05 नोव्हेंबर 2021
1. आज केदारनाथ धाममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या प्रसिद्ध गुरूच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले ?
उत्तरः आदि शंकराचार्य.
2. BCCI ने भारतीय क्रिकेट संघाचा पुढील प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?
उत्तरः राहुल द्रविड.
3. पश्चिम बंगालच्या कोणत्या मंत्र्याचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले , त्यांचे नाव काय होते ?
उत्तरः सुब्रत मुखर्जी.
4. T20 विश्वचषकानंतर वेस्ट इंडिजच्या कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली ?
उत्तरः ड्वेन ब्राव्हो.
5. जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या भारतीय कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे ?
उत्तर: भारत बायोटेकची कोवॅक्सीन.
6. अयोध्येत एकाच वेळी किती दिवे लावल्याचा विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंदवला गेला आहे ?
उत्तरः ९,४१,५५१.
7. स्वित्झर्लंड आणि हंगेरीमध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
उत्तरः संजय भट्टाचार्य (स्वित्झर्लंड), पार्थ सत्पथी (हंगेरी).
8. उत्तर प्रदेश सरकारने मोफत रेशन योजना किती काळासाठी वाढवण्याची घोषणा केली आहे ?
उत्तरः मार्च २०२२.
9. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ( IOC ) ने पुढील तीन वर्षांत ई – वाहनांसाठी किती चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची घोषणा केली आहे ?
उत्तरः 10 हजार.
10. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ( DRDO ) आणि भारतीय हवाई दलाने संयुक्तपणे स्वदेशी बनावटीच्या कोणत्या शस्त्राच्या दोन यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत ?
उत्तरः स्मार्ट एअरफील्ड वेपन.
11. गो – फर्स्टच्या श्रीनगर ते शारजाह फ्लाइटला त्याच्या हवाई क्षेत्रातून जाण्यास कोणी नकार दिला ?
उत्तर : पाकिस्तान.
12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ?
उत्तरः १२,७२९ (२२१ मृत्यू).