KOTWAL MANDHAN 2023 | कोतवाल मानधन 2023 | KOTWAL GR 2023 | KOTWAL MANDHAN GR 2023 | कोतवाल GR डाउनलोड 2023
महाराष्ट्रातील १२,००० पेक्षा जास्त असलेल्या कोतवाल दादासाठी महाराष्ट्र सरकारने अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे. कोतवालांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कोतवालांच्या मानधन मध्ये दुपटीने वाढ करण्यात आले आहे. यापूर्वी कोतवालांना सरकारकडून किती मानधन मिळत होते व इथून पुढे आता कोतवालांना किती मानधन मिळणार आहे. आज आपण याच्या विषयी सविस्तर माहिती लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
कोतवालांच्या दादांच्या मानधनात ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ०७ एप्रि . २०२३ राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे . कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले .महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च २०२३ रोजी राज्याचा सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करत कोतवालांच्या मानधनवाढीबाबत केलेल्या घोषणेप्रमाणे कोतवालांच्या मानधनवाढीच्या सादर करताना केलेल्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने दिनांक १७ मार्च , २०२३ रोजीच्या बैठकीत मान्यता दिलेली आहे .
त्यानुसार चालू सेवा कालावधीनुसार कोतवालांना मिळत असलेले मानधन ७ हजार ५०० रुपयावरून १५ हजार करण्यात येणार आहे . राज्यातील सर्व १२ हजार ७ ९ ३ कोतवालांना यापुढे दरमहा सरसकट १५ हजार इतके मानधन लागू करण्यात आले आहे . १५ हजार रुपये इतके मानधन दि . ०१ एप्रिल २०२३ पासून अनुज्ञेय असणार आहे.असा GR प्रसिद्ध करण्यात आला आहे.
त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील कोतवालांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण तयार झालेले दिसून येत आहे. त्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा असा शासन निर्णय (GR) 6 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
GR डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा