चालू घडामोडी (15 जुलै 2022)
श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांचा राजीनामा :
- श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी गुरुवारी पदाचा राजीनामा दिला.
- राजपक्षे यांनी आपला राजीनामा ई-मेलद्वारे श्रीलंका प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षांना पाठवला आहे.
- राजपक्षे यांनी बुधवारी देश सोडला आणि ते मालदीवला गेले.
- तर त्यांनी देश सोडल्यानंतर काही तासांत पंतप्रधान रानील विक्रमसिंघे हे कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
देशात आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण :
- गुरुवारी केरळमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णाची नोंद झाली आहे.
- मंकीपॉक्सचा हा देशातील पहिला रुग्ण आहे.
- संक्रमित व्यक्ती ही तीन दिवसांपूर्वीच युएईतून भारतात दाखल झाल्याची माहिती आहे.
- तसेच त्याच्या संपर्कात 11 जण आल्याचेदेखील पुढे आले आहे.
- तर या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सचे लक्षणे आढळून आल्याने त्याचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये तपासासाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणाची नोंद करण्यात आली.
- मंकीपॉक्स हा विषाणूजन्य रोग आहे. त्याची लक्षणे स्मॉलपॉक्ससारखीच असतात.
- तर हा रोग 1958 मध्ये संशोधनासाठी वापरण्यात येणाऱ्या माकडांमध्ये आढळला होता. त्यामुळे त्याचे मंकीपॉक्स, असे नाव पडले.
- हा विषाणू हवेतून पसरत नाही. हा माणसाकडून माणसाला किंवा जनावरांकडून माणसाला स्पर्श झाल्याने पसरतो. पुरळ येणे, ताप येणे ही या आजाराची लक्षणं आहेत.
विश्वचषक नेमबाजी स्पर्धात भारत अव्वल :
- नेमबाजांच्या चमकदार कामगिरीच्या बळावर भारताने ‘ISSF’ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेच्या पदकतालिकेत अग्रस्थान मिळवले.
- भारताने तीन सुवर्ण, चार रौप्य आणि एका कांस्यपदकासह एकूण आठ पदकांची कमाई केली.
- यामध्ये महाराष्ट्राच्या शाहूने सांघिक गटांमध्ये दोन सुवर्णपदके पटकावत आपली छाप पाडली.
- भारताच्या अर्जुन बबुता, शाहू माने आणि पार्थ मखिजा या त्रिकुटाने 10 मीटर एअर रायफल सांघिक गटात कोरियाला 17-15 असे पराभूत करत देशासाठी तिसरे सुवर्णपदक जिंकले.
- अर्जुन आणि शाहूचे या स्पर्धेतील हे दुसरे पदक ठरले.
- पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात भारताने इटलीकडून १५-१७ असा पराभव पत्करल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
- दिवसाचे तिसरे रौप्यपदक भारताने 10 मीटर एअर पिस्तूल महिला सांघिक गटात मिळवले.
दिनविशेष :
- 15 जुलै 1955 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न सन्मान जाहीर.
- ज्ञानप्रबोधिनी संस्थेचा 15 जुलै 1962 मध्ये पुणे येथे प्रारंभ.
- 15 जुलै 2006 मध्ये ट्विटर हा सर्वात मोठा सोशिअल प्लॅटफॉर्म सुरु झाला.