20 जुलै 2022 चालू घडामोडी


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन

चालू घडामोडी (20 जुलै 2022)

सुटय़ा धान्यांवर ‘जीएसटी’ नाही :

  • तांदूळ, गहूसारखे धान्य, डाळी आणि दही, लस्सी आदी खाद्यपदार्थाच्या सुटय़ा विक्रीवर वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू नसल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी स्पष्ट केल़े,
  • जीवनावश्यक वस्तूंवर पाच टक्के ‘जीएसटी’ अंमलबजावणीचा निर्णय केंद्र सरकार आणि सर्व राज्यांच्या संमतीनेच घेण्यात आला असेही सीतारामन नमूद केल़े .
  • पंजाब, छत्तीसगड, राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळ या राज्यांनीही जीएसटी परिषदेच्या जूनअखेर झालेल्या बैठकीत 5 टक्के कर लागू करण्यास सहमती दर्शविली.
  • खाद्यपदार्थावर कर आकारला जाण्याची ही पहिलीच वेळ नसून जीएसटी लागू करण्याआधी राज्यांकडून मूल्यवर्धित कर (व्हॅट) आकारला जात होता, याकडेही सीतारामन यांनी ट्वीटद्वारे लक्ष वेधले.

विश्वचषक नेमबाजी स्पर्धात अनिष-रिदम जोडीला मिश्र गटात कांस्यपदक :

  • युवा नेमबाज अनिष भानवाला आणि रिदम सांगवान यांनी ‘आयएसएसएफ’ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेतील 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक गटात कांस्यपदक पटकावले.
  • भारताच्या या जोडीने चेक प्रजासत्ताकच्या अ‍ॅना डेडोव्हा आणि मार्टिन पोधरास्की जोडीला 16-12 अशा फरकाने नमवले.
  • या जोडीने विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील हे दुसरे पदक पटकावले.
  • यापूर्वी, त्यांनी मार्चमध्ये कैरो येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक गटात सुवर्णपदक जिंकले होते.
  • 25 मीटर रायफल मिश्र सांघिक गटात विजयवीर सिधू आणि सिमरनप्रीत कौर ब्रार यांना सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले.

आशियाई युवा वेटलिफ्टिंग स्पर्धात हर्षदाला सुवर्ण :

  • उदयोन्मुख भारतीय वेटलिफ्टिंगपटू महाराष्ट्राच्या हर्षदा गरुडने आशियाई युवा आणि कनिष्ठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत महिलांच्या 45 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.
  • 18 वर्षीय हर्षदाने 157 किलो वजन उचलले.
  • कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील 153 किलोच्या कामगिरीहून हर्षदाची कामगिरी ही चार किलोहून सरस राहिली.
  • युवा विभागातील 45 किलो वजनी गटात सौम्या दळवीने कांस्यपदक जिंकले.
  • आंतरखंडीय आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत स्नॅच तसेच क्लीन आणि जर्कसाठी वेगवेगळी पदके दिली जातात.
  • फक्त, ऑलिम्पिकमध्ये एकूण वजन उचलण्यासाठी पदक देण्यात येते.

दिनविशेष :

  • 20 जुलै हा ‘आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन‘ आहे.
  • 1828 या वर्षी मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.
  • बडोद्याचे महाराज सर सायाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने 1908 मध्ये बँक ऑफ बडोदा ची स्थापना झाली.
  • 1969 मध्ये नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिला मानव ठरले.

इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment