ठाणे ग्रामीण पोलीस भरती 29 मार्च 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट | Thane Rural Police Bharti Mock Test 2026

ठाणे ग्रामीण पोलीस भरती 29 मार्च 2026 प्रश्नपत्रिका टेस्ट

📝 ठाणे ग्रामीण पोलीस भरती १५ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका टेस्ट

ठाणे ग्रामीण पोलीस भरती १५ मार्च २०२६ रोजी झालेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारित ही टेस्ट खास तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये मागील प्रश्नपत्रिकेचा सखोल अभ्यास करून त्याच पॅटर्ननुसार प्रश्न दिले आहेत, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेची अचूक तयारी करता येईल.

पोलीस भरती परीक्षेमध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित एकूण 100 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या टेस्टमध्येही त्याच स्वरूपात प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.

🔍 या टेस्टची वैशिष्ट्ये:

✔ ठाणे ग्रामीण पोलीस भरती १५ मार्च २०२६ प्रश्नपत्रिका आधारित प्रश्न
✔ पूर्णपणे MCQ स्वरूपात सराव
✔ परीक्षा पॅटर्ननुसार 100 प्रश्नांचा समावेश
✔ वेळ व्यवस्थापन आणि अचूकता वाढवण्यासाठी उपयुक्त
✔ स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची टेस्ट

ही टेस्ट सोडवल्याने तुम्हाला प्रश्नांची पद्धत, अवघडपणा आणि वेळेचे नियोजन याची चांगली सवय लागेल. नियमित सराव केल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि परीक्षेत यश मिळवणे सोपे होईल.

👉 ठाणे ग्रामीण पोलीस भरती २०२६ ची तयारी मजबूत करण्यासाठी ही टेस्ट नक्की सोडवा!

1 / 100

खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते ?

2 / 100

'तो मुलगा धावतो' - या वाक्यातील 'तो' काय आहे ?

3 / 100

'पांढरा' या शब्दाचे भाववाचक नाम काय ?

4 / 100

'कवि' या शब्दाचे अनेकवचन काय होईल ?

5 / 100

जया' या शब्दाचा अर्थ काय ?

6 / 100

'अमृत' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

7 / 100

मराठी व्याकरणाबाबत काय खरे आहे ?

8 / 100

अरबी शब्दांचा योग्य गट ओळखा.

9 / 100

'दुप्पट' हा शब्द कोणत्या विशेषण प्रकारात येतो ?

10 / 100

'विद्यार्थी' या शब्दाची संधी सोडवा.

11 / 100

'मुलांनी खेळ खेळावा' - प्रयोग ओळखा.

12 / 100

शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा: 'पैकी, आतून

13 / 100

'यथेच्छ' या शब्दाचा विग्रह करा.

14 / 100

'पिकते तिथे विकत नाही' या म्हणीचा अर्थ काय ?

15 / 100

'उखळ पांढरे होणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

16 / 100

शुद्ध शब्द ओळखा.

17 / 100

समासाच्या जोड्या जुळवा: १) अभद्र २) सुखद ३) भाजी-भाकरी ४) ऋणमुक्त

18 / 100

"सांजवेळी आता उजाडले" - यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

19 / 100

"मी प्रत्यक्ष महात्माजींना पाहिले" - या वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा.

20 / 100

"चंद्राच्या जागी मुख आणि मुखाच्या जागी चंद्र आहे असा भ्रम झाला" - यात कोणता अलंकार आहे ?

21 / 100

योग्य शब्दसमूह निवडा: आंब्याची...

22 / 100

'क्षणभंगुर जीवनासाठी' खानदेशात कोणती म्हण वापरली जाते ?

23 / 100

'गतानुगतिक' या शब्दाचा योग्य अर्थ कोणता ?

24 / 100

'राजाचा शिक्का सांभाळणारा' या शब्दसमूहासाठी एक शब्द ओळखा.

25 / 100

'त्रिविष्टप' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

26 / 100

'होर्मुज सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) कोणत्या देशांच्या दरम्यान आहे? (चुकीचा देश ओळखा जो याला लागून नाही)

27 / 100

उत्तर ते दक्षिण असा शहरांचा योग्य क्रम लावा.

१) पुणे २) हैदराबाद ३) पणजी ४) बेंगलोर

28 / 100

नैसर्गिक आपत्ती आणि संबंधित विधाने पहा.

१) त्सुनामी ही समुद्रातील भूकंपामुळे येते.
२) 'एल निनो' (El Nino) चा भारतीय मान्सूनवर विपरीत परिणाम होतो.
३) भारताचा पश्चिम किनारा पूर्व किनाऱ्यापेक्षा चक्रीवादळांना अधिक बळी पडतो.

29 / 100

भारताच्या अंतराळ कार्यक्रमाबाबत काय सत्य आहे ?

१) ISRO ची स्थापना १९६९ मध्ये झाली.
२) भारताने २०१४ मध्ये मंगळयान यशस्वीपणे प्रक्षेपित केले.
३) 'गगनयान' हे भारताचे मानवी अंतराळ मोहीम आहे.

30 / 100

भारतातील पायाभूत सुविधांबाबत विधाने विचारात घ्या.

१) भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे जाळे आहे.
२) NHAI ही संस्था महामार्गांच्या विकासासाठी जबाबदार आहे.
३) 'भारतमाला' प्रकल्प बंदरांच्या विकासासाठी आहे.

31 / 100

खालीलपैकी कोणता प्रकार सायबर गुन्ह्यात मोडत नाही ?

32 / 100

बँकिंग क्षेत्राबाबत काय खरे आहे ?

१) RBI ची स्थापना १९३५ मध्ये झाली.
२) बँकांचे राष्ट्रीयीकरण १९६९ मध्ये झाले.
३) रेपो रेट RBI ठरवते.

33 / 100

कलेची जोडी आणि राज्य यांची चुकीची जोडी ओळखा.

34 / 100

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? (दिलेल्या पर्यायांपैकी)

35 / 100

भारत-चीन गलवान संघर्षाबाबत विधाने पहा.

१) हा संघर्ष २०२० मध्ये झाला.
२) ही जागा लडाखमध्ये आहे.
३) चीनने भारताच्या 'वन चायना' पॉलिसीला पाठिंबा दिला.

36 / 100

स्वातंत्र्य चळवळीतील घटना आणि वर्ष यांची अचूक जोडी ओळखा.

१) असहकार आंदोलन - १९२०
२) सविनय कायदेभंग - १९३०
३) छोडो भारत आंदोलन - १९४५

37 / 100

अंदमान आणि निकोबार बेटांबाबत काय सत्य आहे ?

१) बॅरन बेट हे भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे.
२) १० अंश वाहिनी (Ten Degree Channel) अंदमान आणि निकोबारला वेगळे करते.
३) इंदिरा पॉइंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे.

38 / 100

खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा चीनशी (LAC) लागून नाही ?

39 / 100

नदी आणि उगमस्थान यांची चुकीची जोडी ओळखा.

40 / 100

राष्ट्रीय उद्यान आणि राज्य यांची चुकीची जोडी ओळखा.

41 / 100

भारताच्या समुद्रकिनाऱ्याच्या लांबीनुसार राज्यांचा उतरता क्रम लावा.

42 / 100

राठा साम्राज्याबाबत चुकीचे विधान ओळखा.

१) तिसरी पानिपतची लढाई १७६१ मध्ये झाली.
२) साष्टी आणि वसईचा किल्ला चिमणीजी अप्पांनी पोर्तुगीजांकडून जिंकला.
३) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक १६७४ मध्ये झाला.

43 / 100

गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला ?

44 / 100

खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत ?

45 / 100

खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही (विधानसभा व विधानपरिषद) विधीमंडळ नाही ?

46 / 100

भारताच्या अणुधोरणाबाबत (Nuclear Policy) विधाने विचारात घ्या.

१) 'नो फर्स्ट युज' (आधी वापर नाही) हे भारताचे मुख्य धोरण आहे.
२) भारताने १९७४ आणि १९९८ मध्ये अणुचाचण्या केल्या.
३) भारताने NPT (अणुप्रसार बंदी करार) वर स्वाक्षरी केली आहे.

47 / 100

संसदीय कामकाजातील 'शून्य तास' (Zero Hour) बाबत काय खरे आहे ?

१) हा दुपारी १२ वाजता सुरू होतो.
२) यात पूर्वसूचना न देता महत्त्वाचे प्रश्न मांडता येतात.
३) हे भारतीय संविधानात स्पष्टपणे नमूद केले आहे.

48 / 100

भारतातील दर १० वर्षांनी होणाऱ्या जनगणनेची जबाबदारी कोणत्या कार्यालयाची असते?

49 / 100

संविधानातील घटनादुरुस्त्यांबाबत खालील विधाने विचारात घ्या.

१) ४४ व्या घटनादुरुस्तीने संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कातून वगळला.
२) ४२ व्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला.
३) ७३ व्या घटनादुरुस्तीने पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिला.

50 / 100

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ? ३, ५, ८, १३, २२, ?

51 / 100

रवीचा जन्म ५ मे १९९२, सोमवारी झाला... पहिल्या दहा वाढदिवसापर्यंत तो किती वेळा चित्रपट पाहू शकणार नाही ?

52 / 100

चिन्हांच्या अदलाबदलीनुसार खालीलपैकी कोणते समीकरण बरोबर आहे ?

53 / 100

a_cdd_bcd_abc_dab_

54 / 100

आदान: I have long awaited; पायरी V काढा.

55 / 100

A, B, C, D, E, F आणि G एका कुटुंबाचे सदस्य आहेत... तर C कोण आहे ?

56 / 100

कल्याणी ही वीणाची सासू असून, वीणा ही अशोकची वहिनी आहे... तर कल्याणीचे अशोकशी नाते काय ?

57 / 100

मंचावर राजकीय पक्षाचे प्रवक्ते बसले आहेत... तर कोण समन्वयक आहे ?

58 / 100

एका बसमधून काही व्यक्ती प्रवास करत आहेत... जर गटातील दोन व्यक्ती दोन भाषा बोलत असतील आणि एक व्यक्ती तीन भाषा बोलत असेल तर त्या बसमध्ये किती प्रवासी आहेत ?

59 / 100

एक घड्याळ प्रत्येक तासाला ५ सेकंद पुढे जाते. जर ते घड्याळ सोमवारी सकाळी ९ वाजता बरोबर लावले असेल, तर ते शनिवारी सकाळी ९.०० वाजता कोणती वेळ दाखवेल ?

60 / 100

वरील माहितीनुसार... खालीलपैकी कोण बुद्धिमान नाहीत.

61 / 100

चंद्र, आकाश, भूषण हे बुद्धीमान आहेत... तर, खालीलपैकी कोण खेळाडू नाहीत.

62 / 100

एका टोपलीत काही फळे आहेत, त्यापैकी ६ सोडून सर्व आंबे आहेत, ६ सोडून सर्व सफरचंद आहेत, ६ सोडून सर्व संत्री आहेत, तर त्या टोपलीत एकुण किती फळे आहेत ?

63 / 100

एका कार्यक्रमात १० व्यक्ती एकत्र आल्या. प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन केले, तर एकुण किती हस्तांदोलने होतील ?

64 / 100

'अ' चे वय 'ब' च्या वयापेक्षा तिप्पट आहे. चार वर्षापुर्वी 'क' चे वय 'अ' च्या तेव्हाच्या वयाच्या दुप्पट होते. चार वर्षानंतर 'अ' चे वय ३१ वर्षे असेल तर 'ब' चे व 'क' चे आजचे वय किती ?

65 / 100

मुलाच्या जन्माच्या वेळी सलमानचे वय ३२ वर्षे होते. आजच्या वयानंतर पाच वर्षांनी सलमानचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. तर सलमान व मुलगा यांची आजची अनुक्रमे वये किती

66 / 100

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ? (आकृतीमधील संख्या: १४, ५, १६... )

67 / 100

खाली दिलेल्या प्रश्नातील विसंगत घटक ओळखा.

68 / 100

खाली दिलेल्या संख्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. ५, ५४, ९०, ११५, १३१, १४०.....

69 / 100

खालील आकृतीमध्ये किती चौरस आहेत.

70 / 100

१७७० या संख्येला ३४ ने भागल्यास जो भागाकार (पुर्ण संख्येत) येईल त्यास त्याच्या उत्तरातील बाकीच्या पाचपटीने गुणाकार केल्यास काय उत्तर येईल ?

71 / 100

५८०१२६ या संख्येत ८ च्या स्थानिक किमती मधून २ ची स्थानिक किंमत वजा केल्यावर जो अंक येईल त्यात १८८१० मिळवल्यास त्यांच्या बेरजेनंतर जो अंक येईल त्यातील शतक स्थानातील अंक कोणता ?

72 / 100

सहा लोकांच्या संघामध्ये ४ क्रिकेटर आहेत, ४ फुटबॉलपटू आहेत. १ नायक आणि ३ संगीतकार... जर F हा नायक असेल तर खालीलपैकी कोणता खेळाडू हा बॅडमिंटनपटू आहे.

73 / 100

एका कार्यालयात ७२ टक्के कामगारांना थंड पेये आवडतात. ४४ टक्के कामगारांना चहा आवडतो आणि तिथल्या प्रत्येक कामगाराला चहा किंवा थंड पेय यापैकी एक गोष्ट आवडतेच व ४० कामगारांना दोन्ही चहा व थंड पेय आवडतात, तर त्या कार्यालयात किती कामगार आहेत.

74 / 100

एक व्यक्ती त्याच्या घरापासून दक्षिणेस ८ मीटर गेली. तेथून ६ मीटर पूर्वेस गेली. तेथून उत्तरेस ५ मीटर चालली. तेथून पुन्हा पुर्वेस ९ मीटर चालली. तेथून पुन्हा दक्षिणेस ५ मीटरवर जावून थांबली, तर त्या घरापासून ती किती अंतरावर आहे.

75 / 100

चौरसाचे क्षेत्रफळ १०० चौ.सेमी असल्यास त्यास आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती ?

76 / 100

एक व्यक्ती त्याच्या घरापासून दक्षिणेस ८ मीटर गेली. तेथून ६ मीटर पूर्वेस गेली. तेथून उत्तरेस ५ मीटर चालली. तेथून पुन्हा पुर्वेस ९ मीटर चालली. तेथून पुन्हा दक्षिणेस ५ मीटरवर जावून थांबली, तर त्या घरापासून ती किती अंतरावर आहे

77 / 100

चौरसाचे क्षेत्रफळ १०० चौ.सेमी असल्यास त्यास आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती ?

78 / 100

४ वाजून १० मि. या वेळेत तास काटा व मिनिट काटा यातील कोन किती ?

79 / 100

$(1.2)^{2}+(1.2)^{3}=?$

80 / 100

५००० रुपये कर्जाचे अडीच वर्षांनंतर ७७०० रुपये झाले, तर व्याजाचा दर किती ?

81 / 100

सहा बेल अनुक्रमे २, ४, ६, ८, १०, १२ सेकंदांच्या अंतराने वाजतात. ३० मिनिटांत त्या किती वेळा एकत्र वाजतील ?

82 / 100

संगीता व आईच्या वयाचे गुणोत्तर ३:११ आहे. वयातील फरक २४ वर्षे आहे. संगीताचे वय किती ?

