवडा:

67 / 100

२०२४ मध्ये BRICS मध्ये नवीन सदस्य देश म्हणुन खालीलपैकी कोणता देश सहभागी झाला ?

68 / 100

जर्मन सिल्व्हर हा मिश्र धातु खालीलपैकी कोणत्या धातूपासुन बनवतात ?

69 / 100

खालील पैकी कोणत्या दंततालव्याचे उदाहरण मराठीत आढळत नाही?

70 / 100

खालील पैकी अर्थहीन सहायक क्रियापद कोणते?

71 / 100

संगणकाच्या भाषेत C.P.U म्हणजे काय ?

72 / 100

'सूर्यास्त झाला' या वाक्यातून कोणत्या शब्दशक्तीचा अर्थ होतो?

73 / 100

लाहोर अधिवेशन' (१९२९) मध्ये काँग्रेसने कोणता ठराव मंजूर केला ?

74 / 100

'शिवाजी महाराज छत्रपती झाले' या वाक्यात 'छत्रपती' हा शब्द काय आहे?

75 / 100

'डिप्रेस्ड क्लासेस मिशन' ची स्थापना कोणत्या समाज सुधारकाने केली ?

76 / 100

खालील पैकी कोणते 'अकर्मक क्रियापद नाही' ते ओळखा.

77 / 100

लोकसभेत अविश्वासाचा ठराव मांडण्याकरीता किती सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे ?

78 / 100

खालील पैकी कोणती संधी योग्य आहे?

79 / 100

खालीलपैकी कोणत्या देशाने ICC T-20 क्रिकेट पुरुष विश्वचषक दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेळा जिंकलेला नाही ?

80 / 100

'वारिराशी' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?*

81 / 100

भूमध्य समुद्राला अटलांटिक महासागरासोबत जोडणाऱ्या सामुद्रधुनींचे नाव काय ?

82 / 100

खालील पैकी कोणते 'नाम साधित शब्दयोगी अव्यय' आहे?

83 / 100

महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते ?

84 / 100

जुलै २०२५ मध्ये युनेस्कोने महाराष्ट्रातील किल्ल्यांचा 'जागतिक वारसा यादीत' 'मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया' या नावाने समावेश केला आहे. खालीलपैकी कोणता किल्ला त्या यादीत नाही ?

85 / 100

'चोरभय' हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे?

86 / 100

धबधबा व तो कोणत्या जिल्ह्यात आहे याबाबत चुकीची जोडी ओळखा ?

87 / 100

महाराष्ट्रातील संतांचा योग्य कालानुक्रम कोणता ?

88 / 100

जगप्रसिद्ध वेरुळ लेणी ही कोणत्या राजघराण्याच्या कालखंडात तयार झाली ?

89 / 100

शब्द व लिंग यांच्या योग्य जोड्या ओळखा: अ) दगड-नपुसकलिंग ब) कोनाडा-पुल्लिंग क) मांजर-स्त्रीलिंग ड) माती-स्त्रीलिंग

90 / 100

मृदेतील कोणत्या घटक द्रव्यामुळे मृदेला काळा रंग प्रप्त होतो ?

91 / 100

'नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी।' हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?

92 / 100

इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवामधून स्त्रवणारे संप्रेरक आहे ?

93 / 100

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना २०२४' या योजनेत पात्र होण्याकरीता महिलांचा वयोगट किती आहे ?

94 / 100

खालीलपैकी मोलॅसिस बेसिन खालीलपैकी कोणत्या राज्यास म्हणतात ?

95 / 100

जागतिक जैविक इंधन (Bio Fuel) दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

96 / 100

श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी चुकीची जोडी ओळखा ?

97 / 100

पोलीस हा विषय कोणत्या सुचीत येतो ?

98 / 100

पंचायत समितीच्या उपसभापतींची निवड किती कार्यकाळासाठी होते ?

99 / 100

पोसायडन हे रशियाने विकसीत केलेले पाण्याखाली चालणारे ड्रोन हे कोणत्या ऊर्जेवर चालते ?

100 / 100

भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण ?

Your score is

The average score is 0%


  • 15 मार्च रोजी झालेला पुणे ग्रामीण पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Pune Gramin Police 2026 Question Paper Mock Test | Free Online Practice Test


  • 15 मार्च रोजी झालेला नागपूर लोहमार्ग पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Nagpur Lohmarg Police 2026 Question Paper Mock Test


  • 15 मार्च रोजी झालेला छ. संभाजीनगर लोहमार्ग पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Chatrapati Sambhajinagar Lohmarg Police 2026 Question Paper Mock Test


  • 15 मार्च रोजी झालेला अमरावती ग्रामीण पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Amaravati Gramin Police 2026 Question Paper Mock Test | | Free Online Practice Test


  • 15 मार्च रोजी झालेला नागपूर ग्रामीण पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Nagpur Gramin Police 2026 Question Paper Mock Test


  • 15 मार्च रोजी झालेला छ. सांभाजीनगर ग्रामीण पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट |Chhatrapati Sambhajinagar Gramin Police 2026 Question Paper Mock Test


  • 15 मार्च रोजी झालेला अहिल्यानगर शहर पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Ahilyanagar City Police 2026 Question Paper Mock Test


  • 15 मार्च रोजी झालेला जळगाव पोलिस भरती 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Jalgaon Police 2026 Question Paper Mock Test


  • अकोला पोलीस भरती २०२६ मध्ये झालेली संपूर्ण प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट| Akola Police bharti 2026 Complete Question Paper Test


  • पुणे शहर पोलीस २०२६ – संपूर्ण प्रश्नपत्रिका | Pune City Police 2026 Complete Question Paper Test


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page