15 ऑक्टोबर 2021
1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 07 ते 17 सप्टेंबर कोणता सण म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे ?
उत्तर: शिक्षक महोत्सव 2021.
2. देशाच्या औद्योगिक विकासात महत्वाची भूमिका बजावलेल्या राजस्थान राज्य औद्योगिक विकास गुंतवणूक निगम लिमिटेड ( RIICO ) ला कोणता पुरस्कार देण्यात आला आहे ?
उत्तर: SIIDC चे राष्ट्रीय पुरस्कार.
3. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांची सेना पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वेस्टर्न थिएटर कमांडसाठी नवीन कमांडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?
उत्तर: जनरल वांग हायजियांग.
4. काश्मीरच्या कोणत्या 23 वर्षीय युवकाने व्हॅली ते कन्याकुमारी पर्यंतचे 3600 किमी अंतर 8 दिवस 01 तास 37 मिनिटात पूर्ण करून विश्वविक्रम केला आहे ?
उत्तर: आदिल तेली.
5. कोणत्या काँग्रेस नेत्याचे, जे बिहार विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि 9 वेळा आमदार होते, निधन झाले ?
उत्तर: सदानंद सिंह.
6. आंध्र प्रदेश राज्य सरकारने रजनीश कुमार यांची नियुक्ती कोणत्या पदावर केली आहे ?
उत्तर: राज्य सरकारचे आर्थिक सल्लागार.
7. आज (08 सप्टेंबर ) जगभरात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?
उत्तर: जागतिक साक्षरता दिवस.
8. महाराष्ट्राचे गृहमंत्री कोन आहे?
उत्तर: दिलीप वळसे पाटील.
9. कोणत्या ब्रिटिश कंपनीने एक अब्ज डॉलर्ससाठी फ्रान्समधून अमेरिकेत भारतीय मालमत्ता जप्त करण्याशी संबंधित खटले मागे घेण्याची घोषणा केली आहे ?
उत्तर: केर्न एनर्जी.
10. तालिबान सरकारने अफगाणिस्तानमधील पंतप्रधान आणि उपपंतप्रधान म्हणून कोणाला घोषित केले आहे ?
उत्तर: मुल्ला मोहम्मद हसन अखुंड (पंतप्रधान), मुल्ला बरदार आणि हनाफी (उपपंतप्रधान).