23 जुलै 2022 चालू घडामोडी


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

नीरज चोप्रा

नीरज चोप्रा

चालू घडामोडी (23 जुलै 2022)

13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवा :

  • केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा मोहिमेच्या बळकटीकरणासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
  • तर या मोहिमेमुळे राष्ट्रध्वजाशी आपला संबंध अधिक दृढ होईल, असे म्हणत मोदींनी ट्वीट केले आहे.
  • तसेच या वर्षी आपण ‘आझादी का अमृत’ उत्सव साजरा करत असताना ‘हर घर तिरंगा’ चळवळीला बळ देऊया.
  • 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवा. या मोहिमेमुळे राष्ट्रध्वजाशी आपला संबंध अधिक दृढ होईल.
  • भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ मोहीमेची योजना आखली आहे.
  • तर या अंतर्गत सुमारे 20 कोटी घरांमध्ये तिरंगा फडकवला जाईल, असा दावा भाजपाने केला आहे.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धात नीरज प्रथमच अंतिम फेरीत :

  • ऑलिम्पिक विजेत्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर अंतरावर भालाफेक करून प्रथमच जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
  • नीरजसह रोहित यादवनेही पदकाच्या फेरीत स्थान मिळवल्याने भारतासाठी शुक्रवारचा दिवस ऐतिहासिक ठरला.
  • स्पर्धेच्या अ-गटात समावेश असलेला भारताचा तारांकित खेळाडू नीरजने कारकीर्दीतील तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी साकारली.
  • तर याच गटातून ८९.९१ मी अंतरावर भाला फेकत एकंदर अग्रस्थान मिळवणाऱ्या ग्रेनाडाच्या गतविश्वविजेत्या अँडरसन पीटर्सनंतर नीरजला दुसरा क्रमांक मिळवता आला.
  • नीरजणे पहिल्याच प्रयत्नात थेट पात्रतेचे अंतर गाठल्यामुळे उर्वरित दोन प्रयत्न करण्याची आवश्यकताच भासली नाही.

पंचांच्या गुणवत्ता सुधारणेवर बीसीसीआय देणार भर :

  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) क्रिकेट पंचांना आर्थिक लाभ मिळण्यासोबतच्या त्यांच्या गुणवत्तेत सुधारणा होईल, असा उपक्रम सुरू केला आहे.
  • बीसीसीआयने खेळाडूंप्रमाणे पंचांसाठी ‘एक प्लस’ श्रेणी सुरू केली आहे.
  • ए प्लस आणि ए श्रेणीतील पंचाना प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सामन्यातील प्रत्येक दिवसासाठी 40 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एलिट पॅनेलचे सदस्य नितीन मेनन यांच्यासह इतर 10 पंचांचा ए प्लस गटामध्ये सहभाग करण्यात आला आहे.
  • याशिवाय, अ गटात 20, ब गटात 60, क गटात 46 आणि ड गटामध्ये 11 पंच आहेत.

दिनविशेष :

  • 23 जुलै 1840 मध्ये कॅनडाचे प्रांत एकतीकरण कायद्याने तयार केले होते.
  • हिपॅटायटीस-बी या रोगावरील लसीच्या वापरास 23 जुलै 1986 मध्ये सुरुवात झाली.
  • 23 जुलै 1998 मध्ये केनेडी अवकाश केंद्रावरून कोलंबिया यानाने चंद्रा ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.
  • 23 जुलै 1856 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झाला.
  • थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा 23 जुलै 1906 मध्ये जन्म झाला.

इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment