चालू घडामोडी (२४ मे २०२२)
भारतासह बारा देशांशी अमेरिकेचा नवा व्यापार करार :
- अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी भारत-प्रशांत महासागरीय प्रदेशातील 12 देशांची अर्थव्यवस्था बळकट व्हावी, यासाठी नवा व्यापार करार जाहीर केला.
- बायडेन यांच्या प्रशासनाने भारत-प्रशांत महासागरीय देशांसाठी हा नवा व्यापार करार तयार केला आहे.
- तर या करारात सहभागी सर्व देशांनी दिलेल्या संयुक्त निवेदनात नमूद केले आहे, की या कराराची आम्हा सर्व राष्ट्रांना नक्कीच भरीव मदत होणार आहे.
- पुरवठा साखळी, संगणकीय प्रणालींद्वारे व्यापार, प्रदूषणमुक्त ऊर्जा, कामगार सुरक्षा व भ्रष्टाचारमुक्त कार्यशैली आदी क्षेत्रांत प्रभावीपणे काम करता येईल.
- तसेच या करारात सहभागी राष्ट्रांशी अजून तपशीलवार वाटाघाटी व्हायच्या आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले.
- अमेरिकेबरोबर या नव्या व्यापारी करारात भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, इंडोनेशिया, जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, न्यूझिलंड, फिलिपीन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनामचा समावेश आहे.
- अमेरिकेसह या देशांचे जगभरातील उत्पादनापैकी 40 टक्के सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) आहे.
विनय कुमार सक्सेना बनणार दिल्लीचे नवे उप राज्यपाल :
- गेल्या आठवड्यात अनिल बैजल यांनी दिल्लीच्या उप राज्यपाल पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला घडतात.
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनिल बैजल यांचा राजीनामा स्वीकारला असून विनय कुमार सक्सेना यांची दिल्लीचे नवे उपराज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.
- विनयकुमार सक्सेना उपस्थित आहेत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (KVIC) अध्यक्ष आहेत.
- तसेच त्यांनी राजस्थानमधील जेके ग्रुपमध्ये सहाय्यक अधिकारी म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली.
- तर सलग अकरा वर्षे व्हाईट सिमेंट केंद्रात वेगवेगळ्या पदावर काम केल्यानंतर, 1995 मध्ये गुजरातमधील प्रस्तावित बंदर प्रकल्पाची देखरेख करण्यासाठी त्यांची जनरल मॅनेजर पदी नियुक्ती करण्यात आली होती.
- पुढे त्यांनी ढोलेर बंदर प्रकल्पाचे सीईओ आणि संचालक म्हणून काम केलं आहे.
दावोस आर्थिक परिषदेत 30 हजार कोटींचे करार :
- स्वित्झर्लंडमधील दावोस याठिकाणी पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत परदेशातील 23 कंपन्यांनी महाराष्ट्रासोबत सुमारे तीस हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत.
- यामुळे महाराष्ट्रात सुमारे 66 हजार जणांना रोजगार मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.
- तर झालेल्या विविध गुंतवणूक करारांमध्ये 55 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपान आदी देशांतील आहे.
- तसेच यामध्ये प्रामुख्याने औषध निर्माण, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, पॅकेजिंग, पेपर पल्प व अन्न प्रक्रिया, स्टील, माहिती तंत्रज्ञान, डेटा सेंटर, लॉजिस्टिक आदी क्षेत्रांचा समावेश आहे.
- दावोस येथील महाराष्ट्र लाउंजमध्ये झालेल्या सामंजस्य करारात एकूण 30 हजार 379 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
- राज्याची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 या उपक्रमाची संकल्पना मांडण्यात आली.
- तर या उपक्रमाअंतर्गत एकूण 10 पुनरावृत्ती आयोजित करण्यात आल्या असून त्यामाध्यमातून आजपर्यंत 121 सामंजस्य करार झाले आहेत.
चेसेबल मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धात प्रज्ञानंदचे उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के :
- भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने ग्रँडमास्टर विदित गुजराथीला हरवून चेसेबल मास्टर्स ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले.
- रविवारी झालेल्या 15व्या आणि अखेरच्या फेरीत प्रज्ञानंदने विजयानिशी विदितचे आव्हानसुद्धा संपुष्टात आणले.
- आता उपांत्यपूर्व फेरीत प्रज्ञानंदपुढे चीनच्या वेई यि याचे आव्हान असेल.
- तसेच 16 वर्षीय प्रज्ञानंदने सहाव्या फेरीत जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला हरवून सर्वाचे लक्ष वेधले होते.
- तीन महिन्यांपूर्वी प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावरील कार्लसनला प्रथमच हरवले होते.
आफ्रिकेविरुद्ध ट्वेन्टी-20 मालिकेसाठी राहुलकडे नेतृत्व :
- यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये लक्ष वेधणारा जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि पंजाबचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
- आफ्रिकेविरुद्ध 9 जूनपासून मायदेशात होणाऱ्या पाच ट्वेन्टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा रविवारी करण्यात आली.
- नियमित कर्णधार रोहित शर्मा, तारांकित फलंदाज विराट कोहली, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी या महत्त्वाच्या खेळाडूंना ट्वेन्टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
- त्यामुळे केएल राहुलकडे कर्णधारपद, तर ऋषभ पंतकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
दिनविशेष :
- तारायंत्राचे संशोधक सॅम्युअल मोर्स यांनी स्वत: विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश 1844 मध्ये 24 मध्ये वॉशिंग्टन येथून बाल्टिमोर येथे पाठवला.
- न्यूयॉर्क मधील ब्रूकलिन ब्रिज वाहतुकीस 1883 मध्ये 24 मध्ये खुला झाला.
- भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) विकसित केलेला इन्सॅट-3 बी हा उपग्रह 2000 मध्ये 24 रोजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.
- 2001 मध्ये 24 रोजी 18व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारा शेर्पा तेब्बा त्रेथी सर्वात लहान व्यक्ती