27 जानेवारी | Current Affairs In Marathi
- ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राला कोणत्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे?
उत्तर: पद्मश्री आणि विशिष्ट सेवा पदक.
- लार्ज स्केल इंडस्ट्री श्रेणीमध्ये ग्लोबल हेल्दी वर्कप्लेस अवॉर्ड 2021 जिंकणारी पहिली भारतीय PSU कोणती कंपनी बनली आहे?
उत्तर: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड.
- केंद्र सरकारने उत्तरी सैन्याचा नवीन कमांडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर: लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी.
- हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) चे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : पुष्पकुमार जोशी.
- हिंदी भाषिक लोकांची सर्वोच्च संस्था असलेल्या उत्तर भारतीय संघाच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : संतोष सिंग.
- भ्रष्टाचारावर नजर ठेवणाऱ्या ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार, 180 देशांमध्ये भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारताचा क्रमांक किती आहे?
उत्तर: ८५ वा.
- पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या कोणत्या प्रसिद्ध कथकली नृत्यांगनाचे निधन झाले?
उत्तर: मिलिना साल्विनी.
- जागतिक बँकेने कोणत्या राज्यासाठी 1000 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे?
उत्तर : पश्चिम बंगाल.
- आंध्र प्रदेश सरकारने राज्यात किती नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीला मान्यता दिली आहे, आता राज्यातील जिल्ह्यांची संख्या 26 झाली आहे?
उत्तर: 13 जिल्हे.
- कोलकाता येथील नवीन इस्टर्न आर्मी कमांडचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर: लेफ्टनंट जनरल आरपी कलिता.
- ICC ने जाहीर केलेल्या ताज्या T20 क्रमवारीत कोणती महिला क्रिकेटपटू पहिल्या स्थानावर पोहोचली आहे?
उत्तरः शेफाली वर्मा.
- गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत?
उत्तरः २,८५,९१४ (५७३ मृत्यू).