वर्णमाला व त्याचे प्रकार | Alphabet and its Types


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

वर्णमाला

तोंडावाटे निघणार्‍या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. बोलतांना आपले मूलध्वनी हवेत विरू नयेत म्हणून आपण लिहून ठेवतो. ज्या सांकेतिक खुणांनी आपण मूलध्वनी लिहून ठेवतो त्या संकेतिक खुणेला ध्वनीचिन्हे किंवा अक्षर असे म्हणतात. अक्षर म्हणजे नष्ट न होणारे. मराठी भाषेत एकूण 48 वर्ण आहेत. या वर्णाच्या मालीकेलाच वर्णमाला किंवा मुळाक्षरे असे म्हणतात.

अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ, अं, अ: क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ

मराठीत एकूण 48 वर्ण आहेत.

  • स्वर
  • स्वरादी
  • व्यंजन

1. स्वर :

ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता होतो, त्या वर्णांना स्वर असे म्हणतात. वर्णामुळे स्वर हे पूर्ण उच्चाराची मानली जातात.

मराठी भाषेत अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ असे एकूण बारा स्वर आहेत.

वरील स्वरांचे एकूण तीन प्रकार पडतात.

  • र्‍हस्व स्वर,
  • दीर्घ स्वर,
  • संयुक्त स्वर

1. र्‍हस्व स्वर :

ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना र्‍हस्व स्वर असे म्हणतात.
  • उदा. अ, इ, ऋ, उ

2. दीर्घ स्वर :

ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात.
  • उदा. आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ

स्वरांचे इतर प्रकार :-

1. सजातीय स्वर :-

एकाच उच्चार स्थांनामधून जाणार्‍या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात.
  • उदा. अ-आ, उ-ऊ, ओ-औ, इ-ई, ए-ऐ

2. विजातीय स्वर :

भिन्न उच्चार स्थांनामधून उच्चारल्या जाणार्‍या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.
  • उदा. अ-ई, उ-ए, ओ-ऋ

3. संयुक्त स्वर :

दोन स्वर मिळून तयार होणार्‍या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात.

याचे 4 स्वर आहेत.

  •     अ+इ/ई
  •     आ+इ/ई
  •  अ+उ/ऊ
  •  आ+उ/ऊ

2. स्वरादी :

ज्याचा उच्चार करण्याआधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात.

स्वर + आदी स्वरादी

  • दोन स्वरादी अं, अः स्वरादी मध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो.
  • दोन नवे स्वरदी : ओ, औ हे नवे स्वरादी इंग्लिश भाषेतून आलेले आहेत.
  • उदा. बॅट, बॉल

स्वरादीचे एकूण तीन भाग पडतात.

  • अनुस्वार,
  • अनुनासिक,
  • विसर्ग

क. अनुस्वार

स्वरावर किंवा अक्षरावर मागाहून स्वार होणारा वर्ण किंवा स्वरानंतर होणारा उच्चार म्हणजे अनुस्वार होय. जेव्हा हा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो तेव्हा त्याला अनुस्वार असे म्हणतात.
  • उदा. गंगा, चंचल इत्यादी.

ख. अनुनासिक

जेव्हा अनुस्वाराचा उच्चार ओझरता होत असेल तेव्हा त्या उच्चाराला अनुनासिक असे म्हणतात.
  • उदा. घरात, जेंव्हा, फुफ्फुसांतील, यांतील, आंतील इत्यादी.

ग. विसर्ग

विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे असा होतो. विसर्गाचा उच्चार होत असतांना स्वराच्या उच्चारानंतर ह सारखा उच्चार होतांना हवेचे किंचित विसर्जन होते म्हणून यास विसर्ग असे म्हणतात. याचे चिन्ह लिहून दाखविताना अक्षराच्या पुढे दोन टिंब देतात.
  • उदा. स्वत:, दु:ख:, नि:स्पृह: इत्यादी.

3.व्यंजन :

एकूण व्यंजन 34 आहेत.

ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात.

व्यंजनाचे पाच प्रकारात वर्णन केले जाते.

  • स्पर्श व्यंजन (25)
  • अर्धस्वर व्यंजन (4)
  • उष्मा, घर्षक व्यंजन (3)
  • महाप्राण व्यंजन (1)
  • स्वतंत्र व्यंजन (1)

1. स्पर्श व्यंजन :

एकूण व्यंजन 25 आहेत.

वर्णमालिकेतील ते पर्यंतच्या वर्णाचा उच्चार होत असतांना तोंडातील जीभ, कंठ, टालू, मुर्धा, दात व ओठ इत्यादी अवयवांशी स्पर्श होतो यामुळे या वर्णाला स्पर्श व्यंजने असे म्हणतात.
  • उदा. क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, द, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म

स्पर्श व्यंजनाचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते.

  • कठोर वर्ण
  • मृदु वर्ण
  • अनुनासिक वर्ण

1. कठोर वर्ण

ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात.
  • उदा. क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ

2. मृद वर्ण

ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात.
  • उदा. ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब ,भ

3. अनुनासिक वर्ण

ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केल्या जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात.
  • उदा. ड, त्र, ण, न, म

इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment