11 July 2022 Current Affairs In Marathi | 11 जुलै 2022 चालू घडामोडी


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

जागतिक लोकसंख्या दिन
जागतिक लोकसंख्या दिन

चालू घडामोडी (11 जुलै 2022)

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे राजीनामा देणार :

  • आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत भीषण परिस्थिती ओढावली आहे.
  • श्रीलंका गेल्या अनेक महिन्यांपासून आर्थिक संकटातून जात आहे. देशात इंधन आणि खाद्यपदार्थांसोबतच दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचीही तीव्र टंचाई निर्माण झाली होती.
  • तर या परिस्थितीला श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे जबाबदार असल्याचा आरोप नागरीकांकडून करण्यात येत आहे.
  • त्यामुळे गोटाबाया यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.
  • श्रीलंका देशात सध्याची अराजकता लक्षात घेता येथील पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी राजीनाम्याची घोषणा केली.
  • श्रीलंकेतील चिघळत चाललेली परिस्थिती पाहता गोटाबाया राजपक्षे 13 जुलै रोजी आपल्या राष्ट्रपती पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
  • सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असे विक्रमसिंघे यांनी सांगितले आहे.

नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे पंतप्रधानांचे आवाहन :

  • गुजरातमधील सुरत येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे नैसर्गिक शेतीवरील एका परिषदेस संबोधित करताना पंतप्रधानांनी ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेच्या अभूतपूर्व यशाचा उल्लेख केला.
  • गावांमध्ये असा बदल-सुधारणा करणे अशक्य आहे, असा आक्षेप घेणाऱ्यांना या मोहिमेच्या यशाने योग्य उत्तर मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
  • मातीची गुणवत्ता आणि उत्पादकता जपून नैसर्गिक शेतीचा अवलंब करणे हे धरणीमातेची सेवा करण्यासारखेच आहे, असे सांगून सुरतमध्ये या दिशेने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करताना मोदी म्हणाले, की सुरतमधून उदयास आलेले नैसर्गिक शेतीचे प्रारूप संपूर्ण देशासाठी आदर्श ठरू शकते.
  • देशातील जनतेने कोणतेही उद्दिष्ट साध्य करण्याचा संकल्प केला, तर कोणताही अडथळा त्यांच्या मार्गात येऊ शकत नाही.
  • पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा तुम्ही नैसर्गिक शेतीचा अवलंब करता तेव्हा मातीची गुणवत्ता आणि तिच्या उत्पादनक्षमतेचे रक्षण करतो
  • रसायनांच्या वापरामुळे होणाऱ्या घातक आजारांपासून नैसर्गिक कृषी उत्पादनेच माणसाला वाचवतील, असे सांगून मोदींनी परंपरागत कृषी विकास योजनेसारख्या योजनांसह नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांचीही माहिती दिली.
  • तर योजनेंतर्गत देशभरात तीस हजार गट तयार केले आहेत.

जागतिक क्रीडा स्पर्धात तिरंदाजीत अभिषेक-ज्योती जोडीला कांस्यपदक :

  • अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा वेन्नम या भारतीय जोडीने रविवारी जागतिक क्रीडा स्पर्धेतील मिश्र कंपाऊंड तिरंदाजीत कांस्यपदक पटकावले.
  • तर त्यांनी प्रतिस्पर्धी मेक्सिकोवर एका गुणाने निसटता विजय मिळवला.
  • अभिषेक-ज्योती जोडीने पहिल्या फेरीत अचूक वेध साधताना दहा गुणांची कमाई करण्याची दमदार कामगिरी केली,
  • तसेच भारतीय जोडीने अखेरच्या फेरीतही दमदार खेळ सुरू ठेवताना १५७-१५६ अशा फरकाने विजय मिळवत कांस्यपदक आपल्या नावे केले.
  • भारतीय तिरंदाजी संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, जागतिक क्रीडा स्पर्धेत भारताचे हे पहिले पदक असून अभिषेकचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील हे 50वे पदक आहे.
  • कंपाऊंड तिरंदाजीमध्ये सर्वच स्पर्धात पदक जिंकणारा अभिषेक हा एकमेव भारतीय तिरंदाज आहे.

विश्वचषक नेमबाजी स्पर्धात पार्थ, अर्जुन अंतिम फेरीत :

  • भारतीय नेमबाज पार्थ मखिजा आणि अर्जुन बबुता यांनी दक्षिण कोरियातील चँगवॉन येथे सुरू असलेल्या ‘ISSF’ विश्वचषक स्पर्धेतील पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकाराच्या अंतिम फेरीत धडक मारली.
  • तर या दोन्ही भारतीय नेमबाजांनी पात्रता फेरीत उत्तम कामगिरी केली.
  • अर्जुनने 630.5 गुणांसह दुसरे स्थान पटकावत अंतिम फेरी गाठली, तर पार्थने 628.4 गुणांसह पाचव्या स्थान मिळवले आणि अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले.
  • पात्रता फेरीत इस्त्राईलचा सर्ज रिक्टर हे आघाडीवर आहेत मिळवले.

भारत-इंग्लंड ट्वेन्टी-20 मालिकेत भारतीय संघाचा पराभव :

  • सूर्यकुमार यादवच्या दिमाखदार शतकानंतरही भारतीय संघाला रविवारी तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून 17 धावांनी पराभव पत्करावा लागला.
  • मात्र, पहिल्या दोन सामन्यांत विजय मिळवल्याने पाहुण्या भारताने या मालिकेत 2-1 अशी सरशी साधली.
  • दरम्यान सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिले शतक साजरे केले. त्याने शतकी खेळीत 14 चौकार आणि सहा षटकार लगावले.
  • मात्र, इतर फलंदाजांची त्याला फारशी साथ न लाभल्याने भारताला 20 षटकांत 9 बाद 198 धावाच करत आहे.

दिनविशेष :

  • 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो.
  • प्राच्यविद्या संशोधक परशुराम कृष्णा गोडे यांचा जन्म 11 जुलै 1891 मध्ये झाला.
  • १८९३ मध्ये कोकिची मिकीमोटो यांनी पहिला कल्चर्ड मोती मिळवला.
  • 11 जुलै सन 1950 मध्ये पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा (IMF) सदस्य बनला.
  • केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा जन्म 11 जुलै 1953 मध्ये झाला.
  • चिलितील तांब्याच्या खाणींचे १९७१ मध्ये राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment