चालू घडामोडी (२८ मे २०२२)
गीतांजली श्री यांच्या कादंबरीच्या अनुवादाला मानाचा पुरस्कार :
- भारतीय भाषिक कादंबरीच्या अनुवादाला आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळण्याचा ऐतिहासिक क्षण गुरुवारी हिंदी लेखिका गीतांजली श्री यांच्या पुस्तकामुळे लाभला.
- त्यांच्या ‘रेत समाधि’ या कादंबरीचा डेझी रॉकवेल यांनी केलेला ‘वाळूचे थडगे’ हा अनुवाद पुरस्कारासाठी निवडण्यात आला.
- आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असलेले समकालीन पोलिश, दक्षिण कोरियाई आणि जपानी साहित्यिकही या पुरस्काराच्या स्पर्धेत होते.
- समकालीन, आजच्या वगैरे परिस्थितीवर भाष्यबिष्य करण्याच्या फंदात अजिबात न पडता गोष्टीत रमवणारी अशी ही कादंबरी आहे.
- बुकर पुरस्काराच्या दीर्घ यादीत ‘टूम्ब ऑफ सॅण्ड’सह वेगवेगळय़ा 11 भाषांतून अनुवादीत 13 पुस्तकांचा समावेश होईल.
- हा पुरस्कार 50 हजार ब्रिटिश पौंड इतक्या रकमेचा असतो. तो मूळ लेखिका आणि अनुवादकामध्ये विभागून देण्यात येतो.
चेसेबल मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धात प्रज्ञानंदला उपविजेतेपद :
- भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदला झुंजार खेळानंतरही चेसेबल मास्टर्स ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
- अंतिम फेरीच्या दोन लढतींअंती असलेली बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी दोन डावांचा टायब्रेकर झाला आणि यात जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावरील डिंग लिरेनने प्रज्ञानंदला पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली.
- 16 वर्षीय प्रज्ञानंदने अंतिम फेरीतील पहिली लढत 1.5-2.5 अशा फरकाने गमावली होती.
उपकनिष्ठ राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धात महाराष्ट्राची आर्या सर्वोत्तम उदयोन्मुख बॉक्सिंगपटू :
- राष्ट्रीय उपकनिष्ठ बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या आर्या गर्देला सर्वोत्तम उदयोन्मुख बॉक्सिंगपटूचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
- तर या स्पर्धेत आर्या आणि समीक्षा सोलंकी यांनी आपापल्या वजनी गटाच्या अंतिम फेरीत 5-0 असा एकतर्फी विजय मिळवून सुवर्णपदक पटकावले आहे.
- पुण्याच्या आर्याने स्पर्धेच्या अंतिम दिवशी 36 किलो वजनी गटात गोव्याच्या सगुण शिंदेचा, तर समीक्षाने 40 किलो गटात उत्तर प्रदेशच्या साधनाचा सहज पराभव केला.
- कुमारी गटात हरयाणाने स्पर्धेत सात सुवर्णपदक पटकावली.
- तसेच स्पर्धेत मणिपूरच्या जयश्री देवी आणि सेनादलच्या आकाश बधवारला सर्वोत्तम बॉक्सिंगपटू पुरस्कार मिळाला.
दिनविशेष :
- क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 1883 मध्ये 28 रोजी झाला.
- फोक्सवॅगन (व्ही.डब्ल्यू) जर्मन ऑटोमोबाइल उत्पादक कंपनीची स्थापना 1937 मध्ये 28 मध्ये झाली.
- 1952 मध्ये 28 रोजी ग्रीसमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.
- 75 व्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुंबई महापालिकेतर्फे 1958 मध्ये 28 रोजी सत्कार करण्यात आला.
- पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) ची स्थापना 1964 मध्ये 28 रोजी झाली.