24 जानेवारी 2022 [ चालू घडामोडी / Current Affairs In Marathi ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

24 जानेवारी 2022 | Chalu Ghadamodi | Today Current Affairs in marathi | Current Affairs In Marathi | Current Affairs Quition In Marathi

1. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यूएईच्या गृह मंत्रालयाने कोणावर बंदी घातली आहे ? 

उत्तर : खाजगी ड्रोन आणि लाइट स्पोर्ट एअरक्राफ्टच्या उड्डाणावर.   

2. निवडणूक आयोगाने ब्युरो ऑफ आउटरीच अँड कम्युनिकेशन (BOC) चे प्रधान महासंचालक यांची मतदार जागृती आणि मतदारांना शिक्षित करण्याच्या प्रशंसनीय कार्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्यांचे नाव काय आहे ? 

उत्तर : सत्येंद्र प्रकाश.  

3. कोणत्या प्रसिद्ध चित्रकाराचे वयाच्या 83 व्या वर्षी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झाले ? 

उत्तर : मोहम्मद सलीम.  

4. PMLA निर्णय प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 

उत्तर : विनोदानंद झा, 1983 च्या बॅचचे सेवानिवृत्त IRS अधिकारी.  

5. कोणत्या पुरुष आणि महिला खेळाडूला ICC ने वर्षातील सर्वोत्तम T20 खेळाडू म्हणून निवडले आहे ? 

उत्तर : मोहम्मद रिझवान ( पाकिस्तान ), टैमी ब्यूमोंट (इंग्लैंड). 

6. सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आला आहे ? 

उत्तर : विनोद शर्मा, गुजरात आणि सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष.  

7. भारताचा कोणता माजी फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक यांचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले ? 

उत्तर : सुभाष भौमिक.  

8. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने वन – स्टॉप वेबसाइट ev.delhi.gov.in सुरू केली आहे ? 

उत्तर : दिल्ली सरकार  

9. बार्बाडोसचे दुसऱ्यांदा पंतप्रधान कोण झाले ? 

उत्तर :  मिया मॉटली.  

10. आज ( 24 जानेवारी ) कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ? 

उत्तर : आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन आणि राष्ट्रीय बालिका दिन.  

11. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात कोणत्या संघाने सामना 4 धावांनी जिंकून मालिका 3-0 अशी जिंकली ? 

उत्तर : दक्षिण आफ्रिका.  

12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ? 

उत्तर : ३,०६,०६४ (४३९ मृत्यू ) 


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment