चालू घडामोडी (३० मे २०२२)
पुष्पा हेगडे यांची आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड :
- आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या (इंटरनॅशनल कौन्सिल फॉर वूमन-आयसीडब्ल्यू) उपाध्यक्षपदी पुण्यातील पुष्पा हेगडे यांची निवड झाली आहे.
- हेगडे या सर्वाधिक मतांसह संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेल्या पहिल्या व्यक्ती आहेत.
- तर गेल्या 25 वर्षांपासून संघटनेत कार्यरत असून यापूर्वी त्यांनी सल्लागार, समन्वयक, एशिया पॅसिफिक विभागाचे अध्यक्षपद भूषविले आहे.
- तसेच आयसीडब्ल्यू ही 130 वर्षे जुनी संघटना असून, ती 67 देशांशी संलग्न आहे.
- संघटनेचे मुख्यालय पॅरिस येथे असून, आरोग्य, जनकल्याण, शांतता, समानता, शिक्षण, पर्यावरण, स्थलांतर, हिंसाचार, भेदभाव, तस्करी, गरिबी, महिला, मुले, निर्वासित आणि अल्पसंख्याक नागरिकांचे अधिकार या मुद्द्यांवर ही संघटना संयुक्त राष्ट्रसंघासमवेत काम करते.
‘ऑल दॅट ब्रिद्स’ कान महोत्सवात सर्वोत्कृष्ट :
- दिग्दर्शक शौनक सेन यांच्या ‘ऑल दॅट ब्रिद्स’ या माहितीपटाने ‘सनडान्स’ चित्रपट महोत्सवामध्ये ‘ग्रॅन्ड ज्युरी’ पुरस्कार पटकावला होता.
- तर आता या कलाकृतीने 75 व्या कान चित्रपट महोत्सवात शनिवारी सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या पुरस्कारावर नाव कोरून सर्वाचे लक्ष वेधले आहे.
- तसेच या पुरस्काराच्या निवड मंडळावरील सदस्यांनी म्हटले आहे की, सध्याच्या विनाशकारी जगात प्रत्येक जीव आणि प्रत्येक लहान कृती महत्त्वाची आहेयाचे स्मरण करून देणारा हा माहितीपट आहे.
- ‘ऑल दॅट ब्रिद्स’या 90 मिनिटांच्या माहितीपटात दिल्लीतील वायुप्रदूषणाकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सच्या भरती प्रक्रियेची नवीन प्रणाली :
- टूर ऑफ ड्यूटी अग्निपथ योजनेअंतर्गत, लष्कर, नौदल आणि हवाई दल या तीन सेवांमध्ये भरतीच्या नवीन प्रणालीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
- तर या अंतर्गत भरती झालेल्या 100 टक्के सैनिकांना चार वर्षांनी सेवेतून मुक्त केले जाईल आणि त्यानंतर 25 टक्के सैनिकांना पूर्ण सेवेसाठी पुन्हा भरती केले जाईल.
- टूर ऑफ ड्यूटीच्या अंतिम स्वरूपावर बरीच चर्चा झाली असून काही नवीन सूचना प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती उच्च पदस्थ सूत्रांनी दिली आहे.
- तसेच प्रशिक्षणासह तीन वर्षांच्या सेवेनंतर काही टक्के सैनिक निवृत्त केले जातील.
- तर काहींना पाच वर्षांच्या कंत्राटी सेवेनंतर काढून टाकले जाईल. पूर्ण मुदतीसाठी केवळ 25 टक्के सैनिकांना ठेवले जाईल, असा सुरुवातीला प्रस्ताव होता.
- नव्या प्रस्तावात काही बदल करण्यात आले आहेत. चार वर्षांच्या सेवेनंतर सर्वजण निवृत्त होतील. मात्र, 25 टक्के सैनिकांना निवृत्तीनंतर 30 दिवसांच्या आत परत बोलावण्यात येईल.
पॅरा-नौकानयन विश्वचषक स्पर्धात भारताच्या प्राचीला ऐतिहासिक कांस्य :
- भारताच्या प्राची यादवने पोलंडमधील पोन्झनान येथे झालेल्या पॅरा-नौकानयन विश्वचषक स्पर्धेतील महिलांच्या व्हीएल 2 प्रकारातील 200 मीटर शर्यतीत ऐतिहासिक कांस्यपदकाची कमाई केली.
- तर ही कामगिरी करणारी ती भारताची पहिली पॅरा-नौकानयनपटू ठरली.
- प्राचीने व्हीएल 2 प्रकारातील 200 मीटर शर्यतीत 1 मिनिट आणि 04.71 सेकंद अशी वेळ नोंदवत कांस्यपदक मिळवले.
- ऑस्ट्रेलियाची सुझान सिपेल आणि कॅनडाची ब्रियाना हेनेसी यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक आपल्या नावे केले.
बीसीसीआयच्या नावे अनोख्या विक्रमाची नोंद :
- जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर बीसीसीआयने सर्वात मोठ्या क्रिकेट जर्सीचे अनावरण केले आहे.
- यामुळे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये बीसीसीआयच्या नावे विक्रमाची नोंद झाली आहे.
- पांढऱ्या रंगाच्या या जर्सीवर आयपीएलमधील 10 संघांच्या लोगोसह आयपीएलचा 15 वर्षांचा प्रवासही कोरण्यात आला आहे.
- तर या सर्वात मोठ्या जर्सीची लांबी 66 मीटर तर रुंदी 42 मीटर इतकी आहे.
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह आणि आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी समारोप समारंभात ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’च्या अधिकाऱ्याकडून विक्रमाचे प्रमाणपत्र स्वीकारले.
राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर ठरला ऑरेंज कॅपचा मानकरी :
- इंडियन प्रीमियर लीग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या 15व्या हंगामातील अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव करून इतिहास रचला.
- आपल्या पहिल्याच हंगामात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा सात गडी राखून पराभव करत आयपीएलचे विजेतेपद पटकावले.
- राजस्थान रॉयल्सला अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला असला तरी ऑरेंज आणि पर्पल कॅप दोन्हीही राजस्थानच्या संघातील खेळाडूंना मिळाल्या आहेत.
- फलंदाजीमध्ये joss butlerne सातत्यापूर्ण खेळी करत सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळवला तर गोलंदाजीमध्ये युझवेंद्र चहलच्या फिरकीची जादू चालली.
- तर यावर्षीच्या आयपीएल हंगामामध्ये सर्वाधिक 27 बळी घेऊन चहलने इतिहास रचला आहे.
दिनविशेष :
- इतिहासकार डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचा जन्म 1894 मध्ये 30 मध्ये झाला.
- अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार दीनानाथ दलाल यांचा जन्म 1916 मध्ये 30 रोजी झाला.
- मुंबई नभोवाणी केंद्राची सुरुवात 1934 मध्ये 30 मध्ये झाली.
- 1987 मध्ये 30 रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.
- पु.ल. देशपांडे यांना 1993 मध्ये 30 रोजी ‘त्रिदल’ संस्थेच्या वतीने पुण्यभूषण पुरस्कार प्रदान झाला.