चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 1 | Police Driver Mock Exam Practice Test 1

चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 1

📝 चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट

चालक पोलीस भरती २०२६ परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही संभाव्य पेपर टेस्ट खास तयार करण्यात आली आहे. चालक चिन्हे (Traffic Signs), वाहन नियम आणि रस्ते सुरक्षा या महत्त्वाच्या घटकांवर आधारित हा सराव पेपर परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे.

मागील प्रश्नपत्रिका, बदललेला परीक्षेचा पॅटर्न आणि अपेक्षित प्रश्नांचा सखोल अभ्यास करून हा संभाव्य पेपर तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे तुम्हाला खऱ्या परीक्षेचा अनुभव मिळेल.

या संभाव्य पेपरची वैशिष्ट्ये:

📌 परीक्षेत विचारले जाऊ शकणारे संभाव्य प्रश्न
📌 चालक चिन्हे (Traffic Signs) वर विशेष लक्ष
📌 वाहन नियम व रस्ते सुरक्षा विषयक प्रश्नांचा समावेश
📌 नवीन पोलीस भरती पॅटर्ननुसार प्रश्नरचना
📌 वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी उपयुक्त सराव
📌 आत्मविश्वास वाढवणारा पूर्ण पेपर अनुभव

🚔 ही संभाव्य टेस्ट का सोडवावी?

चालक पोलीस भरती परीक्षेमध्ये अचूक ज्ञानाबरोबरच योग्य सरावही तितकाच महत्त्वाचा आहे. ही संभाव्य पेपर टेस्ट सोडवून तुम्ही तुमची तयारी तपासू शकता, चुका ओळखू शकता आणि अंतिम परीक्षेसाठी स्वतःला अधिक तयार करू शकता.

💯 दररोज सराव करा, स्वतःला अपडेट ठेवा आणि यश निश्चित करा!

1 / 100

कोणत्या कलमाने वाहनाच्या बाहेरील भागावर बसून प्रवाशांची वाहतूक करू नये?

2 / 100

भार क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक करू नये यासाठी कोणते कलम आहे?

3 / 100

महाराष्ट्र मोटार वाहन नियम कलम.... मध्ये वाहन चालवित असताना मोबाइल फोनचा वापर करू नये?

4 / 100

........या कलमात मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या अपात्र असताना वाहन चालवू नये?

5 / 100

खाजगी वाहनांचा नोंदणी क्रमांक कसा रंगवायचा असतो?

6 / 100

जड वाहनांचे वजन.. पेक्षा जास्त असते?

7 / 100

खालील चिन्हाचा अर्थ सांगा?

8 / 100

कलम २९ काय दर्शविते?

9 / 100

चालक लायसन्सचे नूतनीकरण हे कोणत्या कलमामध्ये आहे?

10 / 100

खालील चिन्ह काय दर्शवित आहे?

11 / 100

अपघात घडल्यानंतर संबंधित माहिती २४ तासाच्या आत पोलिसांना कळविणे व अपघातग्रस्तांना मदत करणे हे कोणत्या कलमात सांगितले आहे?

12 / 100

खालीलपैकी कोणते कलम हे गणवेशधारी अधिकाऱ्याने थांबण्याचा इशारा दिल्यानंतर वाहन थांबविणे हे दर्शविते?

13 / 100

भारतात मोटार वाहतुकीचे नियमन करण्यासाठी मोटार वाहन अधिनियम प्रथम .... मध्ये अमलात आला?

14 / 100

कार्यानुसार वाहतूक नियंत्रण साधनाचे किती प्रकारात वर्गीकरण केले जाते?

15 / 100

मोटार वाहन कायदा कोणत्या साली पारित करण्यात आला?

16 / 100

मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत कलम १२९ अन्वये दुचाकीस्वाराने-

17 / 100

मिरवणुकीत सोबत चालणाऱ्या वाहनांकरिता कमाल वेगमर्यादा-

18 / 100

मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत कलम ११२ अन्वये-

19 / 100

थांबा रेषा याचा अर्थ काय?

20 / 100

शाळेजवळ वाहनांची कमाल वेगमर्यादा?

21 / 100

माझी आई माझ्या भावाच्या तिप्पट वयाची आहे. माझा भाऊ माझ्यापेक्षा ५ वर्षाने लहान आहे. पण माझी बहिण माझ्यापेक्षा १ वर्षाने मोठी आहे. जर माझ्या बहिणीचे वय २१ वर्षे असेल तर माझ्या आईचे वय किती?

22 / 100

सुनिताचे घर अनिताच्या घराच्या उत्तरेस २ किमी आहे. अनिताचे घर हे केशवच्या घराच्या पूर्वेस १ किमी अंतरावर आहे तर सुनिताचे घर केशवच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे?

23 / 100

१९९२ चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता, तर त्या वर्षीचा स्वातंत्र्यदिन कोणत्या दिवशी येईल?

24 / 100

तोंडाला डोके म्हटले, डोक्याला चेहरा म्हटले, चेहऱ्याला कान म्हटले, कानाला लगाम म्हटले, लगामाला हात म्हटले, हाताला काम म्हटले, तर कर्णफुले कशाला घालावेत? 

25 / 100

एका धावण्याच्या शर्यतीत अमरच्या पुढे ७ स्पर्धक होते. अशोक अमरच्या मागे ४ था होता. अशोकचा शेवटून ८ वा क्रमांक होता तर त्या शर्यतीत एकूण स्पर्धक किती?

स्पष्टीकरण- समीकरणे सोडवल्यास २० च्या ८० नोटा आणि ५० च्या ४० नोटा येतात

26 / 100

एका पिशवीमध्ये १२० नोटा असून त्यांची किंमत ३६०० रु. आहे. पिशवीमध्ये काही ५० रुपयांच्या व काही २० रुपयांच्या नोटा आहेत. तर २० रुपयांच्या नोटा किती?

27 / 100

६७९२ ही संख्या सांकेतीक भाषेत २९७६ अशी लिहली, तर ३५१८ ही संख्यासांकेतिक भाषेत कशी लिहाल?

28 / 100

एक वस्तु २००० रु. ना विकल्यामुळे २०% तोटा होतो तर ती वस्तु २८०० रु. ला विकली तर शेकडा नफा किती होईल?

29 / 100

गटात न बसणारा ओळखा.

30 / 100

रमेशने २% दलाली देऊन गणेशकडुन २,००,००० रुपयांना एक कार विकत घेतली तर त्याला ती कार एकुण किती रुपयांना मिळली?

31 / 100

बासरी, गिटार, वीणा, सितार, व्हायोलिन या गटातील विसंगत वाद्य कोणते?

32 / 100

जर ४ माणसे २० दिवसात ३६०० रु. कमावतात तर १० माणसे २० दिवसात किती रुपये कमावतील?

33 / 100

एका किल्ल्यावर १२०० सैनिकांना ६० दिवस अन्न पुरते. जर ३० दिवसानंतर ३०० सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आलेत तर अन्न किती दिवस पुरले?

34 / 100

खालील पर्यायांतील विसंगत पर्याय ओळखा.

35 / 100

एक हौद एका नळाने ६ तासात भरतो तर दुस-या नळाने ८ तासात रिकामा होतो. दोन्ही नळ एकदम सुरु केले तर हौद किती वेळात भरेल?

36 / 100

सुर्यापासुन अंतराच्या दृष्टीने खालील ग्रहांचा योग्य क्रम लावा. शुक्र, पृथ्वी, बुध, गुरू, मंगळ

37 / 100

एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने १५ किमी / तास वेगाने पोहतो. जर प्रवाहाचा वेग ३ किमी / तास असेल, तर त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुध्द दिशेने वेग किती?

38 / 100

तीन भावांच्या आजच्या वयांची बेरीज ४२ वर्ष आहे. १० वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर १ : २ : ३ : असे होते, तर सर्वात लहान भावाचे आजचे वय किती?

39 / 100

ZY : AB :: XW : ?

40 / 100

एका त्रिकोणाकृती मैदानावर काही झाडे लावली आहेत. पहिल्या रांगेत १ झाड, दुसऱ्या रांगेत २ झाडे, तिसऱ्या रांगेत ३ झाडे याप्रमाणे ३५ रांगात किती झाडे मावतील?

41 / 100

५,०,४,८,३ हे अंक घेऊन लहानात लहान संख्या तयार करा?

42 / 100

२१ मजुर ५६ बाहुल्या ८ दिवसात बनवितात तर ४२ बाहुल्या ३ दिवसात बनविण्यासाठी किती मजूर लागतील?

43 / 100

एक गाडी ५ लिटर पेट्रोलमध्ये ३५० किलोमीटर चालते तर ५६० किलो मीटर जाण्यासाठी किती लिटर पेट्रोल लागेल?

44 / 100

एका संख्येच्या ९ पट व १२ पट चा फरक ३० आहे तर ती संख्या कोणती?

45 / 100

३ वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या ७ पट होते, सध्या वडिलांचे वय मुलाच्या ५ पट आहे, तर वडिलांचे सध्याचे वय काय?

46 / 100

१३ मिटर ७ सेमी किती किलोमीटर?

47 / 100

एका रांगेत सुजाताचा क्रमांक खालून १९ वा व वरून १२ वा असल्यास रांगेत एकूण मुली किती?

48 / 100

प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

49 / 100

$(१०\times५)-(५\times१०)+(१०\times५)=?$

50 / 100

१० टक्के पगारवाढीनंतर सुरेखाचा पगार २२,००० रुपये झाला तर पगारवाढी पूर्वी सुरेखाचा पगार किती होता?

51 / 100

४ सेमी रुंदी व ६ सेमी लांबी असलेल्या आयताचे क्षेत्रफळ किती?

52 / 100

१६०० रुपये मुद्दलाचे तीन वर्षाचे सरळ व्याज ४८० रुपये होते, तर व्याजाचा दर किती असेल?

53 / 100

दहा दिवसांपुर्वी शुक्रवार होता उद्यानंतर तिस-या दिवशी कोणता वार असेल?

54 / 100

दोन क्रमवार संख्यांच्या वर्गातील फरक २७ आहे. तर त्यातील मोठी संख्या कोणती?

55 / 100

एका वर्गातील २४ विद्यार्थ्यांचे सरासरी वय १४ वर्षे आहे. त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळविल्यास सरासरी १५ वर्षे होते. तर शिक्षकाचे वय किती?

56 / 100

एका विक्रेत्याने एक सायकल २१६० रुपयांना विकली तेव्हा त्यास ८% नफा झाला, तर सायकलची खरेदी किंमत किती होती?

57 / 100

एक घड्याळ दर दोन तासाला ३० सेकंद मागे जाते. ते घड्याळ दुपारी ३.०० वाजता बरोबर लावले, तर ते दुसऱ्या दिवशी ३.०० वाजता किती वेळ दाखवेल? A)

58 / 100

आकाशला तीन बहिणी व तीन भाऊ आहेत. चैतालीला दोन बहिणी व तीन भाऊ आहेत. सौरभ चैतालीचा भाऊ आहे व आकाशची बहिण सरला आहे. तर सर्वात जास्त भाऊ कोणाला आहेत?

59 / 100

एक विद्यार्थी प्रश्नाचे उत्तर देताना तीन वेळा चुकतो व एक वेळा बरोबर उत्तर देतो. जर त्याला २४ प्रश्न विचारले तर किती वेळा त्याने बरोबर उत्तर दिले असेल?

60 / 100

रमेश पुर्वेकडे १५ कि.मी. गेला. डावीकडे वळून ५ कि.मी. गेला. पुन्हा डावीकडे वळून ८ कि.मी. गेला. पुन्हा एकदा डावीकडे वळून २९ कि.मी. गेला, तर मुळ जागेपासून तो किती अंतरावर असेल?

61 / 100

जागतिक वन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

62 / 100

महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती?

63 / 100

चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे?

64 / 100

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे?

65 / 100

भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता?

66 / 100

महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत?

67 / 100

सूर्यमालेतील सर्वांत तेजस्वी ग्रह कोणता?

68 / 100

सेंद्रिय शेती करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता?

69 / 100

आपल्या संविधानामध्ये 'धर्मनिरपेक्ष' हा शब्द किती वेळा आला आहे?

70 / 100

स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली?

71 / 100

रक्तातील हिमोग्लोबीन मध्ये...... हा खनिज पदार्थ असतो?

72 / 100

केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत?

73 / 100

भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे?

74 / 100

बीसीसीआय नमन पुरस्कार २०२६ मध्ये सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू कोण ठरली?

75 / 100

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

76 / 100

भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणते?

77 / 100

२०२६ मध्ये 'नाइटहूड' सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला?

78 / 100

स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो?

79 / 100

सतिश धवन अवकाश केंद्र श्रीहरीकोटा हे कोणत्या राज्यात आहे?

80 / 100

ऑस्कर पुरस्कार २०२६ मध्ये 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला?

81 / 100

गाणे म्हणून दाखव या वाक्याचा प्रकार शोधा?

82 / 100

पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते?

83 / 100

'देऊळ' या शब्दाचे सामान्यरूप कसे होईल?

84 / 100

खालीलपैकी कोणते वाक्य भूतकाळातील आहे?

85 / 100

वारा सुटला आणि पाऊस गेला या वाक्याचा प्रकार कोणता?

86 / 100

अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात?

87 / 100

'पाण उतारा करणे' वाक्प्रचाराचा अर्थ सांगा?

88 / 100

खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा?

89 / 100

प्रयोगाचे मुख्य प्रकार किती?

90 / 100

'तरुणी' शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?

91 / 100

'ज्याच्या हाती ससा, तो पारधी' यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत?

92 / 100

'कटक' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

93 / 100

खालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा.

94 / 100

खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा.

95 / 100

विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेल्या नामाच्या रूपाला काय म्हणतात?

96 / 100

मुंबईहून बाबांचे पत्र आले. 'मुंबईहून' या शब्दाची विभक्ती ओळखा?

97 / 100

विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी कोणते चिन्ह येते?

98 / 100

माझे गाव मला फार आवडते. 'गाव' या शब्दाचे लिंग ओळखा?

99 / 100

वरपिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होता. 'वरपिता' या शब्दाची जात ओळखा?

100 / 100

विसर्ग हा एक...... वर्ण आहे?

Your score is


  • 🚔 पोलिस भरती चालक चिन्हे PDF Download| Driver Traffic Signs PDF Download


  • चालक पोलीस भरती 2026 टेस्ट | चालक चिन्हे Mock Test


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 1 | Police Driver Mock Exam Practice Test 1


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 2 | Police Driver Mock Exam Practice Test 2 (Free Mock Test)


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 3 | Police Driver Mock Exam Practice Test 3 (Free Mock Test)


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 4 | Police Driver Mock Exam Practice Test 4 (Free Mock Test)


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 5 | Police Driver Mock Exam Practice Test 5 (Free Mock Test)


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 6 | Police Driver Mock Exam Practice Test 6 (Free Mock Test)


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 7 | Police Driver Mock Exam Practice Test 7 (Free Mock Test)


  • चालक पोलीस संभाव्य पेपर टेस्ट 8 | Police Driver Mock Exam Practice Test 8 (Free Mock Test)


इतरांना शेयर करा :-

मी उमेश गोरे, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे मॉक टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच परीक्षेच्या पॅटर्ननुसार सराव करून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

Leave a Comment

You cannot copy content of this page