शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार

शब्दयोगी अव्यय :-

वाक्यामधील जे शब्द स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतात आणि या दोन्ही शब्दामिळून तयार होणारा संयुक्त शब्द त्याच वाक्यामधील इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शवितो. या जोडून येणार्‍या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.

उदा.

  • सायंकाळी मुले घराकडे गेली.
  • शेतकरी दुपारी झाडाखाली विश्रांती घेत होता.
  • आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे.
  • गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवत होते.

शब्दयोगी अव्ययांची वैशिष्ट्ये :-

शब्दयोगी अव्यये मुख्यत: नामाला किंवा नामाचे कार्य करणार्‍या शब्दाला जोडून येतात. पण कधी कधी ते क्रियापदेक्रियाविशेषणे यांना सुद्धा जोडून येतात.
शब्दयोगी अव्यय ज्या शब्दांना जोडून येते तो त्या शब्दाचा त्याच वाक्यातील दुसर्‍या शब्दाशी संबंध दाखवते.
शब्दयोगी अव्ययामध्ये लिंग, वचन, विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही.
शब्दयोगी अव्यये शब्दाला जोडून येतांना त्याच्या मागील शब्दांचे सामान्य रूप होते.

शब्दयोगी अव्ययवाचे खालील प्रकार पडतात.

  • कालवाचक :- पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, पावेतो, गतिवाचक, आतून, खालून, मधून, पर्यंत, पासून.
  • स्थलवाचक :- आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठायी, पाशी, नजीक.
  • करणवाचक :- मुळे, योगे, करून, कडून, व्दारा, करवी, हाती
  • हेतुवाचक :- साठी, कारणे, करिता, अथा, प्रीत्यर्थ, निमित्त, स्तव
  • व्यक्तिरेखा :- वाचक शिवाय, खेरीज, विना, वाचून, व्यक्तिरिक्त, परता
  • तुलनावाचक :- पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस
  • योग्यतावाचक :- योग्य, सारखा, समान, सम, सयान, प्रमाणे, बरहुकूम
  • कैवल्यवाचक :- मात्र, ना, पण, फक्त, केवळ
  • संग्रहवाचक :- सुद्धा, देखील, ही, पण, बारीक, केवळ, फक्त
  • संबंधवाचक :- विषयी, विशी, विषयी
  • साहचर्यवाचक :- बरोबर, सह, संगे, सकट, सहित, रावे, निशी, समवेत
  • भागवाचक :- पैकी, पोटी, आतून
  • विनिमयवाचक :- बद्दल, ऐवजी, जागी, बदली
  • दिकवाचक :- प्रत, प्रति, कडे, लागी
  • विरोधावाचक :- विरुद्ध, वीण, उलटे, उलट
  • परिणामवाचक :- भर

हे पन वाचा :- संधी व त्याचे प्रकार


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment