चालू घडामोडी (7 जुलै 2022)
‘यूनो’च्या ‘फोर्स कमांडर’पदी लेफ्टनंट जनरल सुब्रमण्यम :
- संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गुतेरेस यांनी भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल मोहन सुब्रमण्यम यांची दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्र मोहिमेच्या ‘फोर्स कमांडर’पदी नियुक्ती केली आहे.
- त्यांची नियुक्ती भारतीय लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल शैलेश तिनईकर यांच्या जागी करण्यात आली आहे.
- 2019 मध्ये तिनईकर यांना ‘फोर्स कमांडर’ म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
- 2015 ते 2016 या काळात त्यांनी ‘इन्फंट्री डिव्हिजन’चे डेप्युटी जनरल ऑफिसर कमांडिंग आणि 2013 ते 2014 या काळात ‘माउंटन ब्रिगेड’चे ‘कमांडर’ म्हणूनही जबाबदारी सांभाळली.
- याआधी, त्यांनी संरक्षण मंत्रालयाच्या (लष्कर) एकात्मिक मुख्यालयात 2019 ते 2021 पर्यंत अतिरिक्त महासंचालक आणि 2018 ते 2019 पर्यंत ‘स्ट्राइक इन्फंट्री डिव्हिजन’मध्ये ‘डेप्युटी जनरल ऑफिसर कमांडिंग’ म्हणून त्यांनी काम केले.
लोकसभेत राजन विचारे शिवसेनेचे नवे मुख्य प्रतोद :
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याचे खासदार राजन विचारे हे लोकसभेत शिवसेनेचे नवे मुख्य प्रतोद असतील.
- यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांच्याऐवजी विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- लोकसभेतील शिवसेनेच्या मुख्य प्रतोद बदलाची माहिती राज्यसभेतील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र पाठवून दिली.
- संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलै रोजी सुरू होत असून त्याच दिवशी राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे.
पी टी उषा यांना राज्यसभेसाठी नामांकन :
- अध्यक्ष नियुक्त केले खासदाराच्या यादीत चार जणांची वर्णी लागली आहे.
- बुधवारी भारतीय जनता पार्टीने ज्येष्ठ धावपटू पी. टी. उषा यांच्यासह प्रसिद्ध संगीतकार इलायराजासमाजसेवक आणि धर्मस्थळ मंदिराचे प्रशासक वीरेंद्र हेगडे आणि प्रसिद्ध पटकथा लेखक आणि दिग्दर्शक व्ही. विजयेंद्र प्रसाद यांना राज्यसभा सदस्य म्हणून नामनिर्देशित केलं आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सदस्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांचं अभिवादन केलं आहे.
करोना लसीच्या बूस्टर डोससाठीच्या कालावधीत कपात :
- केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने करोना लसीचा दुसरा डोस आणि बुस्टर डोस यांच्यामधील कालावधीत कपात केली आहे.
- आधी दुसऱ्या डोसनंतर बुस्टर डोससाठी 9 महिने किंवा 39 आठवडे थांबावं लागत होतं.
- मात्र, या नव्या निर्णयानुसार दुसऱ्या डोसनंतर 6 महिन्यात किंवा 26 आठवड्यात लसीचा बुस्टर डोस घेता येणार आहे.
- केंद्र सरकारची सल्लागार समिती नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशनने (NTAGI) केलेल्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
‘किंग’ फलंदाजाच्या क्रमवारीत मोठी घसरण :
- भारत आणि इंग्लंड दरम्यानची कसोटी मालिका संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नवीन फलंदाजी क्रमवारी जाहीर केली आहे.
- या क्रमवारीमध्ये माजी भारतीय कर्णधार असलेल्या विराट कोहलीची घसरण झाली आहे.
- 2016 नंतर विराट कोहली प्रथमच पहिल्या 10मधून बाहेर फेकला गेला आहे.
- तर, एजबस्टन कसोटीमध्ये चमकदार कामगिरी करणारा ऋषभ पंत पहिल्या पाच खेळाडूंमध्ये गेला आहे.
- पंत शिवाय रोहित शर्मा पहिल्या 10 फलंदाजांमध्ये समाविष्ट आहे.
दिनविशेष :
- 7 जुलै हा दिवस ‘जागतिक चॉकलेट दिन‘ आहे.
- कावसजीदावर यांनी दि बॉम्बे स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल पहिली कापड गिरणी मुंबईमध्ये 1854 मध्ये सुरू केली.
- 1910 मध्ये पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना झाली.
- भारतीय क्रिकेटपटू माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा जन्म 7 जुलै 1981 मध्ये झाला.