चालू घडामोडी (26 जुलै 2022)
आता मतदार ओळखपत्र होणार आधार कार्डशी लिंक :
- आता राज्यात मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्यात येणार आहे.
- 1 ऑगस्टपासून यासंबंधी मोहिम राबवण्यात येणार आहे.
- महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी याबाबत माहिती दिली.
- मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक केल्यामुळे एकाच व्यक्तीने जर आपले नाव एकापेक्षा जास्त मतदारसंघात जास्त वेळा नोंदवल्यास ते शोधून काढणे सोपे होणार आहे.
- भारत निवडणूक आयोगाच्या अध्यक्षतेखाली या मोहीमेस सुरुवात होणार आहे.
- आधार कार्डची माहिती आयडेंटिटी कार्डच्या माहितीशी लिंक केल्याने मतदारांची खासगी माहिती वैधानिक प्राधिकरणाला उपलब्ध होईल.
- त्यानंतर मतदारांवर मर्यादा येतील. म्हणजेच, मतदारांना आता त्यांचे संबंधित आधार तपशील सादर करून निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांसमोर आपली ओळख प्रस्तापित करावी लागेल.
एटीएममधून पैसे काढण्याच्या पद्धतीत नवा बदल :
- स्टेट बँक ऑफ इंडियाने आता एटीएममधून पैसे काढण्याच्या पद्धतीत बदल केला आहे.
- एसबीआयने एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता ओटीपी सेवा सुरू केली आहे.
- बँकेने आपल्या ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी हा मोठा बदल केला आहे.
- हे बदल लवकरच एसबीआयच्या सर्व एटीएमवर लागू होणार आहे.
- एसबीआयच्या ग्राहकांना आता बॅंकेचे व्यवहार करताना तसेच एटीएममधून पैसे काढताना ओटीपी शेअर करावा लागेल, हा ओटीपी चार अंकी असणार आहे.
- त्यामुळे बॅंकेत नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक तुम्हाला एटीएममधून पैसे काढताना सोबत ठेवावा लागेल.
- फसवणुकीच्या वाढत्या घटनेच्या पार्श्वभूमीवर एसबीआयने नियमांमध्ये बदल केला आहे.
- एकाच वेळी 10 हजार किंवा त्यापेक्षा अधिक पैसे काढणाऱ्या ग्राहकांना आता ओटीपी देणे बंधनकारक असेल, असेही एसबीआयच्यावतीने सांगण्यात आले आहे.
वकिलांना काळय़ा कोटाची सक्तीच :
- उन्हाळय़ात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात वकिलांना काळा कोट आणि काळा ‘गाऊन’ घालण्यापासून सवलत मिळावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला.
- न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्या. व्ही रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने म्हटले, की ते पेन 32 अंतर्गत ही याचिका स्वीकारू शकत नाही आणि याचिकाकर्त्यांला त्याच्या तक्रारीसह भारतीय विधिज्ञ परिषदेकडे (बार कौन्सिल ऑफ इंडिया, बीसीआय) जाण्यास सांगितले.
- सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्ते वकील शैलेंद्र मणी त्रिपाठी यांना सांगितले, की जर ‘बीसीआय’ने त्यांच्या याचिकेवर कारवाई केली नाही तर ते पुन्हा सर्वोच्च न्यायालयात येऊ शकतात.
- त्यानुसार याचिकाकर्त्यांने याचिका मागे घेतली आणि त्यानुसार खटला निकाली काढण्यात आला.
- वकिलांचा पोशाख ‘ड्रेस कोड अॅडव्होकेट्स अॅक्ट, 1961’ अंतर्गत ‘बीसीआय’च्या नियमांनुसार निश्चित केला गेला आहे.
- त्यानुसार वकिलास पांढरा पोशाख आणि पांढऱ्या गळापट्टीसह (नेकबँड) काळा कोट घालणे बंधनकारक आहे.
- नियमानुसार, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचा अपवाद वगळता वकिलांना इतर न्यायालयात ‘गाऊन’ घालणे ऐच्छिक आहे.
दिनविशेष :
- 1509 मध्ये ‘सम्राट कृष्णदेवराय’ यांनी विजयनगर साम्राज्याच्या पुनरुत्पादन सुरुवात केली.
- कवी समाजसेवक ‘वासुदेव गोविंद मायदेव’ यांचा जन्म 26 जुलै 1894 मध्ये झाला.
- 26 जुलै 1999 मध्ये भारताचा कारगिल युद्धात विजय झाला. तेव्हा पासून हा दिवस ‘कारगिल विजय दिन’ म्हणूनच तो साजरा केला जातो.