83 / 100

जहाजाचा प्रवाहाच्या दिशेने वेग २० km/hr व विरुद्ध दिशेने १६ km/hr आहे. स्थिर पाण्यातील वेग किती ?

84 / 100

११.४० आणि १४.२० रुपये दराची ज्वारी कोणत्या प्रमाणात मिसळल्यास किंमत १२.६० रुपये होईल ?

85 / 100

आंबा व चिकूच्या झाडांचे प्रमाण २:३ आहे. ६ आंबा वाढले व ६ चिकू कमी झाले तर प्रमाण ४:५ होते. आंब्याची झाडे किती ?

86 / 100

एक गाडी तीन समान टप्पे अनुक्रमे २०, ३० व ४० km/hr वेगाने पार करते. सरासरी वेग किती ?

87 / 100

एक कार बीड ते औरंगाबाद १०० किमी/तास वेगाने जाते व ८० किमी/तास वेगाने परत येते. सरासरी वेग काढा.

88 / 100

एका रकमेचे २ वर्षांचे सरळव्याज १२० रुपये व चक्रवाढ व्याज १२६ रुपये आहे. तर व्याजाचा दर काय ?

89 / 100

दुकानदार ग्राहकाला सवलतीचे तीन पर्याय देतो. खालीलपैकी योग्य पर्याय कोणता ?

90 / 100

एका विद्यार्थ्यास परीक्षेत २०% गुण मिळाले व तो १० गुणांनी अनुत्तीर्ण झाला. दुसऱ्यास ४२% गुण मिळाले व तो १ गुण अधिक मिळवून उत्तीर्ण झाला. एकूण गुण किती ?

91 / 100

राहुलला ३०% गुण मिळाले, पण ३० गुणांनी नापास झाला. साहिलला ५०% गुण मिळाले व पास होण्यापेक्षा ४० गुण जास्त मिळाले. तर परीक्षा एकूण किती गुणांची होती ?

92 / 100

एका दुकानदाराने एका वस्तूची किंमत २५% ने वाढविली व त्यावर १५% सूट दिली. तर या व्यवहारात त्याला झालेला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती ?

93 / 100

आयताची लांबी १५% वाढवली, रुंदी १०% कमी केली. तर क्षेत्रफळात किती % बदल होईल ?

94 / 100

एखाद्या व्यक्तीचे वय सध्या मुलाच्या वयाच्या ४ पट आहे. ५ वर्षांनंतर ते ३ पट होईल. मुलाचे सध्याचे वय किती ?

95 / 100

एका शाळेत ६०% मुले, ४०% मुली आहेत. मुलांपैकी २०% व मुलींपैकी २५% खेळाडू आहेत. तर एकूण किती % खेळाडू आहेत ?

96 / 100

एका भांड्यात दूध आणि पाण्याचे प्रमाण ५:३ आहे. ८ लीटर पाणी टाकल्यास प्रमाण ५:५ होते. तर सुरुवातीला एकूण मिश्रण किती ?

97 / 100

अ, ब व क यांनी एकत्र काम केल्यास ते काम ६ दिवसांत पूर्ण होते. अ आणि ब एकत्र १० दिवसांत करतात. क एकट्याने किती दिवसांत करेल ?

98 / 100

एखाद्या दुकानात १५% सवलत दिल्यानंतरही २०% नफा मिळतो. MRP ₹४,०८० असल्यास खरेदी किंमत किती ?

99 / 100

A आणि B दोन ठिकाणांमधील अंतर १४० km आहे. राम A वरून ४० km/h आणि श्याम B वरून ३० km/h वेगाने एकमेकांकडे येतात. ते किती वेळात भेटतील ?

100 / 100

'अ' एक काम १२ दिवसांत आणि 'ब' १८ दिवसांत पूर्ण करतो. दोघे एकत्र काम केल्यास किती दिवसांत पूर्ण होईल?

Your score is

The average score is 32%


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page